यथा पिंडे तथा ब्रहमांडे चा पुरावा


परवाच मुलीला सुट्टी लागली. सुट्टीत आमच्याकडे तात्विक चर्चा फार होतात कारण तेवढाच वेळ मिळतो. सकाळी ९ला शाळेत जाऊन संध्याकाळी ९ला परत येणाऱ्या मुलांना बाकी वेळ तरी कुठे असतो?

मुलीला शाळेत nutrition या विषयावर एक धडा आहे. त्याबद्दल आम्ही बोलत होतो. त्यात मुख्यत: झाडं अन्न कसं तयार करतात यावर चर्चा चालली होती. त्यात एक chemical equation आहे. Carbon Dioxide (Co2) व पाणी (H2O) यांच्या संयोगाने, सूर्याप्रकाशाच्या मदतीने Chlorofill असलेली म्हणजेच हिरवी झाडं Glucose म्हणजेच अन्न कसं तयार करतात. यावर चर्चा झडत होती.

मुलीने मला या सगळ्याबद्दल सखोल माहिती दिली.

जर झाडांना अन्न तयार करण्यासाठी सूर्यप्रकाश लागत असेल तर प्राण्यांना अन्न पचवण्यासाठी D Vitamin ची आवश्यकता असावी. मी माझा गावठी मुद्दा मांडला.

'बाबा, सूर्यप्रकाश म्हणजे D Vitamin नव्हे.' मुलीने माझा मुद्दा सरळ खोडून काढला. 

'हो, पण सूर्याप्रकाश म्हणजे अन्न नव्हे तरीही सूर्याप्रकाशाशिवाय झाडांमध्ये अन्न तयार होत नाही. हे तसंच आहे.' मी सफाई दिली.

अशीच चर्चा पुढे गेली. दावे प्रतिदावे झाले आणि 'याचं काहीतरी वेगळंच असतं' इथे येऊन चर्चा थांबली. शेवटी Google चा आधार घेऊन शहानिशा करायचं ठरलं.

Google केल्यावर, 

Yesss, असं मी जोरात म्हणालो आणि मुलीने माझ्याकडून mobile हिसकावून ती वाचण्यात दंग झाली.

हो खरंच, D Vitamin चा पचनाशी सरळ संबंध आहे.मुलगी म्हणाली.

आपल्या सगळ्यांना त्याचा Calcium Absorption शी संबंध आहे हे माहिती आहेच. पण त्याही पुढे जाऊन D Vitamin चा आतड्याला आलेल्या सुजेशी आणि पुढे Ulcerative Colitis शी सरळ संबंध आहे.

त्याचबरोबर आताड्यामधल्या gut microbiome च्या ecosyatem शी म्हणजेच gut flora शी D Vitamin चा संबंध आहे.

असं सगळं कळल्यावर ती वाचतच राहिली. कारण काही दिवसांपूर्वी तीला D Vitamin deficiency detect झाली होती आणि रोज सकाळी सूर्याप्रकाशात जाऊन उभं रहा हे माझं सांगणं तिला आवडत नव्हतं.

मग मी तिला थोडं आणखीन explain केलं. बऱ्याच दिवसापूर्वी तिला फार उलट्या होत होत्या आणि त्याचं Gastritis झाला असं निदान झालं. आमच्या नेहमीच्या डॉक्टरांनी औषध दिलं आणि पहिल्याच dose मध्ये बरं वाटलं. हा, म्हणजे Gastritis च असावा असं आमचं मत झालं. त्यानंतर खेळताना तीच्या बोटाला basket ball जोरात लागला आणि hairline fracture झालं. हल्ली मुलांना अगदी सहज fracture होतं ही गोष्ट माझ्या काही फार पचनी पडत नाही. गावी अगदी झाडावरून खाली पाडून सुद्धा काहीही न झालेली वयस्कर माणसं मी पाहिलेली आहेत. त्यामुळे हा फरक का? हा प्रश्न मला नेहमीच सतावतो. Fracture झाल्यावर orthopedic doctor ने naturally calcium दिलं पण ते Vitamin D द्यायचे विसरले असावेत. तिचा problem मुलीच्या Dentist ला पहिल्यांदा समजला. त्यांनी तिला नुसतं पाहूनच सांगितलं की हिला Vitamin D ची deficiency असणार आहे, तेव्हा लगेच test करुन घ्या. Test केल्यावर ती deficiency समोर आली आणि त्यावर उपाय सुरु झाले. Dentist ने हे सांगितलं ही गोष्ट त्यांच्या शाळेत सुद्धा पचनी पडली नाही. (कदाचित त्यांना सुद्धा Vitamin D deficiency असावी 😊).

हे सगळं मी मुलीला explain केल्यावर तीच्या सगळा sequence लक्षात आला. आणि तिने नुसतं हूम... म्हणत Vitamin D बद्दल आणखी वाचायला सुरुवात केली.

मी तिला हळूच म्हटलं, "मला काही medicine मधलं फार कळत नाही, ना मी nutritionist आहे. पण माझं 'यथा पिंडे' तर इथे सुद्धा लागू पडलं".

तिने पुन्हा नुसतं हूम... म्हटलं.

अगं सगळी भारतीय शास्त्र याच सूत्रामधून तयार झाली आहेत. संपूर्ण आयुर्वेद आणि योगशास्त्र यातून निर्माण झालंय.

कमीत कमी त्या Orthopedic doctor ने तरी D3 Check करायला सांगितलं पाहिजे होतं. - इति मुलगी.

एखादं तत्व जर खरं असेल तर ते विविध situations मध्ये apply होतं आणि तसं वापरून ते तावून सुलाखून घेतलं पाहिजे असं माझं मत आहे आणि 'यथा पिंडे' मी तसं वापरून पहिलं आहे.

वैदिक दृष्टिकोनातून जेव्हा आपण विचार करू लागतो तेव्हा कदाचित एखाद्या गोष्टीमागचं शास्त्र माहिती होणार नाही पण ती गोष्ट जगात कशी उपयोगात येते म्हणजे त्याचं application नक्की कळेल यात शंका नाही. तुमचा विश्वास नसेल तर तुम्हीसुद्धा ही तत्व समजून घ्या आणि वापरून पहा.

(C) गौरीश बोरकर


Comments

Popular posts from this blog

पुनर्जन्माच्या सत्यकथा: सनातन धर्म आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीतून पूर्वजन्म आठवणाऱ्या व्यक्तींचा अभ्यास