आमचे स्वामी ११

२००० मध्ये नवीन Job मिळल्यानंतर साधारण पहिल्या वर्षातच मी त्यांच्या IT division ची सगळी धुरा हातात घेतली. अनेक बदल करून त्यांचे IT division जवळ जवळ auto pilot mode वर नेलं. आमच्या CEO च्या पत्नीच CTO होत्या त्यामुळे त्यांचा खूपच support होता. त्यानंतर काही products develop करायचा plan तयार केला आणि तशी products develop सुद्धा करून घेतली. त्यांच्या sales team ला ती products विकायला जमत नव्हती म्हणून मी Bangalore, Mumbai आणि Delhi चे tours केले आणि Demos दिले. यानंतर एका बाजूला आमच्या CTO ला वाटलं की मी फारच मोठा होतोय आणि CEO ला वाटलं की मी sales join केलं तर company ला खूपच फायदा होईल म्हणून त्यांनी मला sales team join करण्याची offer दिली. पण मला sales मधे काहीच interest नव्हता त्यामुळे मी ती offer नाकारली आणि तिथंच सारं बिनसलं. त्याचं माझ्याशी वागणं बदललं. एक दिवस company चा live data delete झाला आणि त्याला मी जबाबदार आहे असं आडून आडून बोललं जाऊ लागलं. थोडक्यात ते मला Job सोड असे indications देत होते.

शेवटी एक दिवस त्यांनी मला स्पष्टच सांगितलं की आता आम्हाला तुझ्या expertise ची day to day activities मधे गरज नाही. त्यांनी पुढे विचारलं की आम्ही तुझा resume आमच्या circle मधे share करू का? मी लगेच हो म्हटलं. त्यांचे contacts चांगले असल्याने २ दिवसात मला interview चा call आला. Interview दिला आणि select झालो. Offer चांगली होती पण company ३० KM लांब म्हणजे तळवड्याला होती. मला काहीही झालं तरी तो Job सोडायचाच होता. त्यामुळे मागचा-पुढचा विचार न करता मी offer accept केली. आता रोजचा ६० KM प्रवास पदरात पडला होता.

Join केल्यावर लक्षात आलं की इथे काम करणं फारच वेगळं आहे. Manager आणि colleagues अजिबातच supportive नव्हते. आयुष्यात पहिल्यांदा मी एका Organization चा भाग होतो. त्यापूर्वी मी जास्तीत जास्त ८-१० जणांच्या team बरोबर काम केलं होतं. माझी काम करण्याची पद्धत त्यांना पसंत नव्हती. प्रश्न विचारलेले आवडत नव्हते. सांगेल ती हमाली करावी अशी अपेक्षा होती. थोडक्यात ती एका typical service company मधली team होती.

एका बाजूने मी घर विकत घेतलं (आणि loan मिळालं नाही) याचं Pressure होतं आणि दुसऱ्या बाजूने Work culture फारच unsupportive होतं. सकाळी ७:३० ला निघायचो आणि रात्री ८:३० ला घरी यायचो. या सगळ्यात ध्यानाला वेळ उरत नव्हता आणि स्वरूपयोगमधे जाणं जवळ जवळ अशक्य झालं.

स्वामीजी कधी कधी गंमतीने म्हणायचे की ऐटीत IT त गेले आणि आता ध्यानाला वेळच उरलेला नाही.

असच एक दिवस रविवारी सकाळी शिवशंकर सभागृहामध्ये माझं स्वाध्याय Presentation होतं. शनिवारी संध्याकाळी बाबा आणि आजोबांचा कडाक्याचा वाद सुरू झाला. त्या सगळ्यात मला तयारी करणं निव्वळ अशक्य होतं.

स्वामीजी सांगत की “प्राप्त परिस्थितीमधे आपल्या शक्ति बुद्धीनुसार उत्कृष्ट कर्म करायचं.” मी विचार केला की आज Mostly ही आपली Test आहे. आत्ता स्वाध्याय Presentation ची Practice करणं impossible आहे. मग काय करावं? लवकरच झोपी गेलो. सकाळी ४ वाजता उठलो. पण घरात बसून स्वाध्यायाची तयारी करणं शक्य वाटलं नाही. मग सगळं आवरलं आणि शिवशंकर सभागृहाची वाट धरली. शिवशंकरच्या पायऱ्यांवर बसून साडेसात पर्यंत Presentation ची Practice केली आणि पावणेआठ वाजता स्वाध्याय Present केला.

खरं तर स्वाध्याय तसा ठीक ठीक झालेला पण प्रवचन झाल्यानंतर स्वामीजी शाब्बास म्हणाले आणि पाठीवर थाप पण दिली. स्वामीजींच्या काही Specific terms आणि actions होत्या. ते कधी 'शाब्बास' म्हणतात, कधी पाठीवर थाप देतात, कधी खांद्यावर हात ठेवतात, दंडाला धरून बाजूला घेतात, कधी डोक्यावर हात ठेवतात, कधी नुसताच हात दाखवतात, कधी 'कल्याणमस्तू' म्हणतात, कधी 'आनंदम्' म्हणतात याचा साधारण अंदाज तो पर्यंत मला आला होता त्यामुळे त्यांच्या म्हणण्याचा अर्थ मला बऱ्यापैकी समजला.

दिवसेंदिवस घरी परिस्थिती बिघडत होती. असाच एकदा वाद झाला आणि त्या दिवशी आजोबांनी घरी जेवण करणं बंद करून टाकलं.

या सगळ्यात सुद्धा माझे आणि आजोबांचे संबंध अतिशय चांगले होते. मला शिक्षणात interest वाटण्यामध्ये त्यांचा खूपच मोलाचा वाटा होता. आम्ही ज्योतिषाबद्दल खूप चर्चा करायचो. त्यांचा व्यासंग अफाट होता. त्यांचं General Knowledge खूपच चांगलं होतं. मुख्य म्हणजे त्यांचं माझ्यावर प्रेम होतं. आई बाबा गावी गेले तर ते मला स्वयंपाक करू देत नसत. ते स्वत: त्यांना जे काही आणि जसं जमेल तसं जेवण तयार करून अतिशय प्रेमाने वाढायचे. अवघड परिस्थितीमधे त्यांनी मला नेहमीच support केला. त्यामुळे मी ही त्यांना एक दोनदा सांगून पाहीलं पण त्यांनी कोणाचाच ऐकलं नाही. मग घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींना फोन करून विनंती केली की तुम्ही येऊन हा वाद मिटवावा. पण आजोबा आणि बाबा दोघंही अतिशय तापट असल्याने कोणीच मधे पडायला तयार होईना.

त्या वेळी माझं घर जवळ जवळ तयार होत आलं होतं त्यामुळे आता आम्ही तिकडे रहायला जातो असं मी आजोबांना सांगितलं. त्यांना त्यावर विश्वास बसला नाही त्यामुळे त्यांनी त्याला होकार दिला. आणि असंच एक दिवस रविवारी आम्ही आमचं समान घेऊन नाईलाजाने माझ्या घरी राहायला आलो. याचा आजोबांनाही खूपच मोठा धक्का बसला.

या सगळ्या प्रसंगानंतर ज्यावेळी मी स्वामीजींकडे गेलो त्यावेळी ते काय म्हणतात या बद्दल मला उत्सुकता होती. मी स्वामीजींना नमस्कार केला आणि मोठ्या आशेने त्यांच्याकडे पाहीलं. स्वामीजी फक्त एवढंच म्हणाले की “जे झालं ते नसतं झालं तर फार बरं झालं असतं.”

बरीच वर्षं मी त्यांच्या या वाक्यावर विचार करत असे. कारण असं घडू नये म्हणून मी माझ्या परीने सगळे प्रयत्न केल्यानंतर त्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. पुढे माझ्या लक्षात आलं की ज्यावेळी आपल्यामुळे कोणाच्या तरी अंत:करणावर तीव्र आघात होतो किंवा ती व्यक्ति deeply hurt होते त्यावेळी आपण आपल्या संचितात मोठी भर घालत असतो.

संस्कृतमधे एक वचन आहे.

आत्म छिद्रम गृहात् छिद्रम मतिमान न प्रकाशयेत |

म्हणजे स्वत:चे weaknesses आणि घरातील दुफळी बुद्धिमान माणसं सांगत नाहीत किंवा प्रकाशात आणत नाहीत. त्यामुळे तुम्हाला असं वाटू शकतं की हे सगळं हा इथे कशाला सांगतोय? बरं दिसत नाही. तुमचं म्हणणं अगदी खरं आहे. स्वामीजींशी संबंधित काही गोष्टी सांगण्यासाठी हे संदर्भ घेणं आवश्यक वाटले म्हणून इथे घेतले आहेत. बाकी यावर focus करणं हा उद्देश नाही. तुम्ही सुद्धा यातला मुद्दा समजून घ्या कारण तो अत्यंत महत्वाचा आहे.

मी जर का तुम्हाला कोणत्याही कारणाने दुखावले असेल किंवा माझ्यामुळे कोणत्याही कारणाने तुम्हाला दु:ख झाले असेल तर या निमित्ताने मी तुमची बिनशर्त माफी मनापासून मागतो. तुम्हाला सुद्धा जर कोणाबद्दल असे वाटत असेल तर तुम्हीही त्या व्यक्तीची माफी मागा आणि विषय पूर्ण करा. तुम्हाला कोणाबद्दल गैरसमज झाल्यामुळे अढी असेल तुम्ही तो विषय सोडून पुढे जा. अर्थातच हा माझा फुकटचा सल्ला आहे. परिस्थिती समजून घेऊन योग्य निर्णय घ्यायला तुम्ही capable आहातच.

गंम्मत म्हणजे मागे मला स्वरूपयोग मधल्या एका युवकाचा असाच message US मधून आला. तो भारतात असताना झालेल्या एका गोष्टीबद्दल sorry म्हणाला. खरं तर ती गोष्ट अगदीच क्षुल्लक होती आणि मी काही ती धरून बसलो नव्हतो पण ती त्याला आतून टोचत असावी.

नवीन घरी रहायला गेल्यावर माझा रोजचा प्रवास ६० KM वरून ८४ KM वर गेला त्यामुळे ध्यानाला वेळ मिळणं आणखी अवघड झालं आणि पुढे काय झालं ते पुढच्या भागात सांगतो.

-गौरीश बोरकर

सप्टेंबर २७ २०२६

#aamacheswami

Comments

Popular posts from this blog

पुनर्जन्माच्या सत्यकथा: सनातन धर्म आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीतून पूर्वजन्म आठवणाऱ्या व्यक्तींचा अभ्यास

मराठी ग्रंथ: वैदिक नक्षत्र ज्योतिष