आमचे स्वामी ९
साधारण याच काळात म्हणजे २००१ च्या आसपास पुण्यात बिबावेवाडी इथे युवा केंद्र सुरु झालं. ते युवा केंद्र रविवारी संध्याकाळी असायचं. विशेष म्हणजे हे युवा केंद्र स्वामीजीच्या attendance शिवाय सुरू होतं. Mostly या केंद्राच्या पहिल्या Session ला स्वामीजींनी परगावच्या काही युवती मनोगत व्यक्त करायला पाठवल्या होत्या पण ते स्वतः गेले नव्हते. नंतर स्वामीजी अधून मधून या केंद्रात जात असत. मी मात्र फारसा या केंद्रात जायचो नाही कारण ते रविवारी संध्याकाळी असायचं आणि रविवारी संध्याकाळी केंद्रातून घरी आल्यावर weekend संपल्या सारखा वाटायचा. तसाही रविवार भरगच्च असायचा. सकाळी ८ वाजता प्रवचन आणि संध्याकाळी ४ वाजता दीर्घध्यान केल्यानंतर मग पुन्हा केंद्रात जावं असं वाटायचं नाही. बिबवेवाडीचं केंद्र mostly पहिलं युवा केंद्र होतं आणि यानंतर परगावी सुद्धा युवा केंद्रे सुरु झाली. माझ्या आठवणीत सांगली आणि रत्नागिरीत ही केंद्र सगळ्यात आधी सुरु झाली. सांगलीचं युवा केंद्र आणि mostly ध्यान केंद्र सुद्धा एकटी युवती handle करायची. रत्नागिरीच्या केंद्रात mostly कल्याणीचे शाळेतले आणि कॉलेजमधले मित्र मैत्रिणी होते. कालांतराने...