आमचे स्वामी ७
मला वाटतं साधारण २००१ मधे स्वामीजी भांडारकर रोड वरच्या त्यांच्या घरातून तेजोनिधीला कर्वेनगरला रहायला गेले आणि त्यानंतर त्यांनी मला पहिल्यांदा काही कामासाठी घरी बोलावलं.
काही एक वस्तू कोणाकडेतरी पोहोचवायची होती. मला नक्की आठवत नाही. स्वामीजीनी काम सांगितलं आणि मी उभ्या उभ्याच म्हटलं की हो हो ठीक आहे मी करतो. स्वामीजी म्हणाले आधी इथे बैस, मी सांगतो आहे तो पत्ता नीट समजून घे आणि मग तिकडे जा. पत्ता ऐकता ऐकता माझ्या लक्षात आलं की आपण कुठे तरी दुसरीकडेच जाणार होतो.
कसंतरी केलेलं काम स्वामींजींना अजिबात पसंत नसायचं. काम ठराविक वेळात आणि Precision नेच त्यांना व्हायला हवं असायचं.
"Excellence is the mark of spirituality." हे गुरुदेव रानडे यांचं quotation ते अनेकदा प्रवचनांमधे ते quote करायचे. बोलताना ते सहज म्हणायचे की "आपलं काम Prefect च असलं पाहिजे."
पुढे एकदा आम्ही स्वामींना receive करायला मुंबईला गेलो. स्वामीजी त्यांचा अमेरिका दौरा पूर्ण करून परतत होते. आम्ही 2 cars घेऊन गेलो होतो. Flight on time आलं. स्वामीजींना घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. रात्रीचा एक-दीड वाजला होता. मी स्वामीजीच्या Car मधे होतो. दुसरी Car आमच्यापुढे होती. स्वामीजी अमेरिका दौऱ्यातल्या गमती जमती सांगत होते. ते एकदम म्हणाले की आपण कुठे चाललोय विचार, नाहीतर निघालोय पुण्याला आणि ते आपल्याला ठाण्याला पोचवायचे. मी म्हटलं हो मी पाहतो. ते म्हणाले नाही, पुढच्या Car मधे कोणाला तरी phone कर. ते आपल्या पुढे आहेत रस्ता पाहणं त्यांचं काम आहे. मी पुढच्या Car मधे Phone करून सांगितलं. त्यांनी चौकशी केली तेव्हा कळलं की आम्ही खरंच ठाण्याच्या दिशेने जात होतो.
समर्थांनी मूर्ख लक्षण या दशकातील उत्तम लक्षण या समासात म्हटलंय की
वाट पुसल्याविण जाऊं नये । फळ वोळखिल्याविण खाऊं नये ।
पडिली वस्तू घेऊं नये । येकायेकीं ॥ २ ॥
खरं तर हा common sense आहे त्यामुळे मला नेहमी वाटायचं की हे समर्थांनी कशाला बरं सांगितलं असेल? पण या दोन प्रसंगातून त्याचं उत्तर मिळालं. आपण कधी ना कधी ही चूक करतोच.
सगळ्यांना आग्रहाने खायला घालायला स्वामीजींना खूप आवडायचं. स्वामीजींनी पहिल्यांदा मला तेजोनिधीला बोलावलं तेव्हा विचारलं की आज आमच्याकडे डोसे आहेत तू खाणार आहेस का? मी सहजच नको म्हटलं. स्वामीजी म्हणाले नाही कसं? थोडं तरी खावंच लागेल. Maple Syrup आणि डोसे फार`सुंदर लागतात. त्या आधी मी कधीच Maple syrup खाल्लं नव्हतं. स्वामीजी सगळीकडे Maple Syrup शोधत होते. मी म्हटलं असूदेत एवढं काय त्यात. शेवटी त्यानी मला Maple Syrup वाढलं आणि मगच ते खायला बसले.
यानंतर स्वामीजीच्या घरी येणं जाणं थोडं वाढलं.
रविवारी सकाळी प्रवचनानंतर स्वामीजीकडे नाश्त्याला पोहे आणि संतोषच्या Patties असायच्या. स्वामीजी त्यावेळी काही जणांना घरी बोलावत. पण स्वामीजी किती जणांना बोलावतील याचा काही नेम नसे. Plate मधले पोहे कमी जास्त करून त्यात Patties ची भर घालायची असा या मागचा उद्देश असावा.
एकदा स्वामीजीनी मला आणि एका नेहमीच्या युवकाला घरी बोलावलं. तो मला म्हणाला आज स्वामीजीकडे खूपच माणसं येणार आहेत आपण काही तरी खाऊन जाऊया. तोपर्यंत स्वामीजी मला बऱ्यापैकी माहीत झाले होते. मी त्याला म्हटलं, माझी तर बाबा स्वामीजीकडे खाऊन जायची हिम्मत नाही. तो म्हणाला तसं नाही, आज खूप माणसं आहेत तेव्हा काही कमी पडलं तर म्हणून मी म्हणतोय. मी म्हटलं मग स्वामीजी आपल्यालाच काही तरी घेऊन यायला सांगतील. ते आपण घेऊन येऊ. तो थोडा आकसाने म्हणाला की मी एक डोसा खाऊन घेतो. मग त्याने उभ्या उभ्याच पटकन`एक डोसा एका stall वर खाल्ला आणि आम्ही तेजोनिधीला पोचलो. आत जाता जाताच मी त्याला warn केलं की आज तुझं काही खरं नाही. स्वामीजी Hall मधे उभेच होते. त्यांनी आमच्याकडे एक तीक्ष्ण नजर टाकला आणि विचारलं कुठे होतात? आम्ही दोघं काहीच बोललो नाही. मग स्वामीजीनी फक्त मला विचारलं की तू काही खाणार आहेस का? मी नेहमीप्रमाणे हो म्हटलं. स्वामीजी स्वतः पोहे आणि Patties च्या २ Plates भरून घेऊन आले. एका Plate मधे नेहमीप्रमाणे पोहे आणि एक Patti होती. दुसऱ्या Plate मध्ये भरपूर पोहे आणि 2 Patties होत्या. बाकी बरीच मंडळी तिथे बसलेली होती. स्वामीजीनी माझ्या हातात एक Plate दिली आणि दुसरी Plate त्याला दिली. माझ्या वाट्याला एकच Patti होती आणि त्याच्या वाट्याला दोन! मी मनात म्हटलं आता तर खरी गंमत सुरु झालीये आणि त्याच्याकडे बघून नुसताच हसलो. माझं खाणं संपल्यावर स्वामीजीनी मला विचारलं की तुला आणखी हवंय का? मी आपलं नको म्हटलं आणि Plate आत नेऊन ठेवली. आज स्वामीजी केवळ आमच्या दोघांच्याच खाण्याकडे एवढे जातीने का लक्ष देत आहेत हे कोणाच्याच लक्षात येईना. पण याचं कारण फक्त आम्हा तिघांनाच माहीत होतं. त्याने कसेबसे पोहे आणि Patties संपवल्या. तो Plate ठेवणार तेवढ्यात स्वामीजी एक फराळाचा Bowl घेऊन आले. त्यात mostly लाडू आणि चकल्या होत्या. स्वामीजीनी त्याला न विचारता 2 चकल्या आणि लाडू वाढले. आम्ही सगळे स्वामीजीबरोबर काही चर्चा करत होतो आणि तो आपला वाढलेलं संपवत होता. यात साधारण साडे अकरा वाजले. तेवढ्यात कोणी तरी म्हणालं सुद्धा की आज स्वामींजींचं यांच्यावर विशेष लक्ष दिसतंय. मी आपला पुन्हा हसलो. त्याची Plate संपता संपता स्वामीजी चिवडा घेऊन आले आणि त्याला म्हणाले वाढू का? आणखी वाढू? शेवटी तो बिचारा उभा राहिला आणि त्याने नको नको म्हणत त्यांना नमस्कारच केला. तेवढ्यात आशाताई म्हणाल्या Daddy केवढं वाढताय त्याला आता पुरे ना. काय झालं हे कोणालाच कळेना. स्वामीजी नुसतेच हसले आणि kitchen मधे निघून गेले.
स्वामीजी खूपच Humorous होते. ते नेहमीच सगळ्यांबरोबर मजा करायचे, कधी कोणाची मजा घ्यायचे पण वातावरण अतिशय light ठेवायचे. सगळं अगदी हसत खेळत सुरु असायचं. त्यामुळे अध्यात्म कधीच बोजड वाटलं नाही आणि Boring तर मुळीच वाटलं नाही. पण उगीच काही शहाणपणा केला तर मात्र खैर नसायची. अशा आणखी गमती जमती आता येत्या भागात सांगतो.
-गौरीश बोरकर
ऑगस्ट ३० २०२६
#aamacheswami
Comments
Post a Comment