आमचे स्वामी ३

अनुग्रह घेतल्यानंतर आईला माझी जास्तच काळजी वाटू लागली. आता हा पुढे काय करेल? असा प्रश्न तिला बहुधा सतावू लागला असावा. आणि त्यामुळे ती नोकरीसाठी माझ्या मागे लागली. NIIT ची placement cell मला अजिबात दाद देत नव्हती आणि पुढे मलाही काही मार्ग दिसत नव्हता. एवढ्यात अनुग्रहानंतर अगदी दोन चारच दिवसांनी newspaper मधे एक जाहिरात वाचली. त्यांना Programming Languages शिकवण्यासाठी Faculties हवे होते. माझे विषय पक्के होते, शिकण्यात आणि शिकवण्यात मला interest होता म्हणून मी interview ला जायचं ठरवलं. Interview दिला आणि लगेच Select सुद्धा झालो. त्यांनी मला 2500 रुपये पगाराची offer दिली आणि गरजू मुलांप्रमाणे मी ती गपचूप स्वीकारली. त्यात आणखी एक गडबड केली. घरी कोणाशीही न बोलता २ वर्षांचा Bond sign केला. आपलं potential आपल्यालाच माहीत नसतं मग ते इतर कसे काय value करतील? आईला पगार सांगितल्यावर आई फार खुश नव्हती. ती म्हणाली की अडीच हजारात काय संसार होतो का? मी पटकन म्हटलं की इथे संसार करायचाय कोणाला? माझं भागलं तरी खूप झालं. या माझ्या वाक्याने मात्र ती जाम upset झाली. 6 जानेवारी 1999 या दिवशी finally माझी ही पहिली नोकरी सुरू झाली.

माझं office पुण्यात भांडारकर रोडला म्हणजे स्वामीजींच्या अगदी घराजवळ होतं. त्यावेळी स्वामीजींचा जवळ जवळ आठवडाभराचा जाहीर कार्यक्रम असायचा. भांडारकर रोड, Law College Road आणि मला वाटतं Income Tax lane अशी 3 ध्यान केंद्रे होती. Mostly ही दर आठवड्याला नसायची. अध्यात्म मंगल धाम मध्ये दासबोधावर प्रवचन असायाचं. Mostly हे पंधरवड्यातून एकदा असायाचं, नंतर ते महिन्यातून एकदा झालं. रविवारी सकाळी शिवशंकर सभागृहात गीतेवर प्रवचन असायचं. Mostly गुरुवारी संध्याकाळी 4 वाजता Law College Road वर काही दिवस विवेक चूडामणि वर स्वामीजी बोलायचे. आणि पत्रकार नगर मध्ये रविवारी संध्याकाळी 4 वाजता दीर्घ ध्यान असायाचं. हे सगळं अगदी एकत्र सुरू होतं की काही आधी काही नंतर सुरु झालं ते मला पक्कं आठवत नाही. पण एवढं नक्की आठवतं की आठवड्यातून २-३ वेळा तरी स्वामीजींना भेटणं व्हायचंच. आमचा तसा काहीच संवाद व्हायचा नाही. ध्यान करायचं किंवा प्रवचन ऐकायचं, नमस्कार करायचा आणि निघायचं. अगदी प्रत्येक session ला ध्यान केंद्रात स्वामीजी असायचेच असंही नाही पण त्या निमित्ताने ध्यान व्हायचं.

त्यावेळी मला हे सहज शक्य होतं कारण सकाळी ९ ते ६ batch घेतली की तिथेच fresh व्हायचं आणि सातच्या ध्यानाला जायचं. ज्या दिवशी संध्याकाळी ७-९ batch असेल त्या दिवशी मात्र जमायचं नाही. कधी कधी batch नसली की ४ वाजता पण काहीतरी काम आहे असं सांगून विवेक चूडामणि ऐकायला जाऊन यायचो. पण विवेक चूडामणि वरचं विवेचन फार दिवस चाललं नाही.

असंच एकदा Law College Road वरच्या ध्यान केंद्रात गेलो होतो आणि त्या दिवशी स्वामीजी सुद्धा आले होते. ध्यान झाल्यावर म्हणाले, “ध्यानाला येत जा”. मी त्यांना अगदी casually म्हटलं की, “हो मी येतोच आहे गेल्या आठवड्यात तुम्हीच नव्हता.” त्यांचा चेहरा एकदम बदलला. त्यांना फारच वाईट वाटलेलं त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. ते अगदी uncomfortably म्हणाले की “हो, मी एका वैयक्तिक कार्यक्रमात होतो त्यामुळे मला यायला जमलं नाही. पण तू भांडारकर Road वरच्या ध्यानकेंद्रात येत जा तिथे मी सहसा असतो.

पुढे खूप वर्षानी कल्याणीच्या आईशी बोलता बोलता लक्षात आलं की त्यावेळी स्वामीजी mostly त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी आठवडाभर बंगलोरला गेले होते. त्यामुळे ते फक्त तो आठवडा नव्हते.

असाच एक प्रसंग पुढे पुन्हा एकदा घडला. दर रविवारी शिवशंकर सभागृहात सकाळी ८ वाजता गीतेवर स्वामीजीचं प्रवचन असायचं. स्वामीजी शुक्रवार संध्याकाळपासून सहसा कोणालाही भेटायचे नाहीत. त्या काळात त्यांचं रविवारच्या प्रवाचनाचं चिंतन आणि मनन सुरू असे. म्हणजे शुक्रवार संध्याकाळ पासून ते mostly पुण्यातच असत. प्रवचनाआधी युवकांचा स्वाध्याय असायचा. स्वामीजी साधारण ७:५० ला सभागृहात येत आणि १० मिनिटे स्वाध्याय ऐकत. वेळेच्या बाबतीत ते अतिशय पक्के होते. त्यांना उशीर झालेला मी फार कधी पहिला नाही. एक दिवस मात्र स्वाध्याय संपला तरीही स्वामीजी आलेच नाहीत. पुढे गीता संथा सुरू झाली तरीही आले नाहीत . शेवटी ८:१५ ला स्वामीजी आले आणि त्यांनी फक्त एवढंच म्हटलं की “सत्वगुण घेऊन मी गाडीत बसलो खरा पण गाडीने तिचा तमोगुण दाखवला.” यानंतर त्यांनी नेहमीप्रमाणे प्रवचन सुरू केलं.

प्रवचनानंतर आम्ही थोडी चौकशी केली तेव्हा कळलं की यावेळी स्वामीजी पुण्यात नव्हते. स्वामीजींच्या ट्रेनला फारच उशीर झाला त्यामुळे त्यांनी Train मधेच आंघोळ केली आणि तिथेच एका volunteer ला घ्यायला बोलवलं. रात्रभर प्रवास करुन ते तिथून directly शिवशंकर सभागृहात आले आणि त्यांनी नेहमीप्रमाणे प्रवचन केलं. पण या सगळ्याचा feel आम्हाला प्रवचनात कुठेही आला नाही.

कोणीतरी स्वामीजींना म्हटलं की एखादं प्रवचन cancel केलं तर काय होतं? ते म्हणाले, तसं नाही. लांबून लांबून अनेक जण फक्त प्रवचन ऐकायला एवढ्या सकाळी येतात. काही जण तर परगावहून सुद्धा मुद्दाम रविवार साधून पुण्यात येतात. आपण त्यांना असंच परत पाठवू शकत नाही.

कधी कधी मला वाटायचं की आपली ध्यानाबद्दल जेवढी commitment आहे त्यापेक्षा कितीतरी जास्त स्वामींची आपल्याबद्दल आहे. पण त्यांनी मात्र ही guilt कधीही येऊ दिली नाही. ते म्हणायचे की आपण as far as possible म्हणजे शक्य तेवढं करायचं. पण स्वामीजींचा far फार फार लांबचा होता आणि आमचा far मात्र फारच अलीकडचा असायचा.


-गौरीश बोरकर

ऑगस्ट ३ २०२६

#aamacheswami

Comments

Popular posts from this blog

पुनर्जन्माच्या सत्यकथा: सनातन धर्म आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीतून पूर्वजन्म आठवणाऱ्या व्यक्तींचा अभ्यास

मराठी ग्रंथ: वैदिक नक्षत्र ज्योतिष