माझे दैवी अनुभव भाग ४
ज्योतिषाच्या काही ग्रंथांत शकुन सांगितलेले आहेत. विशेषतः प्रश्न शास्त्रावरील ग्रंथांमध्ये शकुन आहेत. म्हणजे हा हा शकुन झाला किंवा प्रश्नकर्त्याने या अवयवाला हात लावला तर प्रश्नकर्त्याच्या प्रश्नाचे हे उत्तर येईल असं दिलेलं आहे. मला सगळ्या गोष्टींचा पडताळा अवघड असल्याने आणि प्रत्येक गोष्टीतील Logic समजून घेण्यात रस असल्याने मी शकुन या प्रकारात फारसा पडलो नव्हतो. माझा मित्र मात्र जुन्या ग्रंथांमधल्या सगळ्या गोष्टी खऱ्याच आहेत असं मानायचा. एकदा आम्ही एका महत्वाच्या कामाला जात असताना आम्हाला रस्त्यावर २-३ जास्वदींची लाल फुलं पडलेली दिसली तर तो लगेच म्हणाला, ‘अरे, रस्त्यात लाल रंगाची फुलं पडलेली दिसली म्हणजे काम होणार नाही!’. अंतर खूप असल्याने काय करायचं असा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला. बरं आम्ही अर्ध्या वाटेत होतो. त्यावेळी काही Mobile Phones नव्हते आणि भेटीची वेळ तर आधीच ठरलेली होती. करें तो क्या करें? Sack मधे त्यांचा Phone Number सापडला आणि खिशात रुपयाचं नाणं. जवळच्या पिवळ्या Public Phone Booth वर जाऊन Phone केला तेव्हा कळलं की ज्या व्यक्तीकडे आमचं काम होतं ते परगावी गेलेत म्हणजे भेट होणार नव्हती. भेट होणार नाही म्हणून मी जाम वैतागलो पण शकुन खरा आला म्हणून माझा मित्र मात्र खुश होता.
आम्ही तसेच पुन्हा घरी आलो आणि मी लगेच वेगवेगळ्या पुस्तकातले सगळे शकुन वाचून काढले. या शकुन प्रकरणाचा काही तरी सोक्ष मोक्ष लावला पाहिजे असं मी ठरवलं. माझ्या आजोबांनी सांगितलं की यात फार पडू नकोस उगीच शंका येत राहतात त्याऐवजी आपण आपलं काम करावं हे बरं. पण मी याचा पाठपुरावा करायचाच आणि यात काही अर्थ आहे की तो एक Coincidence होता हे शोधायचं असं ठरवलं. जिकडे तिकडे शकुन शोधायचो आणि त्याचा अर्थ काय ते पुस्तकांत पहायचो. पुस्तकातले अर्थ आणि झालेली घटना याचा काहीही संबंध लागायचा नाही. झालेली घटना आणि पुस्तकात लिहिलेल्या अर्थाची Shade यात मात्र बऱ्याच वेळा साधर्म्य आढळलं आणि यावर आणखी विचार करणं आवश्यक आहे असं लक्षात आलं.
एक दिवस माझ्या गळ्यातील रुद्राक्षाची माळ तुटली. मी असं वाचलं होतं की श्रीमती इंदिरा गांधींना कोणीतरी एक रुद्राक्षाची माळ दिली होती आणि त्यांना गोळी लागली त्यावेळी ती माळ त्यांच्या गळ्यात नव्हती. आता मला वाटलं की आपुन तो गया साला! आपल्याला काही बरं वाईट होईल की काय अशी शंका माझ्या मनामध्ये घुटमळू लागली. मी पहिल्यांदा सोनाराकडे जाऊन जास्त चांगल्या दोऱ्यांमध्ये ती माळ गुंफून आणली. लगेच मला वाटलं चला I am safe now. पण तरीही घरात एक Unexpected घटना घडली. काही महिन्यांमध्ये ती माळ पुन्हा तुटली आणि पुन्हा असंच काही तरी झालं. आता मला वाटायला लागलं माळ हाच एक Problem आहे की काय. काही जण तर म्हणालेच की ती माळ तुम्हाला लाभली नसेल. मी विचार केला की ही माळ आता आणखी चांगली बांधायला पाहिजे. आईला म्हटलं कि ही माळ तुटल्यामुळे Problems येतायत तर आपण ती चांदीत बांधून घेऊयात. ती लगेचच हो म्हणाली आणि तिने ओळखीच्या सोनाराकडून ती माळ बांधून आणली सुद्धा. तरी ती चांदीत बांधलेली माळ पुन्हा एकदा Unexpectedly तुटली आणि पुन्हा एकदा एक Unexpected घटना घडली. दोन वर्षात ४-५ वेळा माळ तुटल्यानंतर मात्र मी हार मनाली आणि ही माळ आपल्याकरीता नाही म्हणून काढून कपाटात ठेवून दिली.
पण त्यानंतर एक दिवस माझं जानवं तुटलं आणि असंच काहीतरी विचित्र घडलं. तो काळच असा होता की घरातले आम्ही करायचो एक आणि व्हायचं भलतंच. माझ्या हळूहळू लक्षात यायला लागलं की माळेचा झालेल्या घटनेशी काही संबंध नाही पण हा एक शकुन असू शकेल. आता पूर्वी झालेल्या घटनांचे आणि पुस्तकात दिलेल्या शकुनांच्या अर्थाचं Reinterpretation मी करायचं ठरवलं. पुढे त्यातून असं लक्षात आलं की पुस्तकातला Exact अर्थ Match झाला नाही तरी Logically ते सगळं Correlate करता येतं.
यानंतर मात्र मी शकुनाकडे एक Opportunity म्हणून पाहायला लागलो आणि याचा मला खूपच फायदा झाला. एखादी घटना घडायच्या आधीच जर आपल्याला काही Indications मिळत असतील तर हे फार उपयोगी आहे असं माझ्या लक्षात आलं आणि याने घाबरून ना जाता मी जास्त सजगतेने याकडे पाहायला लागलो.
जर निसर्ग आपल्याला येणाऱ्या चांगल्या वाईट घटनेची आधीच कल्पना देत असेल तर आपण निसर्गाचे आभार मानले पाहिजेत. मात्र कोणतीही Analogy जास्त Stretch केल्याने ती चुकू शकते म्हणून उगीचच ते सारखं डोक्यात घेऊन बसण्यात अर्थ नाही. जुन्या ग्रंथानुसार कोणतीही निर्णायक घटना घडण्यासाठी ३ चांगले किंवा ३ वाईट शकुन होणे आवश्यक आहे त्यामुळे शकुनांचे परिणाम सहसा दूरगामी नसतात. उगीच घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. शकुन हे Indicators आहेत, तेव्हा काळजी घ्यावी आणि आपलं काम करावं. उगीच डोक्याचा भुगा करण्यात अर्थ नाही हे माझ्या लक्षात आले.
प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे निसर्ग सहाय्यभूत होत असतो. आमच्या घरात काहींना स्वप्नं पडतात आणि ती बऱ्याच अंशी खरी होतात. माझ्या आजोबांना तर जगात कुठेही भूकंप झाला तर लक्षात यायचं आणि ते झोपेतून सुद्धा ओरडत उठायचे. माझ्या बायकोला General Intuitions येतात तिने बाहेर पडताना जर विचारलं कि सगळं घेतलंय ना कि समजायचं आपलं काही तरी नक्की राहिलंय. मी बापडा मात्र अजूनही शकुनांवरच अवलंबून असतो.
तेव्हा यापुढे जर मांजर आडवी गेली, कावळा ओरडला किंवा पाल चुकचुकली तर शकुनांचे शब्दशः अर्थ घेऊ नका. Context नुसार अर्थ घेऊन Corrective Action काय घ्यायची याचा विचार करा. निसर्ग तुम्हाला कश्याप्रकारे Signals देतो ते शोधा म्हणजे आयुष्य थोडं आणखी सोपे होऊ शकेल. कावळ्याच्या काही गमती जमती येत्या Posts मधे सांगतो.
क्रमशः
(c) Gaurish Borkar #DaiviAnubhav #GaurishBorkar
Comments
Post a Comment