आमचे स्वामी १
साधारण सहावीत किंवा सातवीत असताना माझ्या जीवनात अशा काही गोष्टी झाल्या की त्या घटनांनी मला विचार करायला भाग पाडलं. याचे 2 भाग होते. पहिला भाग म्हणजे एखाद्या व्यक्तीची काहीच चूक नसताना त्याला अशा काही गोष्टी का face कराव्या लागतात आणि काय केल्याने असं होणार नाही. तशी या प्रश्नांची उत्तरं सोपी नव्हती त्यामुळे हे प्रश्न पुढे बरीच वर्ष तसेच राहिले. पण आठवीत असताना news paper मध्ये एका ज्योतिष विद्यालयाची जाहिरात वाचली. त्यांच्या office मधे जाऊन त्यांना भेटून आलो आणि घरी येऊन सगळी माहिती सांगितली. माझे आजोबाच ज्योतिषी असल्याने ज्योतिष शिकायला कोणाचाच विरोध झाला नाही. ज्योतिष शिकल्याने आपल्याला भविष्य कळेल आणि आणि अशा गोष्टी आपल्या आयुष्यात पुन्हा घडणार नाहीत ही या मागची idea होती. एक वर्षाचा course पूर्ण झाल्यावर आजोबांच्या मदतीने मी भविष्य तर सांगू लागलो पण माझा मोर्चा उपायांकडे वळला. काय उपाय केल्याने काय होतं यामध्ये मला interest होता. त्यानुसार मी गळ्यात 54 रुद्राक्षांची माळ घातली त्यात 3 चतुर्मुखी रुद्राक्ष होते. त्यानंतर गुरुवार, शनिवार आणि संकष्टी हे 3 उपास सुरु केले. कांदा लसूण खाण...