Vitamins भाग ५
मागे आपण पाहिले की गुरे हिरवा चारा खातात मग रवंथ करतात आणि तो चारा पोटात फुगून त्याचे foregut fermentation होऊन B12 निर्माण होते. नंतर हेच B12 गुरांच्या दुधामध्ये येते आणि आपल्याला मिळते. आज आपण पाहूया की आपण दूध आणि दही रोजच्या आहारात घेऊन सुद्धा आपल्याला B12 कमी का पडते. याचे पहिले कारण दुधच आहे. आपण जर दूध गवळ्या कडून घेत असाल आणि तुम्हाला B12 deficiency असेल तर दूध नक्की बदलून पहा. मागे आम्ही नवीन dairy मधुन दूध आणू लागलो आणि मला तोंड येऊ लागले म्हणुन ही गोष्ट dairy मालकाच्या कानावर घालून ते दूध बंद केले. काही दिवसांनी त्याने स्वतःच सांगितले की त्याने दुधाचा source बदलला कारण त्या दूधामध्ये problem होता. मला असा प्रॉब्लेम कुठल्याही पिशवीतील दुधात अजून आलेला नाही. दुसरे प्रमुख कारण digestion हे आहे. आपला flora किंवा पचनशक्ती जर योग्य नसेल तर अन्नातील जीवनसत्त्वाचे पुरेसे शोषण रक्तात होत नाही आणि यातून अनेक आजारांना निमंत्रण दिले जाते. म्हणुनच कदाचित आयुर्वेदात बरेचसे आजार पचनाशी संबंधित असतात असे म्हटले असावे. जर तुम्हाला अगदी घट्ट किंवा फार पातळ stool असेल. दिवसातून एका पेक्षा जास्...