पुस्तक : वैदिक नक्षत्र ज्योतिष
वैदिक ज्योतिषामध्ये नक्षत्रांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. वैदिक ज्योतिषाच्या काही शाखांमध्ये नक्षत्रे मुख्यत्वाने उपयोगात आणली जातात पण सर्व शाखांमध्ये त्यांचा वापर विशेष दिसत नाही. नक्षत्रांची संख्या राशींपेक्षा दुपटीहून जास्त असल्याने काहींना नक्षत्र ज्योतिषाचा अभ्यास आव्हानपूर्ण वाटू शकतो. वैदिक ज्योतिष मुख्यत: नक्षत्रावर आधारित होते आणि काळाच्या ओघात ते राशी आधारित झाले असावे. हे सहज घडलेले स्थित्यंतर आहे की जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न हे कळायला काही मार्ग नाही.
वेद हे ज्ञानाचे भंडार आहे यात दुमत नाही पण वेदांचा अर्थ कसा समजायचा हे मात्र मोठे आव्हान आहे आणि यामुळेच आपली वेदांची समज सीमित राहीली आहे. आनंदाचा भाग असा की वेद आपल्यापर्यंत परंपरेने आले आहेत आणि आपण त्याकडे नविन दृष्टिकोनातून पाहू शकतो.
नक्षत्रें हा मुहूर्त ज्योतिषाचा अविभाज्य भाग आहे आणि त्याचबरोबर तो वैदिक संस्कृतीचा सुद्धा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे नक्षत्र आणि वैदिक संस्कृती सहजच एकमेकांशी जोडली गेली आहेत.
माझा असा समज आहे की वैदिक ज्योतिष आधी रोजच्या व्यवहारात उपयोगात येउु लागले आणि नंतर त्याचा उपयोग वैयक्तिक जीवनात होउु लागला आणि त्यामुळेच की काय बृहत्संहितेसारख्या ग्रंथात नक्षत्रांचा बर्याच अध्यायांमध्ये उल्लेख आढळतो.
संपूर्ण हिंदू संस्कृती, सण, उत्सव, संस्कार, परंपरा, चाली-रीती या नक्षत्रांवर आधारित असल्याचे हे पुस्तक वाचताना सहज आपल्या लक्षात येईल. आपण या पुस्तकामध्ये नक्षत्रांचा संस्कृतीशी असलेला संबंध समजून घेणार आहोत. त्याचबरोबर हे पुस्तक आपल्याला आपले सण चांगल्या प्रकारे समजायला मदत करेल आणि त्यांचा ऐहिक जीवनातील उपयोग विशद करेल.
सामान्यपणे नक्षत्रांचा उपयोग गुणमेलनासाठी होतो. नक्षत्रांवर आधारित गुणमेलन उपयोगात आणण्याची पद्धत व्यवस्थित समजून घेतल्यास नक्कीच लाभदायक आहे.
नक्षत्र आणि वेद यांचा खरा संबंध नक्षत्रांच्या देवता व त्यांच्या कथांमधून प्रकाशित होतो. नक्षत्र देवता निवारणार्थ उपाययोजनांमध्ये सुद्धा कथा अतिशय महत्त्वाच्या आहेत.
प्रत्येक काळाची आणि वाङमयाची एक भाषा असते अगदी तशीच वेदांची सुद्धा एक भाषा आहे आणि जोपर्यंत आपण ती समजणार नाही तोपर्यंत आपल्याला वेद नीटसे समजणार नाहीत. वेदांमधील कथा व देवता समजून घेण्याचा व त्यांच्याशी नक्षत्रांना जोडण्याच्या प्रक्रियेतला हा माझा छोटासा प्रामाणिक प्रयत्न आहे. अनेकदा वेदांना केवळ प्रार्थना आणि कथांना केवळ कल्पना मानलं जातं. त्याचबरोबर भारतीय सणांना खुळचटपणा समजला जातो आणि याचं कारण यामागचा उद्देश बर्याच जणांना नीटसा माहिती नाही हेच आहे.
वेदांमधील सूक्तांचा शास्त्रीय दृष्टीकोन जगासमोर आणावा, वेदांमधील देवतांचे अर्थ सांगावे व वेदांमधील प्रतिकांचे अर्थ मांडावे हा या पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे. आपण जर हे ज्ञान रोजच्या आयुष्यात आणले तर आपलं आयुष्य आनंदी व सुखी करु शकतो यात तीळमात्र शंका नाही. जरी मी वाचकांच्या जीवनामध्ये थोडीसुद्धा भर घालू शकलो तरी ते या पुस्तकाचे मोठे यश आहे. त्याचबरोबर जर वाचक वैदिक वाङमयाचा आदर करु लागले आणि त्याचे काही प्रमाणात अनुसरण करु लागले तरी ते या पुस्तकाचे मोठे यश आहे.
माझा असा विश्वास आहे की हे पुस्तक आपल्या ज्ञानात नक्कीच भर घालेल आणि आपले जीवन आणखी आनंददायी करेल.
पुस्तकाची किंमत ४०१ रुपये असून हे पुस्तक येथे (https://gaurishb.stores.instamojo.com/vaidik-nakshatra-jyotish-marathi/p3083640/) उपलब्ध आहे.
Comments
Post a Comment