माझे दैवी अनुभव भाग १
देव, देवता, भुतं, खरी आहेत का? उपासना पूजा वगैरे फळाला येतात का? बाबा, स्वामी, महाराज हे खरे असतात का? मंत्र तंत्र वगैरे यात काही अर्थ आहे का? असे अनेक प्रश्न आपल्या अनेकांना पडतात. पूर्वी माणसे यावर सहज विश्वास ठेवत असत पण आता तशी परिस्थती राहिली नाही. जसे जसे आपण शास्त्रीय दृष्टीने विचार करू लागलो तसे तसे जे आधुनिक शास्त्र सांगत नाही किंवा सिद्ध करत नाही ते खरं असेल का ? अशी शंका अनेक जण घेऊ लागले आहेत. कोणत्याही गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवण्यापेक्षा आपण पडताळून पाहावी या मताचा मी स्वतः सुद्धा आहे. आणि यातूनच अनेक गोष्टींचा पडताळा घेण्याचे प्रयन्त मी अगदी शाळेत असतानाच सुरु झाले आणि त्यानून मला अनेक अनुभव सुद्धा आले. ते जसा वेळ मिळेल तसे मांडेन म्हणतोय. पाहूया कास जमतंय ते. माझे आजोबा गोव्यातील एक प्रख्यात ज्योतिषी होते पण ते मी दुसरीत असतानाच निवर्तले. त्यानंतर एक कावळा सतत ३ दिवस येऊन माझ्या डोक्यावर टोच मारून गेला. या प्रसंगाचा अर्थ अजूनही मला अगम्यच आहे त्यामुळे मी त्याला Coincidence असंच म्हणतो. आयुष्यात होणाऱ्या घटनांच्या मागे काही कार...