माझे दैवी अनुभव भाग १

  देव, देवता, भुतं, खरी आहेत का? उपासना पूजा वगैरे फळाला येतात का? बाबा, स्वामी, महाराज हे खरे असतात का? मंत्र तंत्र वगैरे यात काही अर्थ आहे का? असे अनेक प्रश्न आपल्या अनेकांना पडतात. पूर्वी माणसे यावर सहज विश्वास ठेवत असत पण आता तशी परिस्थती राहिली नाही. जसे जसे आपण शास्त्रीय दृष्टीने विचार करू लागलो तसे तसे जे आधुनिक शास्त्र सांगत नाही किंवा सिद्ध करत नाही ते खरं असेल का ? अशी शंका अनेक जण घेऊ लागले आहेत. कोणत्याही गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवण्यापेक्षा आपण पडताळून पाहावी या मताचा मी स्वतः सुद्धा आहे. आणि यातूनच अनेक गोष्टींचा पडताळा घेण्याचे प्रयन्त मी अगदी शाळेत असतानाच सुरु झाले आणि त्यानून मला अनेक अनुभव सुद्धा आले.  ते जसा वेळ मिळेल तसे मांडेन म्हणतोय. पाहूया कास जमतंय ते.  

  माझे आजोबा गोव्यातील एक प्रख्यात ज्योतिषी होते पण ते मी दुसरीत असतानाच निवर्तले. त्यानंतर एक कावळा सतत ३ दिवस येऊन माझ्या डोक्यावर टोच मारून गेला. या प्रसंगाचा अर्थ अजूनही मला अगम्यच आहे त्यामुळे मी त्याला Coincidence असंच म्हणतो. आयुष्यात होणाऱ्या घटनांच्या मागे काही कारणमीमांसा असते का हा विचार मी सातवीत असताना करू लागलो त्या आधी सगळं मजेत चाललं होते. पण काही विशेष घटना ठराविक माणसांच्याच आयुष्यात का घडत असाव्यात हा प्रश्न मला विशेष सतावू लागला आणि त्याने माझ्या दिवसाच बराचसा काळ व्यापायाला सुरवात केली. माझे चुलत आजोबा १९९१ साली आमच्याबरोबर राहू लागले आणि त्यांनासुद्धा ज्योतिष येत होते. आमची नातेवाईक मंडळी त्यांना प्रश्न विचारायचे आणि ते सांगतात त्या गोष्टी बऱ्यापैकी बरोबर यायच्या. यामुळे या सगळ्या गोष्टीमागे ग्रह हे कारण आहे कि काय अशी शंका मला येऊ लागली आणि मी स्वतः ज्योतिषाचा अभ्यास करायचा विचार बऱ्यापैकी पक्का केला. १९९० डिसेंबर किंवा १९९१ जानेवारीच्या सुमारास पेपर मध्ये १ वर्षाच्या ज्योतिष Course ची जाहिरात आली होती. मी चौकशी करून आलो आणि घरी विचारलं. मुलगा आजोबांचा वारसा पुढे नेतोय याचा घरी आनंद होता आणि त्यांनी लगेच हो म्हटलं. मार्च १९९२ मध्ये कोर्से पूर्ण केला आणि तिसऱ्या क्रमांकाने परीक्षा उत्तीर्ण झालो. म्हणजे मी त्यावेळी नववीत होतो आणि आमच्या ज्योतिषाच्या वर्गात Naturally सगळ्यात लहान होतो.

एवढा कोर्से जरी भविष्य सांगायला पुरेसा नसला तरी घरात माझे चुलत आजोबा असल्याने त्यांची बरीच मदत होत होती. आजोबांकडे १९४६ पासूनचे The Astrological Magazine या मासिकाचे बरेचसे अंक होते. तो एक मोठा खजिना अभ्यास करायला उपलब्ध होता. त्याच बरोबर माझा एक शाळेतला मित्र सुद्धा माझ्याबरोबर खूप interest घेऊन अभ्यास करत होता. या सगळ्यातुन ग्रहांचा माणसावर परीणाम होतो आणि तो आपल्याला साधारण समजू शकतो या निर्णयाप्रत मी १-२ वर्षात नक्की येऊ शकलो.

दहावीचे वर्ष अभ्यासात गेलं पण अपेक्षेनुसार Marks मिळाले नाहीत आणि ११वीच्या Admission च्या वेळी बरेच झोल झाले ते Adventure नंतर कधीतरी सांगेन. या सगळ्यातून आणखी एक interesting प्रश्न तयार झाला कि आपलं आयुष्य सगळंच decided असतं का आणि आपल्या अस्तित्वाला एवढाच अर्थ आहे का? हा प्रश्न काही माझा जाम पिच्छा सोडेना.


Comments

Popular posts from this blog

पुनर्जन्माच्या सत्यकथा: सनातन धर्म आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीतून पूर्वजन्म आठवणाऱ्या व्यक्तींचा अभ्यास

यथा पिंडे तथा ब्रहमांडे चा पुरावा