Posts

Showing posts with the label Personal Experiences

माझे दैवी अनुभव भाग 3

  ज्योतिषाचा अभ्यास सुरु असताना घरात आणि बाहेरून  एक Suggestion येत होती ती म्हणजे उपासनेशिवाय भविष्य खरं येत नाही. आणखीन एक interesting गोष्ट सगळे जण सांगत होते की आपण ज्या व्यक्तीचं भविष्य पाहतो त्याचे सगळे Problems आपल्यावर येतात. हे दोन्ही प्रकार मला काही Logically समजत नव्हते. त्यात घरामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की यात काही तथ्य आहे की काय अशी शंका मला येऊ लागली. कोणतीही गोष्ट Reject करण्यापेक्षा ती Try केल्याने त्याबद्दल आपल्याला जास्त समजतं असं माझे मत आहे म्हणून मी काही उपासना स्वतःकरता ठरवून घेतल्या आणि करायला लागलो. अर्थातच त्या फार वेगळ्या होत्या. त्यातली एक म्हणजे गादीवर झोपायचं नाही, दुसरी गार पाण्याने अंघोळ करायची, तिसरी कांदा लसूण खायचा नाही, चौथी म्हणजे मी गुरुवार, शनिवार व चतुर्थीचे उपवास सुरु केले. आणि शेवटची म्हणजे सच्चीदानंद या मंत्राचा येता-जाता जप करायचा. सच्चीदानंद हा मंत्र फार Powerful आहे असं मी एका पुराणात वाचलं होतं म्हणून तो मंत्र घ्यायचं मी ठरवलं. याचबरोबर आमच्याकडे १०८ पंचमुखी रुद्राक्ष पडून होते त्यातल्या ५४ पंचमुखी आणि ३ चतुर्मुखी रुद्रा...

माझे दैवी अनुभव भाग २

       शाळेतील २ भाकिते मला नीट आठवतात. आमच्या शाळेतील एका शिक्षकांच्या घरी माझे जाणे होते. मी कधी कधी रविवारी संध्याकाळी त्यांच्या घरी जात असे. त्यामुळे बोलण्याच्या ओघात त्यांना मी ज्योतिष शिकतो हे माहित झाले. त्या वर्षी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी त्यांचे नाव सुचवण्यात आले होते आणि त्यांना जर पुरस्कार मिळाला तर ती त्यांच्या Career मधली अतिशय मोठी गोष्ट ठरली असती. सहज बोलण्याच्या ओघात त्यांनी गम्मत म्हणून मला विचारले की मला राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळेल का? प्रश्न कुंडली (प्रश्न विचारला त्या वेळेची पत्रिका) पाहून मी म्हटले की हो तुम्हाला नक्की हा पुरस्कार मिळेल. त्यांचा यावर विश्वास बसेना त्यामुळे ते चटकन म्हणून गेले की जर मला हा पुरस्कार मिळाला तर मी पहिला पेढा तुला भरवेन. त्यानंतर ज्यावेळी त्यांना कळलं की माझे चुलत आजोबा ज्योतिषी आहेत त्यावेळी ते आमच्या घरी आले आणि त्यांनी हाच प्रश्न विचारला. आजोबांनी त्यांना सांगितलं की मी दिलेले उत्तर योग्य आहे. पुढे तो पुरस्कार त्यांनाच जाहीर झाला. सरानी शब्द पळाला. माझ्यासाठी ती फारच Ackward Moment होती कारण त्यांनी मला व...

माझे दैवी अनुभव भाग १

   देव, देवता, भुतं, खरी आहेत का? उपासना पूजा वगैरे फळाला येतात का? बाबा, स्वामी, महाराज हे खरे असतात का? मंत्र तंत्र वगैरे यात काही अर्थ आहे का? असे अनेक प्रश्न आपल्या अनेकांना पडतात. पूर्वी माणसे यावर सहज विश्वास ठेवत असत पण आता तशी परिस्थती राहिली नाही. जसे जसे आपण शास्त्रीय दृष्टीने विचार करू लागलो तसे तसे जे आधुनिक शास्त्र सांगत नाही किंवा सिद्ध करत नाही ते खरं असेल का ? अशी शंका अनेक जण घेऊ लागले आहेत. कोणत्याही गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवण्यापेक्षा आपण पडताळून पाहावी या मताचा मी स्वतः सुद्धा आहे. आणि यातूनच अनेक गोष्टींचा पडताळा घेण्याचे प्रयन्त मी अगदी शाळेत असतानाच सुरु झाले आणि त्यानून मला अनेक अनुभव सुद्धा आले.  ते जसा वेळ मिळेल तसे मांडेन म्हणतोय. पाहूया कास जमतंय ते.     माझे आजोबा गोव्यातील एक प्रख्यात ज्योतिषी होते पण ते मी दुसरीत असतानाच निवर्तले. त्यानंतर एक कावळा सतत ३ दिवस येऊन माझ्या डोक्यावर टोच मारून गेला. या प्रसंगाचा अर्थ अजूनही मला अगम्यच आहे त्यामुळे मी त्याला Coincidence असंच म्हणतो. आयुष्यात होणाऱ्या घटनांच्या मागे काही कार...