आमचे स्वामी ९

साधारण याच काळात म्हणजे २००१ च्या आसपास पुण्यात बिबावेवाडी इथे युवा केंद्र सुरु झालं. ते युवा केंद्र रविवारी संध्याकाळी असायचं. विशेष म्हणजे हे युवा केंद्र स्वामीजीच्या attendance शिवाय सुरू होतं. Mostly या केंद्राच्या पहिल्या Session ला स्वामीजींनी परगावच्या काही युवती मनोगत व्यक्त करायला पाठवल्या होत्या पण ते स्वतः गेले नव्हते. नंतर स्वामीजी अधून मधून या केंद्रात जात असत. मी मात्र फारसा या केंद्रात जायचो नाही कारण ते रविवारी संध्याकाळी असायचं आणि रविवारी संध्याकाळी केंद्रातून घरी आल्यावर weekend संपल्या सारखा वाटायचा. तसाही रविवार भरगच्च असायचा. सकाळी ८ वाजता प्रवचन आणि संध्याकाळी ४ वाजता दीर्घध्यान केल्यानंतर मग पुन्हा केंद्रात जावं असं वाटायचं नाही.

बिबवेवाडीचं केंद्र mostly पहिलं युवा केंद्र होतं आणि यानंतर परगावी सुद्धा युवा केंद्रे सुरु झाली. माझ्या आठवणीत सांगली आणि रत्नागिरीत ही केंद्र सगळ्यात आधी सुरु झाली. सांगलीचं युवा केंद्र आणि mostly ध्यान केंद्र सुद्धा एकटी युवती handle करायची. रत्नागिरीच्या केंद्रात mostly कल्याणीचे शाळेतले आणि कॉलेजमधले मित्र मैत्रिणी होते. कालांतराने त्यातले बरेच जण पुण्यात move झाले. कल्याणीसुद्धा Law करायला पुण्यात आली. स्वामीजी आम्हाला परगावच्या युवकांबद्दल बरंच सांगायचे. आम्हालाही ते भारी वाटायचं.

पुढे स्वामीजीच्या भांडारकर रोडवरच्या घरी जिथे स्वरूपयोगचं office सुरु झालं होतं तिथे युवा केंद्र सुरु झालं. ते बुधवारी संध्याकाळी mostly ७:३० वाजता असायचं. ७:३० ते ८ ध्यान, मग ठरलेल्या topic वर group discussion, त्यानंतर गीता संथा, दासबोध किंवा गीतेच्या श्लोकावर एका युवकाचं स्वाध्याय Presentation, त्यावर स्वामीजीचं निरूपण, Group discussion चं Conclusion असा साधारण ८:४५ पर्यंतचा planned कार्यक्रम असायचा. पुढे युवा केंद्रात राष्ट्रपुरुषांच्या जीवनावरचे स्वाध्याय सुद्धा सुरू झाले. त्यात mostly पहिले राष्ट्रपुरुष स्वातंत्र्यवीर सावरकर होते. त्यानंतर नेताजी आणि लोकमान्य टिळकांच्या जीवनावर सुद्धा स्वाध्याय झाले. नक्की list आठवत नाही.

अध्यात्म आणि राष्ष्ट्रीयत्व हातात हात घालून चालतं असं स्वामीजी नेहमीच सांगायचे. "देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि या देशाचे आपण देणे लागतो." हे वि. दा. सावरकर यांचं वाक्य स्वामीजी अनेकदा Quote करायचे.

Model युवा केंद्र कसं असावं याबाबत स्वामीजीनी बरंच documentation केलेलं असावं. त्यामध्ये एक library असावी असं त्यांचं मत होतं. त्या library च्या पुस्तकांची list मी पाहिली होती. त्यामध्ये अनेक राष्ट्रपुरुषांची जीवनचरित्रे होती. त्यात mostly "How to win friends and influence people." हे पुस्तक सुद्धा होतं.

युवकांचे स्वाध्याय स्वामीजीनी पूर्वी केलेल्या प्रवचनांच्या transcript चा reference आणि स्वामीजीचं मार्गदर्शन या दोन गोष्टींच्या आधारावर असायचे.

स्वामींजींचं प्रत्येक प्रवचन आधीपासून record व्हायचं आणि साधारण त्याच आठवड्यात त्याची transcript तयार व्हायची.

काही माणसं अगदी पडद्यामागे काम करत असतात. तशाच या transcript तयार करणाऱ्या ताई होत्या. Mostly त्यांच्याकडे कोणीतरी प्रवचनाची Audio Cassette पोहोचवायचं आणि transcript तयार झाली की ती घेऊन यायचं. हे इतकं seamless असायचं की ७-८ वर्षात मी सुद्धा या ताईंना एकदा किंवा दोनदाच पाहिलंय. पण प्रत्येक वेळी स्वामीजींच्या प्रवचनाची Transcript पहिली की त्यांची आठवण मात्र यायची.

युवा केंद्रातील Group discussions मात्र open असायची. आम्हाला स्वामीजींच्या presence चं Pressure वाटू नये म्हणून स्वामीजी Group discussion झालं की मग केंद्रात यायचे. स्वरूपयोग मधे खूप Intellectual आणि Diverse thought process असलेले युवक होते. Group discussion च्या वेळी ते एकमेकांवर अगदी तुटून पडायचे. तुंबळ वैचारिक युद्धे व्हायची. स्वामीजी आले की मग मात्र अगदी काही झालंच नाही अशी शांतता पसरायची.

खरं तर युवा केंद्र पाऊणे नऊपर्यंत संपणे अपेक्षित असायचं पण ते अनेकदा सव्वा नऊ पर्यंत चालायचं. कधी कधी तर पावणे दहा सुद्धा व्हायचे. वेळेच्या बाबतीत अतिशय particular असलेले स्वामीजी युवा केंद्राच्या बाबतीत मात्र थोडे liberal होते.

एकंदरीतच आमचे स्वाध्याय बघून स्वामीजींनी स्वाध्याय कसा करावा याबद्दल स्वाध्याय मार्गदर्शनाचे Sessions घ्यायला सुरवात केली.

स्वामीजी ज्या पद्धतीने स्वाध्याय करायला सांगायचे त्याने मी अवाक व्हायचो. गीतेच्या पहिल्याच स्वाध्याय मार्गदर्शनाच्या Session मधे स्वामीजी म्हणाले की भगवद्गीतेचा अभ्यास करायचा तर आपल्याला सगळ्या १८ गीता आणि त्यांची नावं तरी माहिती पाहिजेत. आणि थोडं पुढे जाऊन प्रत्येक गीतेचं context आणि ती कोणत्या परिस्थितीमधे सांगितली एवढं माहिती पाहिजे. त्यावेळी Internet वर ही माहिती सहज उपलब्ध नव्हती. मला तर या सगळ्याचं Tension च आलं होतं. पुढे युवा केंद्रात येणार्‍या एका युवतीने १८ गीतांचा context या संबंधित विषयावर PHD केली असं समजलं. स्वामीजींचा एक एक विषय PHD एवढा आहे असं मला नेहमीच वाटायचं.

स्वाध्याय बरे व्हायला वक्तृत्व चांगलं असण्याची आवश्यकता होती. ती पुरी करण्यासाठी स्वामीजींनी आमच्यासाठी Principles of oratory ची Sessions सुरू केली.

मी मात्र या सगळयात फार कधी रमलो नाही. मला वाटायचं की स्वामीजीनी समजावून सांगितलेलाच विषय आपण कसा काय मांडायचा? तरीही स्वामीजी सांगतील त्या श्लोकाचा स्वाध्याय मात्र मी निमूटपणे करायचो.

नंतर गणपती अथर्वशीर्षावरचे स्वाध्याय युवा केंद्रात सुरु झाले. यावर मात्र स्वामीजीचं बोलणं उपलब्ध नव्हतं. आम्ही independently स्वाध्याय करून मग त्यावर स्वामीजींकडून मार्गदर्शन घेत असू. हे मला थोडं जास्त बरं वाटायचं.

Mostly मी हैद्राबादला असताना किंवा पुढे पुण्यात आल्यावर २०१३ साली एक दिवस मला स्वामींजींचा phone आला. मला म्हणाले तुला कळलं की नाही, आपला अथर्वशीर्षावरचा ग्रंथ प्रकाशित झालाय. तुम्ही सगळ्यांनी स्वाध्याय केले म्हणून मी तो ग्रंथ लवकर पूर्ण करू शकलो. तुमची सगळ्यांची नावं आहेत त्यात. मी थोडा Emotional झालो. तेवढ्यात स्वामीजी म्हणाले चला आपण नंतर बोलूया आणि त्यांनी Phone ठेवून सुद्धा दिला.

खरं तर आमचे स्वाध्याय पूर्ण झाल्यावर बऱ्याच वर्षांनी स्वामीजींनी गणपती अथर्वशीर्षावर ग्रंथ लिहिला. तरीही त्यामध्ये ज्यांनी ज्यांनी अथर्वशीर्षावर स्वाध्याय केले त्यां सगळ्यांची नावं प्रस्तावनेत दिली आहेत.

हा ग्रंथ स्वरूपयोगच्या website वर विक्रीसाठी उपलब्ध आहे. 

युवा केंद्रातील काही गमती जमती आता पुढच्या वेळी सांगतो.

-गौरीश बोरकर

सप्टेंबर १३ २०२६

#aamacheswami

Comments

Popular posts from this blog

पुनर्जन्माच्या सत्यकथा: सनातन धर्म आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीतून पूर्वजन्म आठवणाऱ्या व्यक्तींचा अभ्यास

मराठी ग्रंथ: वैदिक नक्षत्र ज्योतिष