माझे दैवी अनुभव भाग ५

दहावीच्या परीक्षेनंतर मी माझ्या वडिलांना (आम्ही त्यांना भाऊ म्हणतो) सांगितलं की मला काही शिक्षणात फार अर्थ वाटत नाही त्यामुळे Result कितीही चांगला लागला तरी मला काही पुढे शिकण्यात रस नाही. भाऊ म्हणाले की ठीक आहे! पण आज काल सगळे कमीत कमी Graduate तरी होतात तेव्हा तू तेवढं तरी शिक. नंतर तुला उगीच वाटायला नको की आपण मागे राहिलो. तुला काही ते अवघड नाही. मी पण त्यांना म्हणालो बरोबर आहे. बाकी गोष्टी करता करता मी Graduation नक्कीच करू शकेन. असा आमचा पुढचा Plan ठरला.

पुढे ११वीत Science ला Admission घेतली आणि Engineering ला Free Seat न मिळाल्यामुळे आरक्षणाचा निषेध म्हणून मी BSc ला Admission घेतली. मला माहीत होतं की ही ३ वर्षे माझ्या ज्योतिषाच्या अभ्यासाकरिता पर्वणी आहे. पण आईला माझ्या पोटापाण्याची काळजी वाटत असल्याने तिने पोटापाण्याकरीता Graduation नंतर काय करता येईल याचा शोध घ्यायला सुरवात केली. त्यात Computer Course केला तर काही काळजी नाही असं तिला समजल्यानंतर तिने पुढची चौकशी करून Graduation बरोबरच २ वर्षाच्या Computer कोर्सची Admission पक्की केली. पण एवढी Fee कशी भरायची असा विचार सुरु असताना मला ७५% Scholarship मिळाली आणि तो Course आमच्या ऐपतीत आला. म्हणजे आता ज्योतिष, Computer Course आणि त्याबरोबर Graduation असा पुढच्या ३ वर्षांचा Plan पक्का झाला.
पुढे Collage सुरु झालं आणि Computer Course ची वेळ व Physics च्या Practicals ची वेळ एकच आली. इकडं Computer Course ची ती एकच Batch सुरु असल्याने काही Flexibility नव्हती म्हणून Collage मधे विचारायचं ठरवलं. Physics ची Practicals घेणाऱ्या सरांनी Practicals ची Batch काहीही झालं तरी Computer Course करता बदलून मिळणार नाही असं सांगितलं. Physics ची Theory घेणारे सर आणि माझे संबंध चांगले होते म्हणून मी त्यांना जाऊन भेटलो पण त्यांनी Practicals च्या सरांचं नाव ऐकून कानावर हात ठेवले. नंतर Physics च्या HOD ना जाऊन भेटलो आणि त्यांनी सुद्धा काही कान हलवला नाही. शेवटी मी इरेला पेटलो आणि Batch बदलून दिली नाही तर Physics ची Practicals करायची नाहीत असं ठरवून टाकलं.
इकडे आईला Tension आलं आणि तिने हा Problem तिच्या पद्धतीने सोडवायचं ठरवलं. आमच्याकडे गोव्यला कुलदेवतेला कौल लावतात, त्याला प्रसाद घेणं असं म्हणतात. काही कारणाने ती गोव्याला गेली असताना तिने प्रसाद घेतले आणि पुण्याला आल्यावर तिने मला सांगितलं की तुला देवीने मागितलेला आहे तेव्हा तुला दरवर्षी देवीच्या दर्शनाला जावेच लागेल. नाहीतर तुला सतत अशाच अडचणी येत राहतील. हा प्रकार माझ्याकरीता फारच नवीन होता आणि कोणत्याही प्रकारे मला पटणारा नव्हता. त्यामुळे काहीही झालं तरी मी देवीच्या दर्शनाला जाणार नाही कारण अशाप्रकारे देवी अडवणूक करेल हे मला पटत नाही हे मी तिला सांगून टाकलं. त्याचबरोबर मला एक विषय राहिला तरी चालेल पण मी याकरिता देवीला जाणार नाही हे स्पष्ट केलं. भाऊंना माहीत होतं कि माझ्याशी वाद घालून काही फायदा नाही त्यामुळे ते शांत होते. आई मधून मधून तो विषय काढायची आणि मी तो डावलायचो. असं आमचं जवळ जवळ ६ महिने सुरु होतं. या ६ महिन्यात मी एकही Practical केलं नव्हतं.
दिवाळीच्या सुट्टीनंतर मी College मध्ये गेलो आणि नोटीस Board वर माझं नाव Defaulter म्हणुन लावलेलं पाहिलं. माझं डोकं फिरलं आणि मी तडक घरी निघून आलो. त्याचदिवशी आमच्या Theory च्या सरांनी पण Notice Board वर माझं नाव पाहिलं.
Collage मधे असताना मी दाढी वाढवली होती. तेव्हा दाढीची Fashion नव्हती बरं. वर्गात मी एकटाच होतो. Physics च्या Lecture ला एक Concept समजावून सांगताना एकदा आमचे सर मुजऱ्या सारखी Action करत होते आणि दाढी वाढलेला मी समोरच असल्याने, ‘राजे, मुजरा कबूल करा’ असा Joke त्यांनी मारला. तेव्हापासून वर्गात माझं नाव शिवाजी पडलं आणि Physics चे सर सुद्धा मला शिवाजी म्हणायला लागले.
त्यादिवशी सर वर्गात आले आणि शिवाजी कहाँ है असं विचारलं म्हणे आणि त्याला माझ्यासमोर आहे तसा हजर करा असा हुकूम दिला. दुसऱ्या दिवशी Collage मध्ये गेल्यावर मला त्यांचा खलिता मिळाला आणि मी त्यांच्या भेटीला Staff Room मध्ये दाखल झालो. तोपर्यंत सगळा विषय त्यांच्या लक्षात आला होता. पण ते हतबल होते त्यामुळे आता काय करायचं ते तुम्हीच ठरावा असं सांगून त्यांनी विषय बंद केला.
त्याच दिवशी घरी भाऊंनी मला एक गुगली टाकला. तुझा या सगळ्यावर विश्वास नसेल तर नसूदेत पण देवीला जाऊन यायला काय हरकत आहे? जास्तीत जास्त काय होईल, काही फरक पडणार नाही. सगळाच मिळून एकाच दिवसाचा तर प्रश्न आहे. आज संध्याकाळी इथून निघालो तर उद्या सकाळी पूजा करून उद्या संध्याकाळी परत फिरू. तू म्हणत असशील तर एखादा दिवस थांबू, नाहीतर ते ही नको. माझ्या विश्वासाचा प्रश्न नसल्याने माझा विरोध थोडा निवळला आणि मी म्हटलं चला Try करून बघू.
लगेच येत्या शनिवारी आम्ही बसने गोव्याला गेलो, रविवारी सकाळी देवीची पूजा केली, जे काही देणं होतं ते दिलें आणि संध्याकाळी बसने तडक पुण्याला`आलो. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे Collage ला गेलो. Physics चं Lecture संपल्यानंतर सर म्हणाले “राजे मला आत्ता येऊन भेटा”. मी मनात म्हटलं आज काय शिवाजी वरून एकदम राजे वगैरे. बात क्या हैं?
सर म्हणाले आज पासून ३ महिने तुमचे Practicals चे सर येणार नाहीत असं सकाळीच कळलं तर तुला दुसरी कोणती Batch जमणार आहे ते सांग. मी बोलून पाहतो! मी उडालोच. एका दिवसात असं काय झालं की Practicals सर एकदम ३ महिने सुट्टीवर गेले? सरांनी माझं पुन्हा लक्ष वेधलं आणि म्हणाले “राजे कोणती Batch हवीय?” मी म्हटलं तुमची आजची दुपारची Batch जमणार आहे, माझा Computer चा Class मंगळवार, गुरुवार शनिवार असतो. ठीक आहे मग आज पासूनच Practicals ला यायला लागा आणि उद्या सकाळी HOD सरांना जाऊन भेटा. मी बोलून ठेवतो त्यांच्याशी, इति सर.
त्यादिवशी Practicals करून घरी आलो आणि सगळं सांगितलं, आई सुसाट सुटली ती थांबेनाच. संध्याकाळी भाऊ आल्यानंतर त्यांना आईनंच बातमी सांगितली ते नुसते हसले आणि आत निघून गेले. त्या दोघांचा Plan Successful झाला होता. माझा Problem पण Solve झाला होता.
पण माझ्या मनात मात्र प्रश्नांचं काहूर माजलं होतं. देव असा खरंच अडवतो का? एका पूजेने एका दिवसात सगळं बदलू शकतं का? Practicals चे सर ३ महिने का येणार नाहीत? ते येणार नाहीत हे कधी ठरलं असेल? या सगळ्या घंटनाक्रमाला काय म्हणायचं? असे अनेक प्रश्न उश्याशी घेऊन मी त्या रात्री झोपलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी Collage मध्ये गेल्यानंतर HOD ना भेटलो. त्यावेळी मी ग्रहलाघव आणि Modern Astronomy यातला फरक अभ्यासत होतो आणि त्यावर २-३ Articles लिहिली होती. त्या Articles वर HOD सरांचा Feedback घेतल्याने माझी आणि त्यांची चांगली सलगी होती. ते म्हणाले मला सगळं सांगितलंय सरानी तुम्ही आता एका दिवशी २-३ Practicals पूर्ण करा आणि Backlog संपवून टाका. पुढचं पुढं पाहू.
नंतर असं कळलं की त्या सरांना आदल्याच दिवशी काही मेडिकल issues तयार झाले (mostly ते bathroom मध्ये पडले आणि त्यांच्या मणक्याला प्रॉब्लेम झाला) पण नक्की काय ते कळलं नाही.
पुढच्या दोन महिन्यात मी सगळा backlog पूर्ण केला. ते येणार असं कळल्यावर मला सर म्हणाले शिवाजी पुढच्या आठवड्यात सर येणार आहेत पण सध्या आहे तसंच सुरु राहील. तीन महिनांनंतर Practicals चे सर आले आणि मला`भेटले तेव्हा म्हणाले की मी External ला सांगेन की तू पहिल्या Semester ला Defaulter होतास. मी तसा त्यांना आता घाबरत नव्हतो. मी काही बोललो नाही पण Practicals मध्ये Theory च्या सरांना हा प्रसंग सांगितला. ते म्हणाले की हे सगळं परीक्षेच्या वेळी पाहू. विशेष म्हणजे नंतर External म्हणून मला Support करणाऱ्या सरांचे मित्र आलेले आणि त्यांना सगळा Matter आधीच माहीत होता. थोडक्यात म्हणजे मी बाल बाल बचावलो. अगदी शेवटपर्यंत त्या सरांनी माझा पिच्छा सोडला नाही. पण देव तारी त्याला कोण मारी?
पुढे अनेकदा देवीला जाऊन आल्या आल्या माझ्या आयुष्यात Magical गोष्टी घडलेल्या आहेत.
दुसरीकडे माझ्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं मिळवायचा मी प्रयन्त करू लागलो. त्यात मला पहिलं लक्षात आलं की जर Root Cause Perfectly समजलं असेल आणि त्यावर योग्य उपाय केला तर श्रद्धा वगैरे असण्याची काही आवश्यकता नाही. माझ्या बाबतीत अगदी हेच झालं होतं. मला लोक सांगतात आमचा उपायांवर विश्वास नाही. तेव्हा मी म्हणतो काही गरज नाही ही Procedure आहे तुम्ही Follow फार तर काय होईल की काही फायदा होणार नाही. श्रद्धेने जास्त फायदा नक्की होतो पण तो बराचसा Psychological असावा असं मला वाटतं. कालांतराने माझ्या असं लक्षात आलंय की देवाबरोबरच स्वतः वर विश्वास नसलेले लोक उपाय करायला बिचकतात. कदाचित त्यांना त्यांच्या Theories Fail होतील याची भीती वगैरे वाटत असावी. काही लोक तर लपून छपून नवस वगैरे बोलतात! लोक काय म्हणतील याची त्यांना भीती वाटत असावी. पण परदेशांतून भरपूर शिक्षण घेऊन आलेल्या अनेक Confidant व्यक्ती मात्र अगदी सहज म्हणतात की Let‘s do it and check the results. हा खरा शास्त्रीय विचार आहे.
यानंतर आमच्या घरातल्या आणखी २ माणसांना माझ्यासारखंच देवीने मागितलं. याचा अर्थ देवी सगळ्यांना मागत नाही. आम्हा तिघांच्या पत्रिकांमध्ये काही ग्रहमान समान आहे. त्यातून माझ्या लक्षात आलं की ठराविक गोष्टी सगळ्यांना Applicable नसतात. म्हणून आमच्या घरात आम्हाला तिघांनाही दरवर्षी देवीला गेलं नाही तर काही ना काही त्रास होतो पण बाकीच्यांना होत नाही.
देव आणि देवता हे सामान नाहीत. देव सहसा अडवत नाहीत. देवतांच्या बाबतीत मात्र Protocol पाळावा लागतोच नाहीतर त्या अडचण करू शकतात. तसंच देवता Supportive असल्या तर मात्र छप्पर फाडके देतात.
विशेष म्हणजे देवता हा प्रकार सर्व धर्मात वेगवेगळ्या Forms मध्ये असावा. मागे एकदा आमच्या कामाच्या बाई मला म्हणाल्या की तुम्ही सगळ्यांचं पाहता आमचं पण पहा की जरा. आमच्याकडे सगळ्यांना ४-४ मुलं असतात. २ वर्षांपूर्वी माझ्या सुनेचं Abortion झालं पण आता दिवस जात नाहीयेत. मी प्रश्न कुंडली पाहून म्हटलं की तुमचं काहीतरी देणं राहिलंय वाटतं तुमच्यात काही वार्षिक देणं असतं का? तर त्या म्हणाल्या हो, आम्ही दरवर्षी शेजारच्या गावात चादर चढवतो. पण Abortion झाल्यामुळे आम्ही चिडलो आणि गेली २ वर्ष चादर चढविली नाही. मी त्यांना म्हटलं की मग चादर चढवून पहा, आपण काही त्यांच्यावर चिडण्याइतके मोठे नाही. त्यांनी त्यांच्या गावी असलेल्या मुलाला सांगून त्याच आठवड्यात चादर चढवली आणि त्याच महिन्यात त्यांच्या सुनेला दिवस गेले! माझे Christian धर्माबद्दलचे सुद्धा असेच काही अनुभव आहेत ते पुढच्या Posts मध्ये सांगेन.
पुढे ही Theory मी अनेक लोकांना Apply करून पहिली. काही जण तर कुलदेवतेला न गेल्याने देशोधडीला लागले होते आणि पुन्हा त्यांच्या कुलदेवतेला जायला लागल्यावर कुठल्या कुठे गेले. त्यांच्या अनेक Interesting कहाण्या माझ्याकडे आहेत. पण आपण आपलं जास्त Logic न लावता दरवर्षी आपापल्या कुलदेवतेला गेलं पाहीजे. प्रत्येक शिवाजीच्या आयुष्यात थोडीच देवी माझ्याकडे येऊन जा असं स्वतःहुन सांगणार आहे?
(c) Gaurish Borkar #DaiviAnubhav #GaurishBorkar

Comments

Popular posts from this blog

पुनर्जन्माच्या सत्यकथा: सनातन धर्म आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीतून पूर्वजन्म आठवणाऱ्या व्यक्तींचा अभ्यास

यथा पिंडे तथा ब्रहमांडे चा पुरावा