Posts

आमचे स्वामी ११

२००० मध्ये नवीन Job मिळल्यानंतर साधारण पहिल्या वर्षातच मी त्यांच्या IT division ची सगळी धुरा हातात घेतली. अनेक बदल करून त्यांचे IT division जवळ जवळ auto pilot mode वर नेलं. आमच्या CEO च्या पत्नीच CTO होत्या त्यामुळे त्यांचा खूपच support होता. त्यानंतर काही products develop करायचा plan तयार केला आणि तशी products develop सुद्धा करून घेतली. त्यांच्या sales team ला ती products विकायला जमत नव्हती म्हणून मी Bangalore, Mumbai आणि Delhi चे tours केले आणि Demos दिले. यानंतर एका बाजूला आमच्या CTO ला वाटलं की मी फारच मोठा होतोय आणि CEO ला वाटलं की मी sales join केलं तर company ला खूपच फायदा होईल म्हणून त्यांनी मला sales team join करण्याची offer दिली. पण मला sales मधे काहीच interest नव्हता त्यामुळे मी ती offer नाकारली आणि तिथंच सारं बिनसलं. त्याचं माझ्याशी वागणं बदललं. एक दिवस company चा live data delete झाला आणि त्याला मी जबाबदार आहे असं आडून आडून बोललं जाऊ लागलं. थोडक्यात ते मला Job सोड असे indications देत होते. शेवटी एक दिवस त्यांनी मला स्पष्टच सांगितलं की आता आम्हाला तुझ्या expertise ची day ...

आमचे स्वामी १०

जसं त्या ताई audio recording ऐकून transcript तयार करायच्या तसं त्याच्या आधी आमचा एक युवक मित्र अगदी निगुतीने स्वामीजींचं बोलणं record करायचा. तो जवळ जवळ सगळ्या साप्ताहिक आणि महत्त्वाच्या कार्यक्रमांना वेळेआधी हजर असायचा. कार्यक्रमाची पडेल ती तयारी करायचा आणि संपूर्ण कार्यक्रम record करुन त्याची cassette योग्य व्यक्तीच्या हाती सुपूर्द करायचा. कार्यक्रमानंतर आवराआवरी करायचा. यात कधीही खंड पडला नाही. पहिल्या US trip च्या वेळी स्वामिजींनी US हून digital audio recorder आणला. त्यानंतर audio cassette वर आणि digital recording दोन्ही सुरू झालं. कारण digital recording ऐकवायला सोपं पडायचं आणि digital recorder carry करायला सोपा होता. दुसरं वार्षिक शिबिर २००२ साली कोल्हापूरजवळ पन्हाळ्याला झालं. तेव्हा Digital Audio Recorder नवा असल्याने ते नीट record होतंय ना हे पाहण्याची जबाबदारी माझ्याकडे होती. त्याचं storage तीन दिवसांसाठी पुरणार नसल्याने रोज कोल्हापूरला जाऊन त्या दिवसाची recordings एका युवकाच्या computer वर copy करायची आणि दुसऱ्या दिवशी पुढचं recording करायचं असं ठरलं. त्यासाठी मला एक bike देण्...

आमचे स्वामी ९

साधारण याच काळात म्हणजे २००१ च्या आसपास पुण्यात बिबावेवाडी इथे युवा केंद्र सुरु झालं. ते युवा केंद्र रविवारी संध्याकाळी असायचं. विशेष म्हणजे हे युवा केंद्र स्वामीजीच्या attendance शिवाय सुरू होतं. Mostly या केंद्राच्या पहिल्या Session ला स्वामीजींनी परगावच्या काही युवती मनोगत व्यक्त करायला पाठवल्या होत्या पण ते स्वतः गेले नव्हते. नंतर स्वामीजी अधून मधून या केंद्रात जात असत. मी मात्र फारसा या केंद्रात जायचो नाही कारण ते रविवारी संध्याकाळी असायचं आणि रविवारी संध्याकाळी केंद्रातून घरी आल्यावर weekend संपल्या सारखा वाटायचा. तसाही रविवार भरगच्च असायचा. सकाळी ८ वाजता प्रवचन आणि संध्याकाळी ४ वाजता दीर्घध्यान केल्यानंतर मग पुन्हा केंद्रात जावं असं वाटायचं नाही. बिबवेवाडीचं केंद्र mostly पहिलं युवा केंद्र होतं आणि यानंतर परगावी सुद्धा युवा केंद्रे सुरु झाली. माझ्या आठवणीत सांगली आणि रत्नागिरीत ही केंद्र सगळ्यात आधी सुरु झाली. सांगलीचं युवा केंद्र आणि mostly ध्यान केंद्र सुद्धा एकटी युवती handle करायची. रत्नागिरीच्या केंद्रात mostly कल्याणीचे शाळेतले आणि कॉलेजमधले मित्र मैत्रिणी होते. कालांतराने...

आमचे स्वामी ८

 दरम्यान सन २००० च्या सुरवातीला माझ्या एका Student ने मला विचारलं की Sir, “तुम्हाला एवढं Knowledge आहे मग तुम्ही Training मधून IT मधे का येत नाही? आमच्या Company मधे Senior Positions च्या Openings आहेत. मी तुम्हाला Refer करू का?” तो पर्यंत Training ची माझी हौस संपलेली होती आणि IT शिवाय Growth नाही हे पक्कं समजलं होतं त्यामुळे मी तिला अवश्य Refer कर असं सांगितलं. Interview दिला आणि Select सुद्धा झालो. Salary एकदम काही पटीत वाढली. 5 days week झाला आणि आयुष्य जरा बरं झालं. इकडे स्वामीजींकडे पाहून मी काही गोष्टी ठरवल्या. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे ४० व्या वर्षी IT तून Retire व्हायचं आणि आपली Passion Follow करायची. दुसरी गोष्ट म्हणजे आमचं स्वतःच घर नव्हतं. आम्ही आमच्या चुलत आजोबांबरोबर त्यांच्या घरी राहत होतो. माझ्या बाबांचं आणि आजोबांचं पटेनासं झाल्यामुळे घरात बऱ्याच कटकटी व्हायच्या. त्याचा सगळ्यांवर परिणाम होत होता. तो मी सुद्धा माझ्या संपूर्ण College जीवनात सहन केला होता. त्यामुळे घर घेणं ही माझी Priority होती. खरं तर हातात काहीच नसताना मी मोठे मोठे Plans करत होतो. पण त्याशिवाय ४० व्...

आमचे स्वामी ७

 मला वाटतं साधारण २००१ मधे स्वामीजी भांडारकर रोड वरच्या त्यांच्या घरातून तेजोनिधीला कर्वेनगरला रहायला गेले आणि त्यानंतर त्यांनी मला पहिल्यांदा काही कामासाठी घरी बोलावलं. काही एक वस्तू कोणाकडेतरी पोहोचवायची होती. मला नक्की आठवत नाही. स्वामीजीनी काम सांगितलं आणि मी उभ्या उभ्याच म्हटलं की हो हो ठीक आहे मी करतो. स्वामीजी म्हणाले आधी इथे बैस, मी सांगतो आहे तो पत्ता नीट समजून घे आणि मग तिकडे जा. पत्ता ऐकता ऐकता माझ्या लक्षात आलं की आपण कुठे तरी दुसरीकडेच जाणार होतो. कसंतरी केलेलं काम स्वामींजींना अजिबात पसंत नसायचं. काम ठराविक वेळात आणि Precision नेच त्यांना व्हायला हवं असायचं. "Excellence is the mark of spirituality." हे गुरुदेव रानडे यांचं quotation ते अनेकदा प्रवचनांमधे ते quote करायचे. बोलताना ते सहज म्हणायचे की "आपलं काम Prefect च असलं पाहिजे." पुढे एकदा आम्ही स्वामींना receive करायला मुंबईला गेलो. स्वामीजी त्यांचा अमेरिका दौरा पूर्ण करून परतत होते. आम्ही 2 cars घेऊन गेलो होतो. Flight on time आलं. स्वामीजींना घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. रात्रीचा एक-दीड वाज...

आमचे स्वामी ६

 मला वाटतं २००१ साली स्वरूपयोगचं मोठं शिबिर पावसला झालं. Mostly ते पहिलं मोठं शिबीर होतं. या शिबिराला महाराष्ट्रातील विविध भागातून अनेकजण आले होते. शिबिरार्थींची संख्या साधारण ४५० ते ५०० असावी. अडीच ते तीन दिवसांचा सुंदर कार्यक्रम होता. माझही हे पहीलचं शिबिर होतं. पावसाचे स्वामी स्वरूपानंद, त्यांचे एक उत्तराधिकारी स्वामी माधवनाथ आणि स्वामी माधवनाथांचे एक उत्तराधिकारी म्हणजे आमचे स्वामी, स्वामी माधवानंद. थोडक्यात आम्ही आमच्या पणजोळी गेल्यासारखं होतं. स्वामींनी पहिल्याच session मध्ये सांगितलं की आपण मोठ्या स्वामींच्या इथे आलेलो आहोत, त्यामुळे मला इथे नमस्कार करायचा नाही. त्यामुळे स्वामीजींना भेटण्याचा योग येण्याची शक्यता फार कमी होती. तीन दिवसांच्या शिबिरामध्ये सकाळी सूर्योपासना, योगासनं आणि त्यानंतर ध्यान असायचं. Breakfast नंतर प्रश्नोत्तरांचं session किंवा स्वामींचं प्रबोधन असायाचं. Lunch नंतर Group discussions आणि त्याची presentations असायची. संध्याकाळच्या वेळी स्वामीजींचं प्रवचन असायचं. रात्री सांस्कृतिक कार्यक्रम आणि दिंडी असायची. मधे मधे अभंग गायन, धून सांगणं वगैरे असे कार्यक्...

आमचे स्वामी ५

अनुग्रहानंतरचं एक-दीड वर्ष सगळं छान सुरु होतं. सगळी ध्यानकेंद्रे अगदी office जवळच होती. आठवड्यातून २ वेळा तरी स्वामीजीबरोबर ध्यान व्हायचं. त्यावेळी ध्यान करताना माझी मान डोलायची. याबद्दल मी स्वामीजींना विचारल्यावर ते म्हणाले की योगाची background आहे, त्यामुळे असं होतं. हळूहळू कमी होईल. त्यानुसार हळू हळू कमी होऊन पुढे मान डोलणं पूर्ण बंद झालं. ध्यानामध्ये वेगवेगळे रंग दिसणे, कानातून गार हवा येणे, ध्यानामध्ये बिन्दू दिसणे असे अनुभव मला येत होते. एकदा स्वामीजीनी warn केलं. अगदी सहज म्हणाले की डोळ्यावर कोणताही प्रकाश पडत असेल तर येणारे अनुभव प्रकाशामुळे असू शकतात, ते योगाचे असतातच असं नाही. मग मी एकदा काळोख करून घरी ध्यानाला बसलो आणि खात्री करुन घेतली. खरं तर मला या अनुभवांमध्ये काहीच interest नव्हता. योगाच्या अनुभवांबद्दल मी बरंच ऐकलं होतं आणि आपल्याला याच्याशी काहीही देणं घेणं नाही हे माझ्या मनात पक्कं होतं. सूर्योपासनेवर मात्र स्वामींजींचा भर असायचा. ते रोज सकाळी संध्या करायचे. अगदी परगावी सुद्धा ते संध्येसाठी स्वत:च पळी-भांडं घेऊन जायचे. ध्यानासाठी कोणती योगासनं करायची असा प्रश्न एकदा ...