आमचे स्वामी

 आमचे स्वामी

"माझे दैवी अनुभव" या लेखमालेमध्ये मी स्वामीजींचा म्हणजे स्वामी माधवानंदांचा ओझरता उल्लेख केला होता. त्यानंतर काही जणांनी हे स्वामीजी कोण आणि त्यांच्याबद्दल तुम्ही काहीतरी लिहा असं suggest केलं होतं. खरं तर त्यावेळी त्यांच्या स्मरणग्रंथाचं काम सुरू होतं आणि मी सगळ्यांना त्यांच्या स्मरणग्रंथाचं काम सुरू आहे. त्यामध्ये तुम्हाला त्यांची ओळख होईल असं सांगितलं.

त्यानंतर पुढे स्वामीजींच्या स्मरणग्रंथाच्या तिसऱ्या भागामध्ये लिहिण्याबद्दल मलाही विचारलं होतं. तेव्हा पहिला विचार हाच होता की एवढंस लिहून माझं भागणार नाही! नंतर थोडा विचार केल्यावर exactly काय लिहायचं हे लक्षात आलं नाही आणि मग मी तो विचार सोडून दिला.

या मे महिन्यात रत्नागिरीला जाणं झालं तेव्हा पावसहून रत्नागिरीला परत येताना विचार आला की स्वामीजींच्या personality ला अनेक dimensions होती त्याबद्दल थोडंसं तरी लिहिलं पाहिजे. स्वामीजीना भेटून बराच काळ लोटल्यामुळे एवढे दिवस मनामध्ये विचारांची मांडामांड करण्यात गेले आणि मग गुरुपौर्णिमेच्या दिवशीच ही लेखमाला का सुरू करू नये असा विचार आला. त्यानुसार एक announcement म्हणून ही post लिहीत आहे. पुढच्या आठवड्यात एक introduction ची post लिहावी आणि गुरुपौर्णिमेला लेखमालेला सुरवात करावी असा सध्याचा तरी plan आहे.

या लेखमालेमध्ये काही पथ्ये मी पाळणार आहे. त्यातलं पहिलं म्हणजे शक्यतो कोणाचंही नाव घेणार नाही. दुसरं म्हणजे कोणताही विषय ज्याने गूढता किंवा संशय निर्माण होईल तो टाळण्याचा प्रयत्न करणार आहे. तिसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मार्च २००८ नंतर मी स्वामीजींना जवळ जवळ भेटालोच नाही आणि त्यामुळे आता बराच काळ लोटला आहे. अर्थातच या आठवणी फार जुन्या आहेत. त्यातील काही प्रसंगांचे details मला आठवत नसतील ते आठवत नाहीत असं लिहिणार आहे. कोणाला त्या प्रसंगाची आठवण असेल आणि details माहिती असतील तर त्यांनी add करायला नक्कीच हरकत नाही.

या लेखमालेला “आमचे स्वामी” हे नाव देण्याचं कारण म्हणजे ज्यांना स्वामीजींबद्दल काहीच माहिती नाही त्यांना स्वामीजींच्या Personality च्या dimensions बद्दल आणि ध्यानयोगाबद्दल काही सांगता येईल का असा प्रयत्न या लेखमालेमध्ये करणार आहे. खरं तर स्वामीजींचे ध्यानाबद्दलचे वैयक्तिक मार्गदर्शन, त्यांच्याबरोबर कार्य करतानाचे अनुभव, वैयक्तिक अडचणींमध्ये त्यांनी केलेले मार्गदर्शन असे प्रसंग ज्याने स्वामीजींच्या व्यक्तिमत्वाच्या विविध अंगांची विशेष ओळख जगाला होईल अशा गोष्टी मोकळेपणाने मांडल्या पाहिजेत असं मला प्रामाणिकपणे वाटतं. पाहूया कितपत जमतय ते.

Comments

Popular posts from this blog

पुनर्जन्माच्या सत्यकथा: सनातन धर्म आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीतून पूर्वजन्म आठवणाऱ्या व्यक्तींचा अभ्यास

मराठी ग्रंथ: वैदिक नक्षत्र ज्योतिष