नवीन ग्रंथ: गोचर ग्रहांच्या गुजगोष्टी (अचूक कलनिर्णयाची सोपी पद्धत)

मे २०२२ मध्ये Untold Planetary Transits हा ग्रंथ मी लिहिला. यामध्ये मी तयार केलेली व अनुभवलेली गोचर ग्रहांच्या योगातून निर्माण झालेली कालनिर्णयाची एक नवीन पद्धत मांडली. त्यावेळी मी दशा पद्धती आणि गोचर पद्धती एकत्र वापरत होतो. पण त्याबरोबरच दशा पद्धतीतील काही कोडी सोडवण्याचा प्रयत्न करत होतो. कालांतराने ती कोडी सुटली आणि दशा पद्धती आणखिनच अचूक झाली. पण त्याबरोबरच दशा पद्धतीच्या काही मर्यादा प्रकर्षाने लक्षात आल्या. आणि मी वापरत असलेल्या गोचर पद्धतीचे फायदेही लक्षात येऊ लागले. या सगळ्यामध्ये मी गोचर पद्धती आणखिनच सूक्ष्म पातळीवर नेऊ शकलो. या पद्धतीमध्ये आणखी काही बदल केले आणि दोन्ही पद्धती एकत्र कालनिर्णय करण्यासाठी वापरू लागलो.

अनुभवाने ही पद्धत एवढी सूक्ष्म झाली की मी अनेक घटनांच्या तारखांपर्यंत जाऊन पोहोचलो. माझे वडील गेल्या वर्षी आजारी होते, तेव्हा पुढील ६ महिन्यामध्ये त्यांना रुग्णालयात केव्हा दाखल करावे लागेल याच्या तारखा घरच्यांना आधीच सांगून ठेवल्या आणि त्या सगळ्या तारखा तंतोतंत जुळल्या. या अनुभवानंतर ही पद्धत नव्याने वाचकांसमोर मांडावी हा विचार तीव्र झाला.

     शक्यतो एक तरी ग्रंथ मराठीतून दरवर्षी प्रकाशित करेन असा संकल्प रामलल्ला प्राणप्रतिष्ठा दिनी २०२४ मध्ये मी सोडला होता. त्यानुसार हा ग्रंथ इंग्रजी ऐवजी मराठीतच प्रकाशित करावा असा विचार मनात दृढ झाला. पण २२ जानेवारीपर्यंत ग्रंथ प्रकाशित होणे शक्य वाटत नसल्याने राम नवमी पर्यंत तरी हा ग्रंथ प्रकाशित करावा असा संकल्प सोडला आणि कामाला लागलो. त्यानुसार काहीही आडपडदा न ठेवता माझे सर्व अनुभव अगदी भाऊंच्या पत्रिकेसकट या ग्रंथामध्ये मांडलेले आहेत. मला अशी आशा आहे की आपल्या सर्वांना हा ग्रंथ अतिशय उपयुक्त ठरेल.

या ग्रंथाबद्दल अधिक माहिती खालील विडियोमध्ये आहे.  

हा ग्रंथ Amazon वर उपलब्ध आहे.  आपला अभिप्राय नक्की कळवा. (https://www.amazon.in/gp/product/819622222X)



Comments

Popular posts from this blog

पुनर्जन्माच्या सत्यकथा: सनातन धर्म आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीतून पूर्वजन्म आठवणाऱ्या व्यक्तींचा अभ्यास

मराठी ग्रंथ: वैदिक नक्षत्र ज्योतिष