Posts

Showing posts from August, 2026

आमचे स्वामी ५

अनुग्रहानंतरचं एक-दीड वर्ष सगळं छान सुरु होतं. सगळी ध्यानकेंद्रे अगदी office जवळच होती. आठवड्यातून २ वेळा तरी स्वामीजीबरोबर ध्यान व्हायचं. त्यावेळी ध्यान करताना माझी मान डोलायची. याबद्दल मी स्वामीजींना विचारल्यावर ते म्हणाले की योगाची background आहे, त्यामुळे असं होतं. हळूहळू कमी होईल. त्यानुसार हळू हळू कमी होऊन पुढे मान डोलणं पूर्ण बंद झालं. ध्यानामध्ये वेगवेगळे रंग दिसणे, कानातून गार हवा येणे, ध्यानामध्ये बिन्दू दिसणे असे अनुभव मला येत होते. एकदा स्वामीजीनी warn केलं. अगदी सहज म्हणाले की डोळ्यावर कोणताही प्रकाश पडत असेल तर येणारे अनुभव प्रकाशामुळे असू शकतात, ते योगाचे असतातच असं नाही. मग मी एकदा काळोख करून घरी ध्यानाला बसलो आणि खात्री करुन घेतली. खरं तर मला या अनुभवांमध्ये काहीच interest नव्हता. योगाच्या अनुभवांबद्दल मी बरंच ऐकलं होतं आणि आपल्याला याच्याशी काहीही देणं घेणं नाही हे माझ्या मनात पक्कं होतं. सूर्योपासनेवर मात्र स्वामींजींचा भर असायचा. ते रोज सकाळी संध्या करायचे. अगदी परगावी सुद्धा ते संध्येसाठी स्वत:च पळी-भांडं घेऊन जायचे. ध्यानासाठी कोणती योगासनं करायची असा प्रश्न एकदा ...

आमचे स्वामी ४

 एका रविवारी सकाळी सकाळीच एक Phone आला. आई म्हणाली की phone वर कोणीतरी गौरीश आहे का असं विचारतंय . त्यावेळी मला सहसा कोणाचे Phone येत नसत त्यामुळे आईला आणि मला दोघांनाही आश्चर्य वाटलं. आश्चर्याच्या भरातच मी phone घेतला. पलीकडून एक ताई बोलत होत्या. त्या म्हणाल्या तुला आज वेळ आहे का असं स्वामीजींनी विचारायला सांगितलंय. मी म्हटलं कशासाठी वेळ आहे का असं विचारताय? त्या म्हणाल्या आम्ही सगळे देहूला चाललोय, संध्याकाळी परत येऊ. रविवार होता, तसंही फार काही करण्यासारखं नव्हतं, मी म्हटलं हो, चालेल, मी येईन. कुठे यायचंय? त्या म्हणाल्या आम्ही तुमच्या २ गल्ल्या पलीकडेच राहतो. Sharp १० वाजता तू तिथे ये. आपण इकडूनच जाऊ. मी त्यांना बरं म्हटलं खरं पण माझ्या डोक्यात विचार सुरू झाले. या आहेत कोण? हे सगळे देहूला कशाला जात असावेत? आपल्याला कशाला बोलावलं असेल? आपण जाणार कसे आहोत? असं बरंच काही. मी अगदी वेळेत त्यांच्याकडे पोचलो. तसा थोडा awkward च होतो. कोणाशी ओळख वगैरे करून घ्यायची मला अजिबातच सवय नव्हती. Mostly त्यांचे पती एक मोठे सनदी अधिकारी होते आणि त्यांच्या Jeep मधून आम्ही जाणार होतो. (हो त्यावेळी म...

आमचे स्वामी ३

अनुग्रह घेतल्यानंतर आईला माझी जास्तच काळजी वाटू लागली. आता हा पुढे काय करेल? असा प्रश्न तिला बहुधा सतावू लागला असावा. आणि त्यामुळे ती नोकरीसाठी माझ्या मागे लागली. NIIT ची placement cell मला अजिबात दाद देत नव्हती आणि पुढे मलाही काही मार्ग दिसत नव्हता. एवढ्यात अनुग्रहानंतर अगदी दोन चारच दिवसांनी newspaper मधे एक जाहिरात वाचली. त्यांना Programming Languages शिकवण्यासाठी Faculties हवे होते. माझे विषय पक्के होते, शिकण्यात आणि शिकवण्यात मला interest होता म्हणून मी interview ला जायचं ठरवलं. Interview दिला आणि लगेच Select सुद्धा झालो. त्यांनी मला 2500 रुपये पगाराची offer दिली आणि गरजू मुलांप्रमाणे मी ती गपचूप स्वीकारली. त्यात आणखी एक गडबड केली. घरी कोणाशीही न बोलता २ वर्षांचा Bond sign केला. आपलं potential आपल्यालाच माहीत नसतं मग ते इतर कसे काय value करतील? आईला पगार सांगितल्यावर आई फार खुश नव्हती. ती म्हणाली की अडीच हजारात काय संसार होतो का? मी पटकन म्हटलं की इथे संसार करायचाय कोणाला? माझं भागलं तरी खूप झालं. या माझ्या वाक्याने मात्र ती जाम upset झाली. 6 जानेवारी 1999 या दिवशी finally माझी ही...