सनातन धर्माची Lifestyle
परवा सकाळी unknown number वरून एक phone आला. मी सहसा unknown calls घेत नाही. त्यानुसार घेतला नाही. पण त्या व्यक्तीने पुन्हा 2 3 वेळा phone केला. शेवटी काय प्रकार आहे ते पहावं म्हणून phone घेतला तर ती व्यक्ती almost रडायला आली होती. पहिल्यांदा त्यांना थोडंसं समजावल्यावर परिस्थितीची gravity लक्षात घेऊन त्यांच्याशी पुढे बोलायचं ठरवलं.
तो phone एका भाजी विक्रेत्याचा होता. पुण्याजवळच्या एका गावामध्ये त्यांचा भाजी विक्रीचा व्यवसाय होता. वडिलांचा लहानपणीच वियोग झाल्याने त्यांचं बालपण मामाकडेच गेलं होतं आणि पुढे मामाच्याच मुलीशी त्यांचा विवाह झाला. नंतर 2 मुलगे झाले. पत्नी अतिशय तापट असल्याने त्यांना बराच त्रास होत होता. पूर्वी पत्नी यांच्या मुलांना आणि प्रसंगी त्यांना सुद्धा मारत असे असं त्यांनी सांगितलं. आता मुलं मोठी झाल्याने कधी कधी केवळ तेच पत्नीचा मार खातात असं सुद्धा त्यांनी सांगितलं. या सगळ्याला कंटाळून मागे ते 2 महीने गाणगापूरला जाऊन राहिले होते. त्यानंतर खोलात चौकशी केल्यावर समजलं की व्यक्ती केवळ धार्मिकच नाही तर आध्यात्मिक सुद्धा आहे आणि त्यांच्या आध्यात्मिक धारणा योग्य आहेत. ते पुढे म्हणाले की मी परत आलो कारण आपल्या घरच्या जबाबदाऱ्या पूर्ण न करता गाणगापूरला राहणं मला योग्य वाटलं नाही.
ते म्हणाले की काल परवा तर हद्द झाली कारण पत्नीने रागाच्या भरात घरातले टाक एका पातेलीने तव्यावर ठेऊन चेचले. मी त्यांना म्हटलं की म्हणजे तुम्हीच काय तर देव सुद्धा सुटले नाहीत तर. ते म्हणाले एवढंच नाही तर ती आमच्या घर मालकाशी सुद्धा भांडली आणि आता त्याने आम्हाला घर खाली करायला सांगितले आहे. एकतर माझं उत्पन्न कमी, त्यात हा अपमान, त्यामुळे मुलं सुध्दा मला घरात किंमत देत नाहीत आणि आता घर सोडायची वेळ आली. यामुळे माझ्या मनात आत्महत्येचे विचार सुरु होते. अशात माझा एक मित्र मला भेटला आणि त्याने तुमचा number दिला.
त्यांच्याशी थोडा वेळ बोलून त्यांना थोडा आधार दिला आणि त्यांचा problem astrologically पाहीन असं सांगितलं. त्यांचे मित्र सुद्धा अशाच काही अडचणी मधून जात असताना त्यांना काही उपाय मी सुचवले होते त्याने त्यांच्या अडचणी दूर झाल्या याची आठवण त्यांनी मला करुन दिली आणि मी त्यांनाही काही उपाय सुचवावेत अशी विनंती मला केली. याबद्दल आणखी काही गप्पा झाल्या. त्याने ते बरेचसे शांत झाले. आता आम्ही phone ठेवणार एवढ्यात मी त्यांना म्हटलं का हो तुम्ही खरचं आत्महत्या करणार होता का? तर म्हणाले की मी करणार होतो पण आपल्या धर्मात सांगितलंय ना की अशा माणसाचा आत्मा भटकत राहतो आणि त्याला गती मिळत नाही म्हणून विचार बदलला. या त्यांच्या वाक्याने मी अचंबित झालो. जिथे भले भले शिकलेले तर्कशुद्ध लोक सुद्धा आत्महत्या करतात. तो कायद्याने गुन्हा असून सुद्धा करतात, तिथे एक शाळेतही न गेलेला भाजीवाला, केवळ त्याच्या धर्मावरच्या श्रद्धेच्या आधारावर आत्महत्येपासून sahaj परावृत्त होतो ही गोष्ट सनातन धर्माबद्दल बरंच काही सांगून जाते. सनातन धर्माच्या प्रभावाचा हा एक मोठा दाखला आहे. मग पुढे मी त्यांना विचारलं की तुम्ही गाणगापूरहुन परत का आलात? तर म्हणाले की आपल्या धर्मानुसार मुलांची लग्नं होईपर्यंत त्यांची जबाबदारी आई वडिलांवर असते, मग मी माझी जबाबदारी पार न पडता माझं तिथे लक्ष कसं लागेल? भगवदगीता यालाच कर्तव्य कर्म किंवा प्राप्त कर्म म्हणते. ही गोष्ट त्यांना समजणं ही फार मोठी गोष्ट आहे. एका सामान्य व्यक्तीला जे धर्माच्या माध्यमातून समजलं ते अनेक वर्ष शिकून सुद्धा समजू शकत नाही. हे आपल्या जीवनातलं धर्माचं महत्व आहे. या दृष्टीने सनातन धर्म ही life style आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. मग अशा समाजाला कायद्याची भीती घालायची आवश्यकता तरी का राहील? धर्मातील अशा मूळ concepts सर्व हिंदूंना माहिती असणं आणि समजावून देणं अत्यंत आवश्यक आहे. हिंदूंना जर आपण सनातन धर्मातील प्रमुख संकल्पना समजल्या तर जगातले अनेक सामाजिक गोंधळ सहज सुटतील असं वाटतंय. याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
(C) गौरीश बोरकर
#gaurishborkar
#thinkingaloud
Comments
Post a Comment