आमचे स्वामी १०

जसं त्या ताई audio recording ऐकून transcript तयार करायच्या तसं त्याच्या आधी आमचा एक युवक मित्र अगदी निगुतीने स्वामीजींचं बोलणं record करायचा. तो जवळ जवळ सगळ्या साप्ताहिक आणि महत्त्वाच्या कार्यक्रमांना वेळेआधी हजर असायचा. कार्यक्रमाची पडेल ती तयारी करायचा आणि संपूर्ण कार्यक्रम record करुन त्याची cassette योग्य व्यक्तीच्या हाती सुपूर्द करायचा. कार्यक्रमानंतर आवराआवरी करायचा. यात कधीही खंड पडला नाही.

पहिल्या US trip च्या वेळी स्वामिजींनी US हून digital audio recorder आणला. त्यानंतर audio cassette वर आणि digital recording दोन्ही सुरू झालं. कारण digital recording ऐकवायला सोपं पडायचं आणि digital recorder carry करायला सोपा होता.

दुसरं वार्षिक शिबिर २००२ साली कोल्हापूरजवळ पन्हाळ्याला झालं. तेव्हा Digital Audio Recorder नवा असल्याने ते नीट record होतंय ना हे पाहण्याची जबाबदारी माझ्याकडे होती. त्याचं storage तीन दिवसांसाठी पुरणार नसल्याने रोज कोल्हापूरला जाऊन त्या दिवसाची recordings एका युवकाच्या computer वर copy करायची आणि दुसऱ्या दिवशी पुढचं recording करायचं असं ठरलं. त्यासाठी मला एक bike देण्यात आली. ती कोणाची होती ते मला आता आठवत नाही. रात्रीच्या वेळी bike वर पन्हाळ्याहून कोल्हापूरला जाणं safe नसल्याने हे काम रोज दुपारी करायचं असं ठरलं आणि ते काम मी या शिबिरात पार पाडलं.

या आधी स्वामिजींनी Principles of Oratory च्या sessions मधे सांगितलं होतं की आपला appearance occasion ला suitable असावा. त्यामुळे मी पहिल्यांदाच पांढरा झब्बा आणि सलवार विकत घेतली होती. त्या आधी मी कोणत्याही कार्यक्रमाला चार पैकी कुठला तरी एक चौकडीचा shirt आणि दोन पैकी एक trouser घालून जायचो. शिबिराला जायचं म्हणून तो कुर्ता वेळेआधीच इस्त्री वगैरे करून ठेवला होता. त्यामुळे शिबिराच्या वेळी काहीच न पाहता bag मधे भरला आणि पन्हाळ्याला गेलो. तिथे घालायला म्हणून काढला तर त्याच्यावर इस्त्री करताना घडीमध्ये ठेवलेल्या news paper ची print उमटली होती. त्याच्या आधी आणि त्यानंतर आजपर्यंत माझ्या कुठल्याही कपड्यावर अशी print उमटलेली नाही पण त्यावेळी मात्र उमटली. आता ही माझी परीक्षा सुरू होती की काय ते मला माहिती नाही. पण फजिती तर होणार होती. मी ठरवलं की वाट्टेल ते झालं तरी तोच कुर्ता दिवसभर घालेन, आणि तसंच केलं. अशा प्रसंगामुळे आपण जास्त जास्त मोकळे होत जातो हे माझ्या त्यानंतर लक्षात आलं.

त्या शिबिरामध्ये पहिल्याच दिवशी काहींना कळलं की स्वामीजींना Cancerous growth detect झाली आहे आणि बातमी शिबिरात सगळीकडे पसरली. सगळे जण त्यांच्याबद्दलची काळजी एकमेकांशी बोलून दाखवू लागले. दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रामध्ये “मला सत्तर वर्षं होईपर्यंत तरी काही काळजी करण्याची काही आवश्यकता नाही” असं एक मोघम वाक्य स्वामिजी बोलून गेले. पुढे ते almost खरं झालं. अगदी सत्तराव्या वर्षीच त्यांनी देह ठेवला.

सगळ्या विचारधारांकडे स्वामीजी कौतुकाने पाहत. विविध विचारधारा युवकांना माहित असायला काहीच हरकत नाही असं त्यांना वाटायचं. बुद्धिमान व्यक्ति त्याच्यासाठी काय योग्य आहे ते ठरवू शकते असं ते म्हणायचे. त्यामुळे या शिबिरामध्ये संध्याकाळच्या एका सत्रात Actor अतुल कुलकर्णींची मुलाखत होती. त्यावेळी ते एवढे well known नव्हते पण त्यांनी त्यांची मतं सडेतोडपणे मांडली. आम्ही सगळ्यांनी ती शांतपणे ऐकली. काहींना आवडली सुद्धा असतील. त्याबद्दल स्वामीजी फार काही बोलल्याचं आठवत नाही. स्वामीजी एवढं मात्र म्हणायचे की 'अनेक समाजकार्य करणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यात देवाला स्थान नसतं हे मात्र तेवढसं बरोबर नाही.'

समर्थांनी म्हटलं आहे ते स्वामीजी Quote करायचे

सामर्थ्य आहे चळवळेचें । जो जो करील तयाचें ।

परंतु येथें भगवंताचें । अधिष्ठान पाहिजे ॥ २६ ॥ दासबोध २०-४

या शिबिरात मला Personally आणखी एक धक्का बसला. मी पहिल्यांदा स्वामीजींना केस Colour केलेले पाहिलं. माझ्या मनात आलं असं कसं काय होऊ शकतं? ज्ञान प्राप्त झालेल्या व्यक्तीला केस रंगावावेसे वाटतात?

सामान्यपणे कोणत्याही व्यक्तीला आपण आपल्या चौकटीतून पाहत असतो. त्याने आपल्या चौकटीत बसावं असं आपल्याला वाटत असतं. ती व्यक्ति त्या चौकटीच्या बाहेर गेली की आपण त्यावर शंका उत्पन्न करतो. त्यानुसार हे असं कसं? हा प्रश्न मा‍झ्याही मनात उत्पन्न झाला. पण नंतर लक्षात आलं की स्वामीजी अशी Conventions उगीचच पाळत बसत नाहीत. ये US मधे T shirt, Shorts आणि Sports Shoes घालून walk ला जायचे. त्यानंतर आणखी लक्षात आलं की ज्ञान झालेली व्यक्ति अतिशय Dynamic असते. ती परिस्थितीनुसार Appropriately वागते. आणि शेवटी लक्षात आलं की व्यवहारामध्ये काय सुरू आहे त्याचा ज्ञानी व्यक्तीच्या अंतःकरणावर अगदी कमी परिणाम होतो त्यामुळे ते सहजच प्रसंगाला साजेसं वागू शकतात. कधी कधी तर मला शंका यायची की स्वामीजींपेक्षा आम्हीच जास्त conventional आहोत की काय.

शिबिराच्या शेवटच्या दिवशी पुण्याच्या युवकांनी वेळेवर घरी पोहोचावं म्हणून पुण्याची Bus शिबिर संपायच्या आधीच सोडावी असं ठरवलं होतं. पण याची कल्पना स्वामीजींना दिलेली नव्हती. पुण्याचे युवक शिबिर पूर्ण होण्याआधीच निघतायत हे स्वामीजींना कळलं तेव्हा त्यांनी नाराजी दर्शवली. हो-नाही म्हणता म्हणता शेवटी Bus ठरल्याप्रमाणे सुटली. कोल्हापूर सोडून थोडं पुढे येतो तोच Driver च्या इथे काही ठिणग्या उडून Driver Cabin मधे आग लागली. Driver ने Bus बाजूला घेतली. आम्ही सगळे खाली उतरलो. Driver ने त्या आगीवर पाणी ओतलं. पाण्याने मोठा भडका उडाला आणि बरचसं electrical wiring जळून गेलं, पण आग शांत झाली. Bus दुरुस्तीच्या पलीकडे गेली आहे असं Driver ने declare करून टाकलं. शिबिरातल्या कार्यकर्त्यांना तसं कळवल्यानंतर त्यांनी कोल्हापूर Depot मधून दुसरी Bus पाठवली आणि आमचा पुढचा प्रवास सुखरूप झाला. पण आम्हाला घरी पोहोचायला व्हायचा तोच किंवा त्याहून थोडा जास्तच उशीर झाला.

स्वामजींना Cancerous growth सापडली ही गोष्ट माझ्या मनात सतत घोळत होती. पूर्वीपासून मी श्री रामकृष्णांबद्दल वाचत असे आणि त्या योगाने आई म्हणजे काली माता माझ्या अतिशय जवळची होती. मी तिला बरंच काही सांगत असे आणि ती प्रतिसादही देत असे. त्यावेळी मात्र ही गोष्ट हे एक secret होतं. मी आईला म्हटलं की “आई तू असं काहीतरी कर की माझ्या स्वामीजींना आराम पडेल.” एक दोन दिवसात स्वामीजींकडे जाणं झालं. आम्ही कोल्हापूर शिबिराबद्दल बोलत होतो. आजूबाजूला कोणी नाही असं पहात स्वामीजी मला म्हणाले, “आपल्या गुरुंसाठी असं देवाकडे काही मागणं बरोबर नाही.” मी एकदम गप्पच झालो. ते असं का म्हणाले त्याचं कारण मला नंतर कळलं. ते पुढे सांगेन.

या सगळ्या गोष्टींमुळे पन्हाळा शिबिर माझ्यासाठी अनेक angles नी memorable ठरलं. पुढे मी सुद्धा एक-दोन शिबिरांच्या organization मधे participate झालो त्याबद्दल सांगेनच.

-गौरीश बोरकर

सप्टेंबर १९ २०२६

#aamacheswami

Comments

Popular posts from this blog

पुनर्जन्माच्या सत्यकथा: सनातन धर्म आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीतून पूर्वजन्म आठवणाऱ्या व्यक्तींचा अभ्यास

मराठी ग्रंथ: वैदिक नक्षत्र ज्योतिष