आमचे स्वामी ८
दरम्यान सन २००० च्या सुरवातीला माझ्या एका Student ने मला विचारलं की Sir, “तुम्हाला एवढं Knowledge आहे मग तुम्ही Training मधून IT मधे का येत नाही? आमच्या Company मधे Senior Positions च्या Openings आहेत. मी तुम्हाला Refer करू का?” तो पर्यंत Training ची माझी हौस संपलेली होती आणि IT शिवाय Growth नाही हे पक्कं समजलं होतं त्यामुळे मी तिला अवश्य Refer कर असं सांगितलं. Interview दिला आणि Select सुद्धा झालो. Salary एकदम काही पटीत वाढली. 5 days week झाला आणि आयुष्य जरा बरं झालं.
इकडे स्वामीजींकडे पाहून मी काही गोष्टी ठरवल्या. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे ४० व्या वर्षी IT तून Retire व्हायचं आणि आपली Passion Follow करायची.
दुसरी गोष्ट म्हणजे आमचं स्वतःच घर नव्हतं. आम्ही आमच्या चुलत आजोबांबरोबर त्यांच्या घरी राहत होतो. माझ्या बाबांचं आणि आजोबांचं पटेनासं झाल्यामुळे घरात बऱ्याच कटकटी व्हायच्या. त्याचा सगळ्यांवर परिणाम होत होता. तो मी सुद्धा माझ्या संपूर्ण College जीवनात सहन केला होता. त्यामुळे घर घेणं ही माझी Priority होती. खरं तर हातात काहीच नसताना मी मोठे मोठे Plans करत होतो. पण त्याशिवाय ४० व्या वर्षी IT सोडणं शक्य वाटत नव्हतं.
२००१ मध्ये मी घर Book करायचं ठरवलं. बाबा म्हणाले की मी आयुष्यात कधीच घर घेतलेलं नाही त्यामुळे मी तुला काही मदत करू शकणार नाही. त्यावेळी आम्ही कोथरूडमधे राहायचो. आई म्हणाली कुठे खड्यात (DSK विश्व म्हणजे खरं तर डोंगरावर) घर Book करतोयस? तिकडे कोण रहायला येणार? पण देवावर भरोसा ठेवून आणि Form 16 म्हणजे काय हे सुद्धा माहीत नसताना, Loan मिळेल या भरवशावर मी २३ व्या वर्षीच घर Book केलं आणि पुढचं सगळं देवाने निभावलं.
देवाने असं म्हणायचं कारण असं की शुद्ध परमार्थाची संकल्पना मला पूर्ण पटली होती आणि सद्गरूंकडे काहीही ऐहिक मागायचं नाही हे माझ्या मनात पक्कं होतं. त्यानुसार मी आजपर्यंत माझ्यासाठी काहीही मागितलं नाही. माझ्या १-२ जवळच्या नातेवाईकांसाठी काही होऊ शकत असेल तर पहा असं मात्र मनोमन सांगितलं. त्याबद्दल पुढे लिहिणार आहे. पारमार्थिक गोष्टी (ध्यानातील काही अनुभव) मात्र मी स्वामींकडे काही वेळा मागितल्या आणि त्यांनी शक्य तिथे सहजच "कल्याणमस्तु" म्हटलं.
साधारण याच वेळी स्वामीजीनी त्यांची पहिली US Tour Plan केली असावी आणि ‘तुला रोज थोडा वेळ घरी यायला जमेल का?’ असं त्यांनी मला विचारलं. Office मधून रोज साधारण ६-६:३० ला निघायचो त्यामुळे हे सहज जमण्यासारखं होतं. त्यामुळे मी लगेचच हो म्हटलं. त्यावेळी कामाला खूप जण नसायचे हळू हळू ही संख्या वाढली. त्यामुळे स्वामीजींबरोबर खूप वेळ मिळाला.
स्वामींजींचा Systems बसवण्यावर आणि Structure Follow करण्यावर बराच भर होता आणि मी मात्र Totally unstructured होतो. त्यामुळे मला हे सगळं नवीन होतं.
पहिल्यांदा स्वामीजीच्या खोलीत गेलो तेव्हा पाटावर fit केलेलं एक Steel चं तळपणारं पातं पहिलं होतं. बरेच दिवस मला त्याबद्दल उत्सुकता होती. एवढं धार धार पातं कशाला वापरतात असा प्रश्न मला पडला. नंतर कळलं की तो Paper Cutter होता. साधा Paper Cut करायला एवढं मोठा Cutter कशाला हवा असं मला वाटलं. पण Precision Cutting आणि वेळ वाचण्यासाठी तो Cutter होता हे पुढे कळलं. Chart Paper तर त्याने अतिशय सुंदर कापला जातो. आता जे Paper cutter मिळतात त्यांना अशी धार नसते पण function साधारण सारखंच असतं.
स्वामीजी कागदाच्या केवळ एकाच बाजूला लिहायचे. मला वाटलं की हे किती कागद फुकट घालवतात. पण स्वामीजी म्हणाले की जर कोणाला ठराविकच पानं द्यायची असतील आणि बाकी काही पानं आपल्याला हवी असतील तर हे उपयोगी पडतं. हे सगळं शिक्षण माझ्यासाठी नवीनच होतं कारण आम्ही शाळेत २०० पानांच्या एका वहीचे ८ भाग करून ८ विषयांच्या Notes काढायचो आणि पाटीवर गणिताचा सराव करायचो. वही मित्राला दिली की Homework ला सुट्टी.
आम्ही कामाला सुरवात केली त्या दिवशी स्वामींनी सांगितलं की आज आपल्याला US मधल्या सगळ्या Contacts ना email पाठवायचा आहे. Cards ची एक मोठी थप्पी माझ्याकडे दिली आणि म्हणाले हे आपले सगळे Contacts आहेत. यातले US मधले Contacts वेगळे काढ. ती cards alphabetically sorted होती.
खरंतर मी चकीत होतो, कारण जास्तीत जास्त मी एखादी Diary expect केली होती. प्रत्येक card वर एका व्यक्तीचं नाव, पत्ता आणि असला तर Phone number व emails होते. स्वामीजी म्हणाले यामुळे प्रत्येक गावातले, Phone numbers असलेले/नसलेले contacts सहज group करता येतात. ते पाहून माझ्या लक्षात आलं की आम्ही जे Excel मधे करतो ते तर स्वामीजी Excel शिवाय करतायत. Data चं Grouping, Filtering आणि Sorting, cards मुळे सहज शक्य आहे. अर्थातच नंतर हा सगळा Data Excel मधे गेला.
स्वामीजींच्या सांगण्यानुसार मी US मधल्या Contacts ची Cards वेगळी काढली आणि मग ज्यांच्या Cards वर emails आहेत ती माझ्याकडे घेतली. स्वामींनी email dictate केला. मी send करू का? असं विचारलं असता स्वामी म्हणाले थांब, एक Card राहिलेलं दिसतंय. मी त्यांना म्हटलं की हो कारण ते Duplicate Card आहे. त्यांचा विश्वास बसला नाही. ते म्हणाले की असं कसं Duplicate Card असेल? आपण सगळी Cards पुन्हा एकदा पाहूया. मग आम्ही दोघांनी सगळी Cards एकत्र पुन्हा Check केली. त्यात दोन Cards वर नाव एकच होतं पण पत्ता वेगळा होता आणि Email सुद्धा एकच होता.
माझ्या मनात विचार आला की स्वामीजींच Intuition चुकलं कसं? त्यावर स्वामीजी काहीच बोलले नाहीत. कालांतराने माझ्या लक्षात आलं की पहिल्यांदा Intuition येतं ते अगदी General असतं. ज्याला आपण Hunch म्हणतो ना अगदी त्याप्रमाणे. पुढे आपल्याला Choice असतो की आपण Intuition वापरून investigate करायचं की Practical approach ने investigate करायचं. या वेळी तरी स्वामीजींनी दुसरा पर्याय निवडला असावा.
काम करता करता आम्हाला कधी कधी उशीर व्हायचा. संध्याकाळचं खाणं स्वामीजींच्या बरोबरच व्हायचं. त्यावेळी स्वामीजी रात्री ११ वाजता ध्यानाला बसायचे. १०.४० झाले की ते आम्हाला काम थांबवायला सांगायचे. म्हणायचे की ‘हे तुझं काय सुरू आहे ते लवकर आटप, आता मला ध्यानाला जायचंय.’ मी त्यांना म्हणायचो की ‘तुम्ही ध्यानाला जा, मी काम पूर्ण करून घरी जातो.’ पण ते स्वामीजींना कधीच मान्य नसायचं. ते आम्हाला निरोप देऊनच ध्यानाला जायचे. कामाला कोणी युवती थांबल्या असतील तर त्यांच्या Scooter मागे Car ने त्यांना घरी सोडायला जायचे. एक दिवस मला उशीर झाला आणि साधारण ११ वाजले. स्वामीजी त्यांच्या Hall मधेच ११ वाजता ध्यानात गेले. थोड्या वेळाने मला म्हणाले, की ‘बघ, वेळ झाली की मी थांबू शकत नाही.’ त्यानंतर मात्र आम्ही काहीही झालं तरी १०:३० ते १०:४५ च्या मधे काम थांबवू लागलो.
पहिल्या US Tour चं Planning करताना स्वामीजींकडून अनेक गोष्टी समजल्या आणि पुढे त्या अनेकदा उपयोगी पडल्या. त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रात्री ११ वाजताचं ध्यान त्याबद्दल पुढे सांगेन.
-गौरीश बोरकर
सप्टेंबर ६ २०२६
#aamacheswami
Comments
Post a Comment