माझे दैवी अनुभव भाग 3

  ज्योतिषाचा अभ्यास सुरु असताना घरात आणि बाहेरून  एक Suggestion येत होती ती म्हणजे उपासनेशिवाय भविष्य खरं येत नाही. आणखीन एक interesting गोष्ट सगळे जण सांगत होते की आपण ज्या व्यक्तीचं भविष्य पाहतो त्याचे सगळे Problems आपल्यावर येतात. हे दोन्ही प्रकार मला काही Logically समजत नव्हते. त्यात घरामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की यात काही तथ्य आहे की काय अशी शंका मला येऊ लागली.

कोणतीही गोष्ट Reject करण्यापेक्षा ती Try केल्याने त्याबद्दल आपल्याला जास्त समजतं असं माझे मत आहे म्हणून मी काही उपासना स्वतःकरता ठरवून घेतल्या आणि करायला लागलो. अर्थातच त्या फार वेगळ्या होत्या. त्यातली एक म्हणजे गादीवर झोपायचं नाही, दुसरी गार पाण्याने अंघोळ करायची, तिसरी कांदा लसूण खायचा नाही, चौथी म्हणजे मी गुरुवार, शनिवार व चतुर्थीचे उपवास सुरु केले. आणि शेवटची म्हणजे सच्चीदानंद या मंत्राचा येता-जाता जप करायचा. सच्चीदानंद हा मंत्र फार Powerful आहे असं मी एका पुराणात वाचलं होतं म्हणून तो मंत्र घ्यायचं मी ठरवलं. याचबरोबर आमच्याकडे १०८ पंचमुखी रुद्राक्ष पडून होते त्यातल्या ५४ पंचमुखी आणि ३ चतुर्मुखी रुद्राक्षांची माळ तयार करून घेतली आणि लगेच घालायला लागलो! (१०८ ची फारच मोठी होत होती ना म्हणून फक्त ५४!). 

काही दिवस मी गार पाण्याने अंघोळ केली अगदी ६ अंश तापमान असताना सुद्धा केली पण त्यात काही अर्थ आहे असं मला पटत नव्हतं म्हणून त्यात सातत्य राहिलं नाही. जमिनीवर सतरंजी घालून झोपणं हे मला फारच Convenient होतं कारण अंधारुणांच्या घड्या करणं कमी झाले त्यामुळे मी ते पुढे अनेक वर्षं सुरु ठेवलं. कांदा लसूण खाणार नाही हा घरच्यांना तसा Shock होता, पण माझे आजोबा कांदा लसूण खात नसल्याने थोडी सवय सुद्धा होती. या सगळ्यात आईने कां कुं करत ते मान्य केलं आणि त्याला कोणीही विरोध न केल्याने आमच्या घरात पुढे अनेक वर्षं कांदा लसूण विरहीत जेवण सगळयांनाच खावें लागलं. माझी आई कांदा लसूण ना घालता त्याच चवीचा स्वयंपाक करायची आणि त्यामुळे फार कोणी त्याला विरोध केला नसावा. सच्चीदानंद या मंत्राबद्दल मात्र घरातले लोक हसायचे आणि मी सुद्धा त्यांचं हसणं हसण्यावारी घ्यायचो. 

सुरवातीला सगळ्यांना वाटलं की हा लहान आहे त्यामुळे हे सगळं थोड्या दिवसात निवळेल पण जसं जसं मी ते seriously follow करत गेलो तसं तसं घरच्यांना tension आलं हो. आता हा बाबा (हा माझ्या आईचा शब्द आहे) लग्न वगैरे करणार नाही की काय? आणि करायचं म्हटलं तरी असल्या माणसाबरोबर आजच्या जगात लग्न कोण करणार? असे अनेक प्रश्न माझ्या घरच्यांना पडले. ते या गोष्टी मला उघडपणे बोलून दाखवू लागले. याला ज्योतिषाच्या Class ला उगीचच घातला की काय अशी शंका त्यांना येऊ लागली आणि यापेक्षा जरा पोटापाण्याचं बघा असं ते मला सांगू लागले. यात भर म्हणून मी ज्योतिष पाहायला अजिबात पैसे घेणार नाही असं ठरवल्यानंतर तर हा नसता उद्योग हवाय कशाला असं काही जणांना वाटायला लागलं आणि या सगळ्यातून माझा घरातला भाव हळूहळू कमी झाला. तशी आमची घरची परिस्थिती फार चांगली नसली तरी भविष्य सांगून पैसे कमवावे असं सगळ्यांचं मत नव्हतं पण पोराच्या भविष्याचं यात काय होणार याचं उत्तर सगळे शोधत होते. या सगळ्या प्रकारात मी लवकरच जमिनीवर आलो.

वर लिहिलेल्या उपासना आणि माझं मोफत ज्योतिष पाहणं मात्र पुढे ५-६ वर्षं सुरु राहिलं. याबद्दल आणि रुद्राक्षाच्या माळेच्या गमती जमती येत्या Posts मध्ये सांगतो.

क्रमशः

(c) Gaurish Borkar #DaiviAnubhav #GaurishBorkar


Comments

Popular posts from this blog

पुनर्जन्माच्या सत्यकथा: सनातन धर्म आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीतून पूर्वजन्म आठवणाऱ्या व्यक्तींचा अभ्यास

यथा पिंडे तथा ब्रहमांडे चा पुरावा