
माझं पहिलं पुस्तक Untold Vedic Astrology प्रकाशित होऊन आता जवळ जवळ 9 वर्षे झाली. त्याच्या 6 आवृत्ती प्रकाशित झाल्या. खरं तर एवढी वर्षे झाली हे मला लक्षातच आलं नाही. पण आज छान वाटतंय. ज्यावेळी पुस्तक लिहायला घेतलं तेव्हा कल्याणी म्हणाली की तू हे सगळं कशाला करतोयस? कोण वाचणार आहे तुझं पुस्तक? तिचं म्हणणं बरोबर होतं. एक म्हणजे या सगळ्यात मला काहीच अनुभव नव्हता. पुस्तक लिहिणं, छापणं आणि प्रकाशित करणं हा तसा मोठा व्याप होता आणि बाकी बऱ्याच priorities होत्या. Office मध्ये मोठी जबाबदारी होती. पण आमचे स्वामी म्हणायचे की आपल्याला समजलेल्या गोष्टी document झाल्या पाहिजेत. पुढे अनेकांना फार उपयोगी पडतात. त्यामुळे आपण आपल्याला समजलेलं लिहिलं पाहिजे असं मी ठरवून टाकलं होतं. आता लिहायला वेळ कसा मिळणार हा पुढचा प्रश्न होताच. तिथे सुद्धा स्वामींचीच idea वापरली. स्वामी प्रवासाला जाताना brief case घेऊन car मध्ये काम करायचे. पहिली 10 मिनिटं विषयांतर म्हणून अभंग ऐकले की त्यांच काम सुरु व्हायचं. मधे ते कोणाशीच फार बोलायचे नाहीत. ही संधी माझ्याकडे सुद्धा होती. सकाळी साधारण 7:30 ला cab यायची आणि ती 8:45 ला office मध्ये पोहोचायची. म्हणजे सकाळी सव्वा तास आणि संध्याकाळी दीड तास असे रोज पाववणेटतीन तास मिळायचे. प्रवास तसा comfortable असल्याने मी यावेळेचा सदुपयोग करायचं ठरवलं. थोडक्यात office मध्ये artificial intelligence सारखे विषय हाताळत असताना office नंतर वैदिक विषयांवर काम होत होत. दोन्ही विषय तेवढेच प्रगत आहेत असं मला वाटत. त्यांचे domains मात्र वेगवेगळे आहेत. आणखी एक नियम केला की काहीही झालं तरी रोज तीन पाने तरी लिहायचीच. पुस्तकावर बराच research आधीच झालेला होता पण सगळे संदर्भ पुन्हा जमवायला बराच वेळ लागला आणि साधारण आठ महिन्यात पहिली script तयार झाली. मग माझ्या एका जवळच्या मित्राला ती चुका काढायला पाठवली. त्याचं english चांगलं असल्याने त्याने बाकी सूचना केल्याच पण एक मोठी चूक दाखवली आणि तू असं कसं लिहिलंस? असं विचारलं. मग माझ्या लक्षात आलं की कधी कधी आपण म्हणतो ते आणि आपल्याला म्हणायचं असतं ते यात फरक पडतो. या दृष्टीने सगळं पुस्तक पुन्हा पुन्हा वाचून काढलं आणि मग छापणाऱ्याच्या शोधात निघालो. यात माझ्या ज्ञानात बरीच भर पडली आणि शेवटी आपणच आपलं पुस्तक छापायचं हे पक्कं केलं. तेव्हापासून आजपर्यंत हा प्रवास सुरूच आहे.
खरं म्हणजे मला मराठीत लिहायला आवडतं पण 2015 मध्ये laptop वर मराठी लिहिणं एवढं सोपं नव्हतं म्हणून पहिली सगळी पुस्तकं English मध्येच लिहिली. गेल्यावर्षी मात्र 'पुनर्जन्माच्या सत्यकथा' मराठीत आधी लिहिलं आणि मग पुन्हा English मध्ये लिहिलं.
Untold Vedic Astrology लिहिल्यापासून याचं मराठी भाषांतर उपलब्ध नाही का? अशी विचारणा सतत होत होती. शेवटी गेल्या वर्षी ठरवलं की आता हा ग्रंथ मराठीत लिहूया. जरी प्रत्येक edition पूर्वी पुस्तकात काही बदल केले असले तरी या निमित्ताने पुन्हा एकदा संपूर्ण पुस्तकाचा review होईल असा सुद्धा एक विचार होता.
तसं झालं सुद्धा. काही गोष्टी जास्त concise करुन मांडता आल्या. वैज्ञानिक दृष्टिकोनातून काही नवीन संशोधनांचे संदर्भ मिळाले आणि एकंदरीच मजा आली. मराठीत या पुस्तकाची वाट पाहणाऱ्यांची प्रतीक्षा आता संपली.

मराठीत 'वैदिक ज्योतिषाची मुलतत्वे' हे पुस्तक तुमच्या भेटीला घेऊन आलोय याचा एक वेगळा आनंद आहेच. हे पुस्तक म्हणजे मानसशास्त्र, वैद्यक शास्त्र, खगोल शास्त्र आणि ज्योतिष शास्त्र यांचा सुरेख संगम आहे. ज्योतिष शास्त्र निर्माण कसं झालं असावं हे मुख्यत: मांडण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. स्थानांची, ग्रहांची व राशींची कारकत्व कुठून आली. ते यात मांडलं आहे. चलित कुंडली आणि त्याचा जुळ्या भावंडांशी असलेला संबंध सांगितला आहे. ज्योतिषशास्त्रामधील विविध योग कसे निर्माण झाले ते सुद्धा सांगितलंय. आणि शेवटी कुंडली विश्लेषण करण्याची अनेक महत्वाची सूत्रे विशद करुन सांगितली आहेत. ज्योतिषाबद्दल काहीच माहिती नाही त्या व्यक्तीला हे पुस्तक कदाचित थोडं जड वाटेल पण ज्यांना जुजबी माहिती आहे त्यांना मात्र आवडेल. गेली 10 वर्षे English वाचकांच्या पसंतीला पडलेलं हे पुस्तक मराठी वाचकांना सुद्धा उपयुक्त ठरेल अशी अशा आहे. हे पुस्तक Amazon (https://amzn.in/d/gEr3k67) वर उपलब्ध आहेच. तुम्ही नक्की घ्या, कोणी ओळखीचे असेल त्यांना भेट द्या, आणि तुमचा अभिप्राय आठवणीने कळवा.
Comments
Post a Comment