लग्नातील विघ्ने
काही दिवसांपूर्वी मला एक call आला. ती मुलगी विदर्भातील तालुक्याच्या ठिकाणाची होती. Counselling हवंय म्हणाली. मी म्हटलं कशाबद्दल तर म्हणाली लग्नाबद्दल. Reference कोणी दिला वगैरे चौकशी झाल्यानंतर मी तिला वेळ दिली आणि त्यावेळी phone करायला सांगितला.
तिचा अगदी सांगितलेल्या मिनिटाला phone आला आणि मी impress झालो.
मुलीने तिची कथा सांगायला सुरुवात केली. वय अगदी 22-23 वर्षांचं असावं पण तिच्या विचारांमध्ये clarity होती. ती म्हणाली की मी आरक्षित जातीतील आहे आणि माझा boy friend open category मधला आहे. आमचं 8 वर्षांपासून affair आहे आणि आता आम्ही लग्न करायचं ठरवलं होतं पण घरचे बोलणी करायला बसले आणि सगळंच फिसकटलं. आता माझा boy friend म्हणतोय आपण लग्न करायला नको कारण तू काही आमच्या घरात fit होशील असं वाटत नाही.
मला जरा त्याच्याबद्दल शंका आली म्हणून मी तिला विचारलं, एकदम असं कसं काय झालं?
तर म्हणाली आम्ही त्यांच्याकडे बोलणी करायला गेलो होतो तेव्हा त्याच्या घरच्यांनी आमच्याकडच्या लोकांचा नीट मान केला नाही म्हणून मी त्याला तिथेच सगळ्यांसमोर बोलले ते त्याच्या घरच्यांना आवडलं नाही पण त्याने तिथे कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही ते मला आवडलं नाही. मी आधीपासून अशीच आहे हे त्याला चांगलं माहिती आहे. त्यामुळे मी सरळ स्पष्ट आणि खटाखट आहे आणि माझ्या अशा वागण्याबद्दल त्याला कधीच अडचण नव्हती.
बर मग तो बदलला का? मी तिला विचारलं.
तिला माझा रोख लक्षात आला आणि तिने मोठा pause घेतला. खरं तर मला असा boy friend मिळाला म्हणून सगळे मला lucky म्हणायचे.
असा म्हणजे कसा? मी पुन्हा clarification विचारलं.
शांत, सोज्वळ, समजूतदार. तिने दबकत दबकत 3 विशेषणं लावली.
म्हणजे तो सुद्धा बदललेला नाही ना? मी विचारलं.
पण त्याच्या स्वभावाचा एवढा problem होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं.
कदाचित त्यालाही आता तुझ्याबद्दल असंच वाटत असेल. मी त्याची बाजू मांडायचा प्रयत्न केला.
पण त्याने मला त्याच्या घरच्यांसमोर सांभाळून घ्यायला नको का? असं माझे वडील म्हणतात.
आता या चर्चेत एका नवीन पात्राची entry झाल्याने त्यांची ओळख करुन घेणं मला भाग होतं.
तुझे वडील आणखी काय काय म्हणतायत? मी पृच्छा केली.
खरं म्हणजे मुलाकडच्यांपेक्षा आमची आर्थिक बाजू वरची आहे. वडील म्हणतायत की तुला याहून फार चांगलं म्हणजे आपल्याला match होणारं स्थळ मिळेल. मी एवढे कष्ट करुन सगळं कमावलं आणि आता तुझं इथे लग्न झालं तर तुला पुन्हा zero पासून सुरुवात करावी लागेल. त्यापेक्षा आपण आहे तिथून पुढे जाणं जास्त बरं.
वडिलांचा कोणता व्यवसाय आहे? मी विचारलं. नाही आमच्याकडे सगळे सरकारी नोकरीत आहेत.
आणि मुलाकडचे? मी विचारलं.
त्यांची शेती आहे.
मराठा आरक्षणाचा मुद्दा एवढा का तापतोय त्याचं उत्तर मला मिळून गेलं.
तुमचा नीट मान केला नाही म्हणजे नक्की काय केलं? मी विचारलं
म्हणजे त्यांनी तसं रीतीचं सगळं केलं पण खायला एकच पदार्थ होता. पुन्हा काही हवंय का? हे सुद्धा विचारलं नाही. वगैरे वगैरे.
सामान्यपणे मुलाकडचे मुलीच्या घरी जातात ना? मग तुम्ही कसे काय त्यांच्याकडे गेलात? मी विचारलं.
ते आमच्याकडे आधी येऊन गेले ना. तेच तर मी म्हणतेय, आम्ही जसं त्यांचं सगळं थाटात केलं तसं त्यांनी आमचं केलं नाही.
बरं मग? मी विचारलं.
हेच मी त्यांना direct तोंडावर बोलले तर त्यांना आवडलं नाही ते. पण मी अशीच आहे. तेव्हा त्याने मला सांभाळून घ्यायला नको का?
तिने मला उलटा प्रश्न केला.
यावर तुझ्या बाबांचं काय मत आहे? मी तिला विचारलं.
पप्पांना माझं लग्न मोठ्या थाटात करुन द्यायचंय. जर लग्न मोठं केलं नाही तर एवढे कमावले त्याचा उपयोग काय? असं ते म्हणतायत.
पण तो नाही म्हणतो ना. तो म्हणतोय की मग मला पण मोठं लग्न करावं लागेल आणि माझ्याकडे आत्ता एवढे पैसे नाहीयेत.
तो काय करतो? मी विचारलं.
तो LIC मध्ये आहे. तसा त्याला चांगला पगार आहे पण त्याने घर बांधायला कर्ज घेतलंय. म्हणून तो म्हणतोय की माझ्याकडे मोठं लग्न करायला पैसे नाहीयेत.
मग त्याचं काय मत आहे? मी विचारलं.
तो म्हणतोय की आपण court marriage करू. म्हणजे सगळेच प्रश्न मिटतील. पण पपांना 5 एक हजार माणसं तरी लग्नाला बोलवायची आहेत. मी जर त्यांची एवढीही इच्छा पूर्ण करू शकले नाही तर मग काय उपयोग?
तिने पुन्हा मलाच प्रश्न केला.
ते शेतकरी आहेत, तर त्यांचं घर नव्हतं का? मी तिच्या प्रश्नाला बगल दिली.
त्यांचं साधं घर होतं पण मी त्याला म्हटलं की मी जेव्हा तुला आमच्या घरी introduce करेन तेव्हा तू आमच्या तोलामोलाचा वाटला पाहिजेस. म्हणून तू चांगलं मोठं घर बांध. माझ्या सांगणायानुसारच त्याने कर्ज घेऊन हे घर बांधलंय. पण पप्पा म्हणतात की ज्याच्याकडे लग्नालाच पैसे नाही तो तुला पुढे सांभाळणार कसा?
तू पुढे काय करायचं ठरवलंयस?
मी आत्ता 5 वर्षांचा BSc (nursing) चा course केला. पुढे मी masters करणार आहे. आणि मग आम्ही मोठ्या शहरात shift होणार आहोत. तिथे मला professor ची नोकरी नक्की मिळेल.
Ok म्हणजे मग त्याने इथल्या घराच्या loan चे हप्ते भरायचे आणि शहरातल्या घराचं भाडं पण भरायचं का? मी विचारलं.
तिने एक मोठ्ठा pause घेतला. पण सासर आमच्या तोलामोलाचं नको का वाटायला? म्हणूनच मीच घर बांधायला सांगितलं. आता तो म्हणतोय की मोठं लग्न करायचं असेल तर कमीत कमी 2 वर्षे थांब.
Ok म्हणजे तो मोठं लग्न करायला तयार आहे तर. मी clear करण्याच्या दृष्टीने विचारलं.
हो, पण तो आताच तिशीचा झालाय. म्हणून त्याच्या घरचे थांबायला तयार नव्हते. त्यामुळेच आम्ही आत्ता घरी सांगितलं.
पण तुम्ही आता लग्न केलं तर तुझं शिक्षण कसं पूर्ण होणार? मी एक वेगळाच मुद्दा काढला.
त्याने घरी सांगितलंय ना की माझं शिक्षण पूर्ण होई पर्यंत मला घरात कोणतंही काम सांगायचं नाही.
आणि?
त्याच्या घरचे याला हो म्हणालेत.
Ok म्हणजे त्याच्या घरचे सुद्धा तुला consider करतायत तर. मी आणखीन एकदा clarification घेतलं.
हूं... एक नुसताच हुंकार ऐकून मी म्हटलं मग आता अडचण कुठे आहे?
अहो आता तो म्हणतोय की तुझं आमच्या घरात जमणं अवघड आहे. त्या ऐवजी आपण इथेच थांबूया.
पण मी त्याला म्हटलं की आता काय divorce भरपूर होतात मग आपण try करू आणि नाहीच जमलं तर घेऊन टाकू मग divorce. मी त्याच्यासाठी risk घ्यायला तयार आहे पण तो तयार नाहीये.
मी म्हटलं हा म्हणजे तो म्हणतोय आतच थांबूया आणि तु म्हणतेयस की पुढे थांबूया.
मुलं वगैरे झाल्यानंतर थांबणं थोडं कटकटीचं होईल नाही का? मी एक वेगळा view द्यायचा प्रयत्न केला.
मी तिला म्हटलं की एक गोष्ट मात्र सांगतो, तू सगळं एवढं खरं खरं सांगते आहेस एवढं सहसा कोणी सांगत नाही.
ती म्हणाली त्याचा स्वभाव मला आता पर्यंत चांगला वाटायचा पण तो एवढा अडचणीचा होईल असं कधीच वाटलं नाही. त्याचं सगळं planing नुसार असतं. तो मला म्हणाला की तुला मोठं लग्न करणं अपेक्षित होतं तर मला आधीच सांगायचं होतं. मी तसं plan केलं असतं. त्या दिवशीचं माझं वागणं पाहून म्हणतोय की आपण इथेच थांबूया.
मी म्हटलं की तुमची जोडी अगदी नवरा बायको सारखीच वाटतेय. नवरा जर शांत असेल तर अनेकदा बायको direct असते. दोघेही एकाच स्वभावाचे असले तर अनेकदा मुलांमध्ये defects येऊ शकतात. ही निसर्गाची रचना आहे. तेव्हा तुझी त्याच्याकडून असलेली अपेक्षा मला योग्य वाटत नाही. तुझा बचाव तूच केला पाहिजेस. आणि जर तो मोठं लग्न करायला वेळ मागत असेल तर तो दिला पाहिजे कारण मोठं घर बांधायला तूच सांगितलंस ना?
पण असं काय झालं की 8 वर्षे सगळं सुरळीत चाललेलं एकदम बिघडलं? आता तर तो माझ्याशी बोलायला सुद्धा तयार नाहीये. तिने एक वेगळाच मुद्दा मांडला.
मागची आठ वर्षे तुम्ही दोघेच होता त्यामुळे तुमच्या आणि त्यांच्या घरातले dynamics कधीच picture मध्ये आले नाहीत. आता जे काही होतंय त्याचं कारण हे dynamics आहेत. खरं तर तुमच्या दोघांचा stance एकच आहे. तू तुझ्या वडिलांची बाजू मांडते आहेस आणि तो त्याच्या घरच्यांची! तुमच्या अपेक्षा सुद्धा same आहेत. त्याने तुला समजून घ्यावं असं तुला वाटतं आणि त्यालाही तेच वाटतंय. फरक केवळ expression चा आहे. पण त्यात सुद्धा तुला वाटतंय की त्याने तुझ्या सारखं express व्हावं आणि त्याला वाटतंय की तू त्याच्या सारखं!
माझ्या या सगळ्या सांगण्याने ती फारच अस्वस्थ झाली. तिला सुरवातीला वाटलं असावं की तिची बाजू योग्य आहे आणि तो चुकतोय असं मी म्हणेन. आता पुढे काय हे तिच्या डोक्यात येईना. मग एक अतिशय smart प्रश्न तिने मला विचारला आणि मलाही तिचं कौतुक वाटलं. ती म्हणाली की आमच्या जागी तुम्ही असता तर काय केलं असतं?
मी तिला म्हटलं की माझी परिस्थिती तुझ्या boy friend सारखीच होती. एकतर आमचं love marriage आहे. माझ्या बायकोकडचे आमच्यापेक्षा फारच श्रीमंत होते. कदाचित त्यांनाही वाटलं असेल की आमच्या मुलीचं लग्न एखाद्या सधन कुटुंबात करुन द्यावं. पण माझ्या बायकोला मात्र माझ्याशी लग्न करणं ही risk वाटत नव्हती. आणि मी त्यांना म्हटलं की अगदी 5000 माणसं बोलावण्यापेक्षा जेवढी कमीत कमी बोलावता येतील तेवढी बोलवा. शेवटी त्यांचा number 1200 वर थांबला. अजून तरी आमचं बरं चाललंय. ती लगेच म्हणाली मला तुम्ही काय म्हणताय ते कळतंय. म्हणजे आमचं पण बरं चालेल. मी पप्पाना पण सांगते आणि त्याला पण सांगते. शेवटी मधला मार्ग मलाच शोधला पाहिजे. तसा तो फार समजूतदार आहे हो. मीच जरा फटाकडी आहे हो. पण मी त्याला अशीच आवडते आणि मला पण तो आहे तसाच आवडतो. कदाचित ती असं म्हणताना लाजलीही असेल पण phone वर मला म्हणाली की तुमच्यामुळे बऱ्याच दिवसांनी आज माझ्या चेहऱ्यावर smile आहे.
अशी रोज 2-4 smiles मी नक्की कमावतो. हीच माझी संपत्ती आहे कारण what you give returns with a bounce. 😊
#vaishnavi
#gaurishborkar
#NLP
#premarriagecounseling
#marriagecounseling
Comments
Post a Comment