मधुमेहाची महामारी - २
सन २००५ च्या सुमारास आमच्या आध्यात्मिक गुरूंनी आम्हा सगळ्या युवकांची देहायष्टी लक्षात घेऊन WRG म्हणजे weight reduction group सुरु केला आणि आम्हाला एक ideal diet दिलं. त्यावेळी मी ७५ किलो होतो आणि कल्याणी ६४ किलो होती.
ते diet scientific होतं त्यामुळे त्याने माझं वजन अगदी हळू हळू म्हणजे जवळ जवळ ६ महिन्यात साधारण १० किलो कमी झालं. म्हणजेच मी ७५ वरून ६५ वर आलो. कल्याणीचं वजन सुद्धा साधारण ५ किलो कमी झालं. पण माझं वजन याहून कमी होईना म्हमून मी व्यायाम सुरु केला.
आमच्या office मध्ये त्यावेळी एक ex-army trainer येत होते आणि ते साधारण दीड तास non-stop व्यायाम घ्यायचे. ते व्यायाम करुन पुढे मी आणखी ४ किलो वजन कमी केलं आणि माझ्या ideal म्हणजे ६१ किलोवर आलो.
त्या काळात जवळ जवळ दीड वर्षं मी गोड पदार्थांना अजिबात स्पर्श केला नव्हता.
परंतु नंतर आम्ही दोघेही कधी कधी रात्री restaurant मध्ये एक starter खायचो आणि त्यामुळे आमचं दोघांचही वजन लग्नाच्या वेळी ६५ च्या आसपास होतं.
पुढे आम्ही हैद्राबादला गेलो, तिथे स्वयंपाकाचे अनेक प्रयोग केले. आणि गरोदरपणानंतर कल्याणी ८४ वर पोहोचली आणि मी ७८ वर.
वजन कमी कसं करायचं याचा यशस्वी formula आमच्याकडे होताच. तो follow करायचं आम्ही ठरवलं.
पण ज्यावेळी आम्ही तोच formula वापरून वजन कमी करायचा प्रयत्न करू लागलो तेव्हा मात्र वजन फार कमी होईना. थोडी internet वर शोधाशोध केल्यावर कळलं की ज्यावेळी आपण आपला आहार कमी करतो त्यावेळी देहाचा rate of metabolism सुद्धा कमी होतो. आणि जेव्हा पुन्हा थोडा आहार वाढतो तेव्हा वजन मात्र झप झप वाढतं कारण metabolism rate कमी झाल्याने देहाची आवश्यकता कमी झालेली असते. अशावेळी rate of metabolism वाढवण्याकरिता थोडा व्यायाम करणं आवश्यक असतं.
आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे restaurant मधलं किंवा ready to eat खाणं. Ready to eat म्हणजे अगदी काहीही biscuits, खारी, चकल्या, शंकरपाळी, चिवडा किंवा गोड पदार्थ.
बाजारातल्या या पदार्थांमध्ये काय घालतात कोण जाणे पण जर तुम्ही यातलं काहीही अगदी थोडं जरी खाल्लं तरी वजन एकदम वाढतं. म्हणजे diet ने दिवसाला जर ३०० grams कमी होत असेल तर साधारण ७०० grams वाढतं. पण तेच पदार्थ घरी केलेले खाल्ले तर मात्र असं भसकन वजन वाढत नाही.
आता अगदी परवाचं उदाहरण देतो. कल्याणी सध्या अगदी strict diet करायचा प्रयत्न करतेय. मुलीला सुट्टी आहे म्हणून आम्ही रेस्टॉरंट मध्ये जायचं ठरवलं. कल्याणी म्हणाली मी माझी शिदोरी बांधून घेते. तिला मीच म्हटलं की तू सुद्धा थोडं खा. तिने small pizza चे अगदी 3 तुकडे खाल्ले. दुसऱ्या दिवशी एकदम ७०० ग्रॅम वाढलं. पण आम्ही जेव्हा घरी pizza करतो तेव्हा medium size pizza चे २ तुकडे खाल्ले तरी सुध्दा असं होत नाही. विश्वास नसेल तर तुम्हीच मोजून पहा.
या सगळ्यामुळे व्यायाम करणं अत्यावश्यक असल्याच लक्षात आलं आणि व्यायाम सुरु केल्यावर आणखी एक मोठं surprise मिळालं ते पुढे सांगतो.
(C) Gaurish Borkar
#gaurishborkar
#diabetes
#thinkingaloud
Comments
Post a Comment