Vitamins भाग 1

मागच्या काळात ब्राह्मण शुद्ध शाकाहारी या ग्रुप वर बी विटामिन ची कमतरता या बद्दल काही पोस्ट आल्या होत्या आणि माझ्या बायकोने मला माझा अनुभव इथे शेअर करायला हवा असं सांगितलं म्हणून ही पोस्ट लिहितोय. मी लहानपणापासून खूपच लठ्ठ होतो म्हणजे साधारणपणे चौथीत असताना माझं वजन 48 किलो होतं. गोव्यामध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीत गेल्यानंतर दिवसाला दहा बारा आंबे आणि बाकी सगळा मेवा खाऊन अंगावर भरपूर फोड यायचे आणि त्यावेळी कोणी याचं कारण सांगायच्या ऐवजी आम्हाला नेहमी खाण्याकरता प्रोत्साहित करत असत. नंतरच्या काळामध्ये साधारण सातवी-आठवीत गेल्यानंतर भरपूर सायकल चालवल्यामुळे माझं वजन अगदी खूपच कमी झालं आणि त्याच्यानंतर शिक्षण पूर्ण होऊन नोकरी सुरू झाल्यानंतर ते पुन्हा वाढलं. मी आत्ता पर्यंत दोन तीन वेळा विविध पद्धती वापरून वजन कमी केलं आहे. साधारणपणे 2006 साली Restricted Diet वर असताना आणि त्याच्या आधी सुद्धा वेळोवेळी मला मला तोंड यायचं आणि जेव्हा मी 2007 मध्ये पहिल्यांदा अमेरिकेला गेलो त्यावेळी तिथे गल्लोगल्ली ही विटामिन सप्लीमेंट ची दुकान पहिली. तेव्हा हा काय प्रकार आहे याबद्दल माझी उत्सुकता वाढली आणि मी यावर थोडा अभ्यास करू लागलो.
हे सांगताना पहिली गोष्ट म्हणजे मी डॉक्टर किंवा dietician नाही हे आवर्जून सांगतो. मी मला जे समजले आणि माझ्या पुरते उपयोगी पडले ते अनुभव म्हणून सांगतो आहे.
Internet वर वाचताना सगळीकडे B vitamin करता Meat म्हणजे मांस खा असा सल्ला दिला जातो आणि दुसरीकडे B Vitamin च्या कमतरतेमुळे मेंदू आणि स्मृतीवर परिणाम होतो असे लिहिले आहे. यात एक मोठा विरोधाभास आहे कारण ब्राह्मण पूर्वीपासून शाकाहारी होते आणि तेच सर्वात जास्त बौद्धीक आणि पाठांतर करून मंत्र म्हणत असत.
हा विरोधाभास कसा या बद्दल मनात प्रश्न निर्माण झाला. तेवढ्यातच माझ्या डॉक्टर असलेल्या काकाने गम्मतीशीर केस सांगितली. तो म्हणाला माझ्याकडे एक नव्वदीत असलेले आजोबा आलेले ते जंगलात राहतात आणि त्यांनी आयुष्यात पालेभाजी आणि भाकरी सोडून कोणताही पदार्थ खाल्लेला नाही. मला अशी खात्री होती की त्यांच्या शरीरात अनेक विटामिन्स व minerals ची कमी असावी पण tests केल्या नंतर असे लक्षात आले की त्यांच्या मध्ये कोणत्याही Vitamins किंवा Minerals ची कमी नव्हती. माझा काका म्हणाला माझ्या सगळ्या theories fail झाल्या. यामुळे माझे कुतूहल आणखीनच वाढले. माझ्या हे लक्षात आले की आपल्या समजुती मध्ये आणि वस्तुस्थिती मध्ये काहीतरी फरक असावा. म्हणून मी शोधाशोध सुरू केली आणि खालील आश्चर्यकारक गोष्ट मला कळली.

  • बरीच B Vitamins शरीरात विविध म्हणजे Intestine, Colon, liver या ठिकाणी असलेले Bacteria तयार करतात. हे समजून घेण्यासाठी हा research paper वाचा. (https://www.frontiersin.org/.../10.3389/fnut.2019.00048/full) त्यामुळे जर हे अवयव व्यवस्थित काम करत असतील तर Vitamins ची फारशी कमी जाणवत नाही.
  • याचा दुसरा भाग म्हणजे Pasteurization केलेल्या दुधाचा आहे. कारण यात दुधामध्ये असलेले Bacteria Pasteurization किंवा उकळलेल्या दुधामध्ये मारले जातात. याच बरोबर अनेक B Vitamins Watersoluble असल्यामुळे हवेत दूध उकळताना हवेत उडून जातात. आमचे आजोबाआम्हाला लहानअसताना गोठ्यात धारोष्ण दूध प्यायला देत असत. या बद्दल तुम्हाला आणखी माहिती हवी असल्यास हा research paper वाचा.(https://www.researchgate.net/.../285120237_Heat...).
  • 3. विविध antibiotic औषधे घेतल्याने Vitamins तयार करणारे Bacteria सुद्धा मारले जातात आणि त्यामुळे Vitamin B ची निर्मिती शरीरात होत नाही. तुम्हाला आठवत असेल की पूर्वी Doctors Antibiotic बरोबरच B Vitamin द्यायचे पण हल्ली ते Pro biotics देतात. त्यांना कदाचित हा नवीन शोध लागला असावा.
  • 4. पूर्वी जेवणानंतर ताक भात किंवा दही भात खायची पद्धत होती कारण ताकात जे Bacterias असतात ते Prebiotic असतात म्हणजे शरीरातील Vitamin निर्मिती करणार्‍या Bacterias ची वाढ ताक प्यायल्यामुळे चांगली होते.
  • 5. हिरव्या पालेभाज्या मधील B Vitamins त्या परतल्या तर उडून जाऊ शकते त्यामुळे त्या 2 ते 3 मिनिटांपेक्षा जास्त म्हणजे वाफ येई पर्यंत परतत बसू नये.
  • 6. भाज्यांचे पाणी टाकून दिल्यास सगळी Water-soluble Vitamins पाण्याबरोबर निघून जातात.
  • आणखीही बरीच माहिती आहे पण पोस्ट खूपच मोठी होतेय म्हणुन बाकी माहितीकरता दुसरी पोस्ट टाकेन.

Comments

Popular posts from this blog

पुनर्जन्माच्या सत्यकथा: सनातन धर्म आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीतून पूर्वजन्म आठवणाऱ्या व्यक्तींचा अभ्यास

यथा पिंडे तथा ब्रहमांडे चा पुरावा