ॐ कार प्रधान
दर वर्षी स्वस्ति कोणत्या तरी workshop मध्ये जाऊन शाडूच्या मातीचा गणपती करायची पण त्याने ती एवढी खुश नसायची कारण तिला मदत घ्यायला फार आवडत नाही. Sculpture हे तिचं आवडतं skill आहे त्यामुळे तिला स्वतःला कोणाचीही मदत न घेता गणपती करायचा होता. त्यांच्या शाळेत गेल्यावर्षी पासून sculpture शिकवू लागले. ती सुद्धा बारीक सारीक काही काही करत गेली. या वर्षी म्हणाली की दादाला (म्हणजे सरांना) सांगून मी शाळेतून गणपती करुन आणते. मागचा अनुभव पाहता मी म्हटलं की पण शाडूची माती ठिसूळ असते. गणपती घरी पोहोचेपर्यंत राहील ना? आणि पावसाचे दिवस आहेत त्यामुळे मूर्ती सुकेल तरी का?
स्वस्ति म्हणाली ओलीच मूर्ती घरी आणते म्हणजे काही झालं तर पुन्हा जोडणं सोपं पडेल. Finishing पण घरी आल्यावरच करते. शाळेतून गणपती आला न आला तरी पण दुकानातून आणण्याऐवजी यावर्षी घरातल्या गणपतीचीच पूजा करायची असं आम्ही ठरवलं.
तसं सगळं अवघड होतं कारण Van मधे 8-10 तरी मुलं असतात. शाळा घरापासून पंधरा एक किलोमीटर लांब आहे. मुलं van मध्ये मजा मस्ती करतात. त्यामुळे गणपतीचं हे आगमन फार सोपं वाटत नव्हतं. आणि van काही तिला अगदी घरापर्यंत सोडत नाही. आम्हाला दोन एक किलोमीटर जाऊन pick करावं लागतं.
रोज भरपूर पाऊस असला तरी rain coat घालून bike वर pick up करायला जाणारा मी त्या दिवशी थोडा पाऊस असूनही चुकून car च्या keys घेऊन खाली उतरलो. स्वस्तिही नेहमीपेक्षा van मधून जरा अलगद का उतरत आहे, हे पहिलं तर तिच्या हातात हे साक्षात गणेश होते. तेही अगदी धक्का सुद्धा न लागता तसेच्या तसे आलेले. मग हे बाप्पा car मध्ये विराजमान झाले आणि काहीही गाजावाजा न होता शांतपणे घरी आले.
ज्ञानाची देवता शाळेतून म्हणजे विद्येच्या घरातून शांतपणे आपल्या घरी येणं यासारखा दुसरा कोणता योग असू शकतो असा विचार माझ्या मनात सुरु असतानाच घरी आल्यानंतर स्वस्तिने cake च्या खाली ठेवतात तो पुठ्ठा काढला आणि acrylic colours नी रंगवायला घेतला.
तसा फार वेळ नव्हताच पण त्यातल्या त्यात तिने एक साधं सोपं design काढलं आणि चटकन रंगवून पूर्ण केलं. बाकी चौरंगावर वस्त्र कोणत्या रंगाचं घालयंच ते शोधून अंथरलं आणि त्याला साजेश्या रंगाचा कागद श्री गणेशजीना विराजमान करण्यासाठी ठेवला. पार्थिव मूर्तीला थोडेसे finishing touches दिले आणि तिचं काम पूर्ण केलं. मला अगदी गोव्याला घरी गणपती बसवायचे त्याची आठवण झाली.
यावेळी पहिल्यांदाच तिच्या मनातील श्री गणेशाची मूर्ती, तिने ठरवलेलं decoration आणि तिनेच केलेली तयारी. अगदी स्वतंत्रपणे. हे तिच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. ती मूर्ती सुद्धा शाळेतून निघून मुलांच्या van मधून त्यांच्या गोंधळात 14 किलोमीटर स्वतःची मिरवणूक काढत शांतपणे घरी आली होती.
मूर्ती सुबक नसली तरी सजीव वाटत होती. पुढे प्राणप्रतिष्ठा करण्याचं काम आमच्यावर होतं. Tax filing चा season सुरु असूनही कल्याणीने दरवर्षीप्रमाणे थोड्या का होईना पण उकडीच्या मोदकांचा घाट घातलाच होता. स्वस्तिने या वर्षी त्यात विशेष interest दाखवला. भाऊंना (बाबांना) ठरल्याप्रमाणे Dialysis ला सोडून घरी येऊन अंघोळ करुन श्रींची पूजा पूर्ण केली आणि आरती करुन नैवेद्य घेत असतानाच Phone खणाणला. हॉस्पिटल मधून डॉक्टरांचा phone होता. बाबांचं sensorium एवढं ठीक वाटत नाहीये तेव्हा आपण त्यांना admit करूया. गणपतीच्या आदल्या संध्याकाळी ही सगळी गणपतीची तयारी सुरु असताना घरीच असा एक episode झाला होता आणि ते doctor ना कळवलं सुद्धा होतं. त्यांना बराच cough झाल्यामुळे infection असावं असा माझा अंदाज होता. दरवर्षी ऑगस्ट मध्ये त्यांचं एक hospitalization असतं त्यामुळे ते 15 सप्टेंबरच्या आत होऊ शकतं याची कल्पना मला तशी होतीच. पण मागच्या 2 वेळा काढलेल्या तारखा तंतोतंत बरोबर असल्याने कल्याणीने मला, तारीख काढू नकोस त्यामुळे उगीचच tension येतं असं बजावल्याने मी यावेळी तारीख काढलेली नव्हती. मी डॉक्टर ना म्हटलं की ठीक आहे तुम्ही पुढची procedure सुरु करा मी आत्ता जेवतोय तेव्हा हात धुऊन निघतो.
गणपतीचा काळ तसा intense असतो त्यामुळे या काळात अनेक घडामोडी सुरु असतात. गणपतीच्या काळात जे घडतं त्याची जबाबदारी श्री गणेशावर ढकलून काहींनी तर घरी गणपती बसवणे सुद्धा बंद केलंय. गणपती लाभत नाही वगैरे काही नसावं असं माझं वैयक्तिक मत आहे.
हॉस्पिटलमध्ये जाऊन बघितलं तर भाऊ अगदीच dull होते डोळे सुद्धा उघडत नव्हते, BP आणि Pulse low होती, डॉक्टरसुद्धा काळजीत होते. त्यांना एक antibiotic देऊन ICU मध्ये हलवूया असं dr नी सांगितलं. त्यानुसार पुढच्या steps घेतल्या.
देवाकडे काही मागणं मला कधीच आवडलं नाही त्यामुळे कोणासाठी तरी चुकून काहीतरी मी मागितलंय सुद्धा पण माझ्यासाठी अजून तरी नाही. मागे एकदा स्वामींच्या आरोग्यासाठी आईकडे (देवीकडे) प्रार्थना केली आणि स्वामींचा ओरडा खाल्ला होता. तेव्हापासून तर कोणासाठीही मागणं हा विषय पूर्णच बंद झाला. जे योग्य असेल ते होईल एवढाच विचार मनात होता. या सगळ्यात स्वस्तिला गणेश पूजनासाठी शाळेत सोडणं काही शक्य झालं नाही. संध्याकाळी घरी येवून गणेशाची पूजा आणि आरती केली आणि जेवण द्यायला हॉस्पिटलमध्ये गेलो. भाऊंना उठवलं म्हटलं कसं आहे तर ठीक आहे म्हणाले. Dr म्हणाले BP चढत नाहीये त्यामुळे आपण syringe pump ने औषध लावणार आहोत. Pneumonia वाटतोय. मला गेल्या वर्षीच्या ऑगस्ट मधला सगळा episode आठवला. म्हटलं ठीक आहे. भाऊ फार बोलत नसले तरी त्यांचं घरात लक्ष असतं. त्यामुळे त्यांनी स्वस्तिने केलेला गणपती पाहिला होता. त्यांना गणेश पूजेचा photo दाखवला. त्यावेळी ते हसले, स्वतः कडे हात दाखवला आणि म्हणाले चला म्हणजे गणेश चतुर्थी अशी संपन्न झाली तर. Dr म्हणाले की ते एवढे alert सकाळपासून कधीच नव्हते. Alertness येण्यासाठी कधी कधी context उपयोगी पडतं. भाऊंना ते उपयोगी पडलं. इंजेकशन सुरु झाल्यानंतर BP पण वाढलं. काल सकाळी ते कल्याणीला म्हणाले की हा तोच गणपती ना जो स्वस्तीने केला होता नाही का? त्यांचं sensorium improve होतंय याची ती sign होती.
यावेळी गणेशाची energy आणि vibes फारच होत्या. मला आणि कल्याणीला दोघांनाही त्या जाणवल्या. फार वेळ काही करणं शक्य नव्हतं पण या सगळ्यात एक 10 minutes देवासमोर ध्यानाला बसणं संध्यकाळी झालं. त्यात लक्षात आलं की 'हे माझं आहे' हा जसा ego आहे तसंच 'हे माझं नाही' हा सुद्धा एक सूक्ष्म ego आहे. त्यामुळे आपण निवांत असावं. निवांत हा स्वामींचा आवडता शब्द होता. हैद्राबादला जाण्यापूर्वी त्यांनी मला सांगितलं होतं की यापुढे तू निवांत रहा. पण रजोगुण आपल्याला सहज निवू देत नाही. त्यामुळे ते काय म्हटत होते हे कळायला पुढची बरीच वर्ष लागली.
काल दुपारी मला आणि कल्याणीला पुन्हा गणेशासमोर एक 10 minutes ध्यानाला बसता आलं आणि पुन्हा थोडं energize व्हायला झालं. मी कल्याणीला म्हटलं की संध्याकाळी या मूर्तिचं विसर्जन करणं फार अवघड होणार आहे. पण संध्याकाळी उत्तरपूजेला बसलो आणि हळू हळू मूर्तिमधला प्राण कमी झाला.
खरं म्हणजे या सगळ्या गोष्टींवर माझा कधीच विश्वास नव्हता आणि हे सगळं अनुभवायची कधी इच्छाही नव्हती. पण अनुभवाल्यानंतर ती माझी कल्पना असावी असं नक्कीच वाटत नाही. कारण त्यात repeatability आहे. पण हे दाखवून देणं मात्र तसं अवघड आहे. पाहूया.
संध्याकाळी प्लास्टिकच्या tub मध्ये साचलेल्या पावसाच्या पाण्यात नेहमीप्रमाणे श्रींची मूर्ती विसर्जित करताना मनात आलं की प्रकृतीने मूर्त स्वरूप सोडलं तरी स्वरूप बदलून ती थोडीशी तरी राहत असावी. गणेश विसर्जनाचं खरं गमक हेच असावं. स्वामींनी मला हे समाजावण्याचा प्रयत्न एकदा केला होता पण मला ते फार रुचलं नव्हतं.
Balcony मधून आत येता येता कल्याणी म्हणाली की मला माझी विसर्जनाची कविता फार आवडते कधी कधी हे मलाच सुचलंय यावर माझा विश्वासच बसत नाही.
मी म्हटलं कुठली? तेव्हा तिने पुढील ओळींची आठवण करुन दिली आणि गणेश चतुर्थी सुफल संपूर्ण झाल्याचा feel आला.
©गौरीश बोरकर
निरोप....
पुन्हा परतुनी येण्या
आधी लागतसे जावे
रूप साठवूनी मनी
गीत निरोपाचे गावे
ज्याने निर्मिले तयाचे
करू कैसे विसर्जन
विसर्जिता देहबुद्धी
लागे त्याच्या ठायी मन
नकळे देहबुद्धी
घेतो भाबडा निरोप
यावे भेटायासी देवा
जरी सूक्ष्म तुझे रूप
©कल्याणी बोरकर
#gaurishborkar
#thinkingoutloud
Comments
Post a Comment