Vitamins भाग ६

आत्तापर्यंत आपण B12 संबंधी अनेक गोष्टी समजून घेतल्या.
त्यामध्ये अंडी आणि chicken पेक्षा दुधात B12 जास्त असते हे आपल्याला कळले. त्याच बरोबर गोमूत्र हा B12 चा खूप मोठा Source आहे हेही आपल्याला कळले. रोज गोमूत्र घेणाऱ्यांचे B12 चे Reports आश्चर्यकारक आहेत.
आज आपण B12 वाढण्यासाठी शाकाहारी व्यक्तीने काय करायचे ते पाहूया.
आपल्याला हे आठवत असेल की B12 हे Cobalt चे Compounds आहेत ज्याला Cobalmin म्हणतात. आपण हे सुद्धा पाहिले की हिरवा चारा गुरांच्या पोटात फुगून त्यातून B12 निर्माण होते. आता आपल्याला हे सुद्धा माहीत आहे की आपल्या मोठ्या आतड्यात आणि liver मध्ये असे Bacterias असतात जे B12 निर्माण करतात.
या 3 गोष्टींतून आपल्याला हे समजते की आपण जर अशी ecosystem निर्माण केली तर आपल्या शरीरात पुरेसे B12 निर्माण होऊ शकते.
त्याकरिता पहिल्यांदा आपण जास्त प्रमाणात Cobalt असलेल्या हिरव्या भाज्या पाहूया.
अतिशय मुबलक प्रमाणात Cobalt असलेली भाजी म्हणजे पालक. त्याखालोखाल Cobalt Lettuce मध्ये असते. फळांचा विचार केला तर Pear मध्ये सर्वात जास्त Cobalt असते. मसाल्याच्या पदार्थात दालचिनीमध्ये असते. पेयांमध्ये Coffee आणि Cocoa मध्ये मुबलक प्रमाणात Cobalt असते. (https://www.researchgate.net/.../291595743_Determination...).
आता आपल्याला Cobalt चे Sources समजले पण केवळ Cobalt घेऊन भागणार नाही. आपल्याला माहित आहे की गुरे रवंथ करतात पण आपण रवंथ करू शकत नाही. म्हणुनच की काय आपल्याला पूर्वीपासून 32 वेळा चाऊन चाऊन खाण्याचा सल्ला देत असत. आणि दुसरे म्हणजे हिरवा मसाला किंवा चटणी पाट्यावर अगदी बारीक वाटत असत. आता आपल्याकडे grinders आहेतच. मुख्य भाग असा की शरीरात B12 निर्माण होण्यासाठी हिरवे पदार्थ एकतर चाऊन चाऊन खाल्ले पाहिजेत किंवा बारीक वाटून घेतले पाहिजेत.
यातला तिसरा भाग fermentation चा आहे. हे पदार्थ पोटात नीट Ferment झाले पाहिजेत त्याकरिता आपण मागे पाहिले की पचन योग्य असले पाहिजे. त्याला दुसरी गोष्ट म्हणजे Fermentation Agents आहारामध्ये समाविष्ट करणे. आहारातील सर्वसामान्य Fermentation Agent म्हणजे ताक आणि दही. आणि म्हणुनच की काय आयुर्वेदात प्रत्येक जेवणानंतर रोज ताक प्यावे असे सांगितले आहे. आज काल आणखी एक Fermentation Agent आपल्या आहारामध्ये समाविष्ट झाला आहे तो म्हणजे Bread. चांगल्या प्रकारे किंवा घरी तयार केलेला थोडासा(एखादा Slice) ब्रेड हिरव्या भाज्यांच्या बरोबर घेतला तर अतिशय योग्य Fermentation/पचन करतो असा माझा अनुभव आहे. मी अतिशय Controlled Diet घेताना पहिल्यांदा आठवड्यातून दोनदा पालक Soup आणि त्याबरोबर Bread चा एक Slice घेत असे आणि त्याने माझी B12 ची गरज पुर्ण होत असे. त्यानंतर मी रोज Bread बरोबर Lettuce खायला सुरुवात केली. Lettuce बद्दल चा माझा अनुभव अतिशय चांगला आहे. मी गेली अनेक वर्षे रोज एक मोठे Lettuce चे पान खातो. त्यावर Fermentation करीता ताक प्याले तरी चालते. या दोन्ही पदार्थांचा Flora व्यवस्थित रहायला खूप उपयोग होतो.
आणखी एक Interesting पदार्थ Dr. त्रिपाठी Diabetes करीता Suggest करतात तो म्हणजे Super Green Smoothie (https://m.youtube.com/watch?v=veeA-ZQLonU). ह्यात जर केळे घातलं तर त्याचा Diabetes ला फार उपयोग होत नाही पण जर Pear किंवा सफरचंद घातलं तर Diabetes ला सुद्धा ही Smoothie अतिशय उपयुक्त आहे. पाहताना जरी शंका आली तरी ही Smoothie चविष्ट लागते.
तिसरा एक पदार्थ म्हणजे हिरवी चटणी, सांबार आणि डोसा किंवा इडली. या सांबारामध्ये भरपूर हिरव्या भाज्या (दोडके, दूधी, शेवगा, भोपळा वगैर) असणे आवश्यक आहे. चटणी मध्ये भरपुर पुदिना किंवा कोथिंबीर असणे आवश्यक आहे आणि इडलीचे पीठ योग्य प्रमाणात फुगलेले असले पाहिजे. आता तुमच्या लक्षात आले असेल की दक्षिण भारतात रोजच इडली/डोसा खायची पद्धत कशी सुरू झाली असावी.
आणखीन एक असाच पदार्थ म्हणजे दही भात. भात पूर्णवेळ पाण्यात तयार त्यामुळे तो भरपूर Fermented होतो. त्यामुळे भाताच्या ओंबीमध्ये भरपुर B12 असण्याची शक्यता आहे. हा भात ज्यावेळी दह्याशी संबंधीत होतो तेव्हा B12 पोटातील Bacterias मुळे वाढत असावे. पण ह्याकरीता हातसडीच्या तांदळाची आवश्यकता आहे. पॉलिश केलेल्या तांदुळामधुन हे घटक निघून जात असावेत. दहीभातावर/ताकामध्ये हिरवी कोथिंबीर घातली तर सोन्याहून पिवळे.
खरे म्हणजे भारतातील प्रत्येक स्वयंपाकघर ही एक प्रयोगशाळा आहे. मी हे खात्रीने सांगू शकतो की ह्या प्रयोगशाळेत जेवढे प्रयोग होतात तेवढे प्रयोग जगाच्या पाठीवर कोणत्याही प्रयोगशाळेत झालेले नसतील. भारतीय स्त्रियांना त्यांच्या पाक कौशल्याचा असलेला अभिमान सार्थ आहे. भारतामध्ये पावला पावलावर cuisine बदलते. त्यामुळे B12 तयार होतील अश्या अनेक पाककृती तुमच्या डोक्यात ही पोस्ट वाचताना आल्या असतील त्या पाककृतींची नावे या पोस्टवर Comments मध्ये लिहा म्हणजे त्याची एक मोठी यादी तयार होईल आणि सगळ्यांना Reference म्हणुन उपयोगी पडेल.
B12 तयार होण्यासाठी 2 factors महत्वाचे आहेत.
1. हिरवी बारीक वाटलेली किंवा शिजलेली भाजी
2. Fermentation agent किंवा ferment झालेला पदार्थ.
आज मी B12 बद्दल लिहिणे थांबवतो आहे पण आणखी असे अनेक topics/समज गैरसमज आपल्याकडे आहेत ज्याबद्दल मधून मधून लिहीत राहीन.
-Gaurish Borkar

Comments

Popular posts from this blog

पुनर्जन्माच्या सत्यकथा: सनातन धर्म आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीतून पूर्वजन्म आठवणाऱ्या व्यक्तींचा अभ्यास

यथा पिंडे तथा ब्रहमांडे चा पुरावा