माझे दैवी अनुभव भाग २

     शाळेतील २ भाकिते मला नीट आठवतात. आमच्या शाळेतील एका शिक्षकांच्या घरी माझे जाणे होते. मी कधी कधी रविवारी संध्याकाळी त्यांच्या घरी जात असे. त्यामुळे बोलण्याच्या ओघात त्यांना मी ज्योतिष शिकतो हे माहित झाले. त्या वर्षी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी त्यांचे नाव सुचवण्यात आले होते आणि त्यांना जर पुरस्कार मिळाला तर ती त्यांच्या Career मधली अतिशय मोठी गोष्ट ठरली असती. सहज बोलण्याच्या ओघात त्यांनी गम्मत म्हणून मला विचारले की मला राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळेल का? प्रश्न कुंडली (प्रश्न विचारला त्या वेळेची पत्रिका) पाहून मी म्हटले की हो तुम्हाला नक्की हा पुरस्कार मिळेल. त्यांचा यावर विश्वास बसेना त्यामुळे ते चटकन म्हणून गेले की जर मला हा पुरस्कार मिळाला तर मी पहिला पेढा तुला भरवेन. त्यानंतर ज्यावेळी त्यांना कळलं की माझे चुलत आजोबा ज्योतिषी आहेत त्यावेळी ते आमच्या घरी आले आणि त्यांनी हाच प्रश्न विचारला. आजोबांनी त्यांना सांगितलं की मी दिलेले उत्तर योग्य आहे. पुढे तो पुरस्कार त्यांनाच जाहीर झाला. सरानी शब्द पळाला. माझ्यासाठी ती फारच Ackward Moment होती कारण त्यांनी मला वर्ग सुरु असताना मध्येच Staff Room मध्ये बोलावून सगळ्या शिक्षकांसमोर पहिला पेढा दिला. सगळे शिक्षक अवाक होते कारण मी एक शिंगं फुटलेला मागच्या Bench वरचा मुलगा होतो. खरं सांगतो, तेव्हा मला अनेक शिक्षकांचे चेहरे पाहून खरंच भारी वाटलं होतं. शाळांमध्ये सगळ्यांना एकाच पट्टीने मोजतात ही आपल्या शिक्षण पद्धतीतील खूप मोठी त्रुटी आहे. आमच्या वेळी तर नुसते पट्टीने मोजत नसत तर पट्ट्या मारायला सुद्धा वापरायचे! त्यानंतर सरांनी मला अनेक वेळा मोठ्या कठीण प्रसंगातून वाचवलं आणि त्यामुळेच माझे दहावीपर्यंतचं शिक्षण त्याच शाळेतून पूर्ण झाले. नाहीतर कधीतरी नक्की माझ्या हातात LC (Leaving Certificate) पडलं असतं हे मला दुसऱ्या एका सरांकडून कळलं. अर्थात या सगळ्या गोष्टीत माझी काहीच चूक नव्हती असं मी अजिबात म्हणणार नाही.


    दुसरा एक प्रसंग याहून Interersting आहे. शाळेतील आणखी एक शिक्षक सुद्धा माझ्या माझ्या फार जवळचे होते. माझ्या आयुषयावर त्यांचा मोठा प्रभाव आहे. एवढी तत्वाने वागणारी माणसं विरळ असतात आणि नशिबानेच आपल्या आयुष्यात येतात. विशेष म्हणजे या माणसांच वागणं फारच Rough असतं आणि ती समजायला फार अवघड असतात. अशा माणसांकरता आपल्या मनात एक कोपरा कायम जपून ठेवलेला असतो आणि कधी मधी तिथून गेलो तर त्यांना वंदन करूनच पुढे जातो. मी अशा अनेक माणसांकडून मी बरंच काही शिकलो. त्यांना हा पेढ्याचा प्रकार समजल्यानंतर ते मला म्हणाले कि बोरकर माझी पत्रिका लहानपणीच हरवली आहे, शाळेत १ जून तारीख लागली आहे तू माझी पत्रिका करून देशील का? योगायोगाने मी त्याच वेळी सगळं सोडून नष्टजातक या प्रकारावर Experiments करत होतो. नष्टजातक म्हणजे Birth Details माहीत नसलेल्या माणसाची पत्रिका करणं. याचे २ उद्देश होते. पहिला म्हणजे काहीतरी भारी करायचं. लहान असताना कोणताही विषय शिकायच्या आधीच आपल्याला काहीतरी भारी करायचं असतं. नष्टजातक हा विषय माझ्या आजोबांनी सुद्धा अभ्यासलेले नव्हता म्हणून मला आभ्यासायचा होता! दुसरा उद्देश म्हणजे हे जर खरं आलं तर ज्योतिष खरं आहे असं छातीठोकपणे म्हणता येईल. आजोबांकडे येणाऱ्या लोकांच्या जन्मतारखा आणि जन्मवेळा Predict करायचा प्रयत्न मी त्यावेळी करत होतो आणि बऱ्याचदा त्या बरोबर यायच्या. कधी कधी मात्र सगळंच चुकायचं. हा माझ्या दृष्टीने ज्योतिष खरं असू शकेल याचा एक मोठा दाखला होता. याकरता मी काही नियम निवडले होते आणि त्याच्या Application ची वेळ एवढी लवकर येईल असं मला वाटलं नव्हतं. सरांची पत्रिका मी मांडली आणि भूतकाळातील अनेक प्रसंग अचूक सांगितले याचं त्यांना फारच आश्चर्य वाटलं.

    त्यावेळी रोज इतकं ज्योतिष पाहायचो की सगळं पंचांग डोक्यात घुमायचं. त्यामुळे सॉफ्टवेअर वगैरे लागायचं नाही. अर्थात डोक्यातल्या पत्रिकेच्या काही मर्यादा असतातच, पण त्या नंतर लक्षात आल्या. त्यावेळी आम्ही फार उडायचो, ज्याच्या त्याच्या प्रश्न कुंडल्या मांडायचो. सगळं अगदी आपल्या हातात असल्यासारखं वाटायचं. हे फारच Dangerous होतं हे नंतर लक्षात आलं. नको त्या वेळी नको त्या गोष्टी हातात पडल्याचे अनेक तोटे असतात. मोठी माणसं ज्यावेळी आम्हाला भविष्य विचारायला यायची त्यावेळी अनेकदा आम्ही आमचे शिक्षक, गुरु किंवा Mentor घालवून बसलो असतो. एकदाका आपल्याला सगळं कळतं असं वाटायला लागलं की माणसाचं Evolution थांबतं. ही बाबा किंवा महाराज बनण्याची सुरुवात असू शकते. एवढ्या छोटया वयात असं होणं आमच्या दृष्टीने घातक होतं. पण देवाक काळजी! त्यामुळे त्याने अशी परिस्थिती निर्माण केली कि असं काही झालं नाही. मी इथे आम्ही म्हणतोय कारण माझा एक मित्र सुद्धा माझ्याबरोबर अभ्यास करायचा आणि त्यावेळी मी शेकडो तास त्याच्याबरोबर Discussions मध्ये घालवलेले आहेत.

    ज्योतिषाचे आणि अशा इतर शास्त्रांचे आणखीही काही तोटे आहेत. यातला एक तोटा मला नंतर माझ्या बायकोने जाणवून दिला. तो म्हणजे माणसांकडे Objects म्हणून पाहणं. थोडक्यात म्हणजे याची ही रास म्हणजे हा असा किंवा त्याचा तो ग्रह तिथे आहे म्हणजे तो तसा. Doctors चं सुद्धा असं होऊ शकतं, मी झालेलं बघितलं आहे. अगदी सामान्य माणसं सुद्धा असं करतात. एखादी व्यक्ती म्हणजे काही त्याचे काही गुण, अवगुण, दिसणं किंवा Composition of Organs आहे का? माणूस एखाद्या वस्तूपेक्षा बरंच जास्त काहीतरी आहे हे आपण सतत ध्यानात ठेवलं पाहिजे. नाहीतर आपण सुद्धा एक Robot होऊन जाऊ.

क्रमशः

Comments

Popular posts from this blog

पुनर्जन्माच्या सत्यकथा: सनातन धर्म आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीतून पूर्वजन्म आठवणाऱ्या व्यक्तींचा अभ्यास

यथा पिंडे तथा ब्रहमांडे चा पुरावा