Vitamins भाग 2

आज थोडे B12 बद्दल बोलुया.
B12 deficiency कडे पाहताना आपल्याला 2 3 प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतील. मी मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे जर का मांसाहारी पदार्थातून Vitamins जास्त मिळतात तर अमेरिकेत गल्लो गल्ली Vitamins ची दुकाने कशी काय आहेत. दुसरा प्रश्न म्हणजे भाजीपाला खाऊन राहणाऱ्या प्राण्यांना म्हणजे गाई गुरांना हा प्रश्न का भेडसावत नाही. आणि तिसरा प्रश्न म्हणजे हा प्रश्न हल्लीच का उद्भवला.
अमेरिकेत विकत मिळणार्‍या निरनिराळ्या पदार्थांमध्ये Vitamins आणि minerals add करून ते पदार्थ विकण्याची पद्धत आहे. म्हणजे ते Vitamins च्या गोळ्या घ्यायच्या ऐवजी असे पदार्थ खातात. याला fortified food असे म्हणतात. याबद्दल आणखी माहिती इथे मिळेल (https://www.healthline.com/.../fortified-and-enriched-foods). दुसरी गोष्ट म्हणजे benchmarks. आपल्या भाषेत Benchmarks म्हणजे Normal Range. एका अभ्यासानुसार जर B12 हे 200pg/ml च्या खाली असेल तर कमी आहे असे मानले आहे आणि 200pg/ml ते 300pg/ml border वर मानले आहे. तर आपल्याकडे मी ज्या lab मध्ये पुण्यात report करतो तिथे 180pg/ml ते 914pg/ml normal range मानली आहे. असो अशा गोष्टी होतच असतात. मुद्दा हा की या Benchmark नुसार अमेरिकेतील वय वर्षे 60 च्या वरील 6% लोकांचे B12 200pg/ml च्या खाली आहे तर 20% लोकांचे B12 border वर म्हणजे 200pg/ml ते 300pg/ml मध्ये आहे (https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/19116323/). आपल्याकडे या आधीच्या वयाच्या लोकांचा data उपलब्ध नाही. पण अमेरिकेत सुद्धा जवळजवळ 25 ते 30 टक्के प्रौढ माणसे (वयस्कर नव्हे) आणि 10% लहान मुले B12 supplements घेतात. (https://ods.od.nih.gov/fac.../VitaminB12-HealthProfessional/).
अमेरिकेतील data घेण्याचे कारण असे की अमेरिकेत साधारणपणे प्रत्येक व्यक्ती वर्षाला 102 किलो मांस खाते (https://en.m.wikipedia.org/.../List_of_countries_by_meat...) म्हणजे दिवसाला साधारणपणे 300 grams मांस खाते. मानवाची B12 ची गरज दिवसाला साधारण 50 ते 100 gram chicken खाल्ले तरी पूर्ण होऊ शकते (http://www.dietandfitnesstoday.com/vitamin-b12-in-chicken...) मग 300 grams chicken खाणार्‍या व fortified food खाणार्‍या व्यक्तींना सुद्धा B12 ची कामाकरता कशी असा प्रश्न निर्माण होतो. याचे उत्तर आपल्या पचन संस्थेशी निगडित आहे.
आपण जरी कितीही Vitamins घेतली तरी जोपर्यंत आपली पचन संस्था ते शरीरात शोषू शकत नाही तोपर्यंत त्याचा आपल्याला काहीच उपयोग होऊ शकत नाही. आणि इथेच खरी मेख आहे. आयुर्वेदात अनेक आजार पचनसंस्थेशी जोडले आहेत त्याला या दृष्टीने अर्थ आहे.
त्यामुळे मांसाहारी लोकांना B12 ची कमी भासत नाही हा भ्रम आपण सोडून देऊया आणि आपली B12 ची कमी पूर्ण होण्याकरिता काय करायचे ते पुढच्या post मध्ये पाहूया.

Comments

Popular posts from this blog

पुनर्जन्माच्या सत्यकथा: सनातन धर्म आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीतून पूर्वजन्म आठवणाऱ्या व्यक्तींचा अभ्यास

यथा पिंडे तथा ब्रहमांडे चा पुरावा