मधुमेहाची महामारी - ३
#madhumehachi_mahamari
मधुमेहाचा देहावर होणारा खरा परिणाम आम्हाला २०१७ पासून कळू लागला. दरवर्षी आईचे diabetologist तिला kidneys scan (mostly sonography) करायला सांगत आणि २०१७ मध्ये पहिल्यांदाच तीच्या kidneys चा आकार कमी झालेला दिसला. त्यानंतर पुढे सलग 3 वर्षे kidneys चा आकार कमी होत गेला. पुढे तिला Covid झाला आणि Covid मध्ये पहिल्यांदा याचे परिणाम दिसले. तिचे electrolytes imbalance झाले असावेत आणि त्यामुळे तिला भास होऊ लागले. त्यावेळी infection कमी होतं म्हणून ती घरीच isolation मध्ये होती आणि Covid चे काय काय side effects होतात ते स्पष्ट नव्हतं. या सगळ्यात kidneys मुळे electrolytes imbalance झाले असतील हे कोणाच्याच लक्षात आलं नाही. कालांतराने तिचे भास कमी झाले आणि ती बरी झाली. त्यामुळे हा विषय मागे पडला.
त्यानंतर तिला जेव्हा पुन्हा असे अनेक भास एका रात्री झाले, तेव्हा माझ्या वडिलांनी त्यांना माहित असलेले सगळे मंत्र म्हटले पण काही फरक पडला नाही. या सगळ्यात शेवटी ती almost unconscious झाली. त्यांनी सगळी हकीगत मला phone करुन यानंतर सांगितली (ते म्हणाले तिला कसली तरी बाधा असावी). आणि आम्ही तिला hospital मध्ये admit केलं. डॉक्टरांनी सांगितलेल्या tests केल्यावर electrolytes imbalance झाल्याचं समोर आलं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की Covid मध्ये हाच प्रकार झाला असावा.
पुढे गेल्या 2 वर्षात तिला अनेकदा Creatinine आणि uric acid वाढल्याने admit करावं लागलं. त्यात एकदा तिला hospital मध्येच Heart attack आला. या सगळ्यात तिला दोनदा दोन दोन आठवडे तरी ICU मध्ये ठेवावं लागलं. दोनदा Dialysis करावं लागलं आणि Angiography आणि पुढे Angioplasty सुद्धा झाली.
कोणी म्हणेल Heart Attack मध्ये आहार आणि व्यायामाचा विचार आवश्यक आहे. हे अगदी बरोबर आहे. तिच्या आहाराचा विचार केला तर तो अगदीच साधा होता. एक म्हणजे आम्ही गोव्याचे असून सुद्धा शुद्ध शाकाहारी आहोत. दुसरं तिला अगदी शाळेपासून colieties असल्याने ती तिखट आणि तळलेले पदार्थ बिलकुल खात नव्हती. रोजच्या जेवणात खोबऱ्याचं प्रमाण मात्र आमच्याकडे जास्त आहे. व्यायामाचा विचार केला तर नियमित व्यायाम नाही. या दोन गोष्टी ७४ व्या वर्षी heart attack यायला पुरेशा आहेत का? आणि Covid ने यात किती भर घातली याबद्दल मी अजून कोणत्याही निर्णयापर्यंत येऊ शकलेलो नाही.
पण Kidneys आणि Heart चा अन्योन्य संबंध आहे याबद्दल मी बरंच वाचलेलं आहे. त्यामुळे ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही.
यात दुसरी आणि धक्कादायक गोष्ट मला कळली ती म्हणजे एकदा का CKD म्हणजे Chronic Kidney Disease झाला की Diabetes ची बरीच औषधं देताच येत नाहीत. म्हणजे insulin घेणे हा एकच पर्याय patient कडे राहतो.
आमच्या आईच्या बाबतीत अगदी तसंच झालं आणि आता बाबांच्या बाबतीतही तसंच होतंय.
Diabetes चा परिणाम Kidneys बरोबर डोळ्यांवर सुद्धा होतो आणि Patient ला कमी दिसू लागतं, हळू हळू दिसणं बंद सुद्धा होऊ शकतं. हे mostly Retina सूज आल्याने होतं आणि मग डोळ्याला सतत Injections घ्यावी लागतात.
थोडक्यात 20-25 वर्षे diabetes असेल आणि साखर ताब्यात नसेल तर Kidneys, Heart आणि डोळे या तीन गोष्टींना तरी नक्की धोका निर्माण होतो. माझ्या नात्यात आणि ओळखीतच अशी अनेक उदाहरणे मला पहायला मिळाली आहेत. तेव्हा सावधान, या Diabetes ला हालक्यात अजिबात घेऊ नका. कारण तो हळू हळू हालात टाकतो.
(C) Gaurish Borkar
#gaurishborkar
#thinkingaloud
Comments
Post a Comment