Posts

श्री कृष्णाच्या १६१०० बायकांची गोष्ट

भगवान कृष्ण आणि त्यांच्या लीला याबद्दल अनेक प्रश्न विचारले जातात त्यातला एक महत्वाचा प्रश्न म्हणजे भगवान कृष्ण यांच्या १६१०० पत्नी. याबद्दल मला बरेच दिवस लिहायचं होतं पण केरला स्टोरीच्या निमित्ताने हा प्रश्न पुन्हा Radar वर आला म्हणून म्हटलं आता यावर थोडं लिहूया. मधे व्यस्त होतो म्हणून लिहायला थोडा उशीर झाला. ही कथा भागवत पुराणातल्या दहाव्या स्कंधातील ५९ व्या अध्यायात येते. त्या असुराच खरं नाव आहे भौमासुर. त्याला नरकासुर सुद्धा म्हणतात. कथेचा सारांश असा आहे की भौमासुराने बंदी केलेल्या 16100 राजकन्या भगवान कृष्णांनी भौमासुराचा वध करून सोडवल्या पण अशा राजकन्यांना कोण स्विकारणार असा प्रश्न निर्माण झाल्याने त्या राजकन्यांनी भगवान कृष्णांचा आश्रय घेतला. आधी थोडं असुर या शब्दाबद्दल सांगतो. आपल्याकडे ३ वेगवेगळे शब्द वापरले जातात. पहिला दैत्य, दुसरा राक्षस आणि तिसरा असुर. आपल्याला वाटतं तिन्हींचा अर्थ एकच आहे पण भाषाशास्त्राप्रमाणे असं नसतं.  दैत्य हा वेदांतील शब्ध आहे. आदिती आणि दिती अशा २ बहिणी होत्या. आदितीचे पुत्र ते आदित्य आणि दितीचे पुत्र ते दैत्य. राक्षस हा शब्द mostly आपल्याकडे त्र...

एका शेतकरी उद्योजकाची गोष्ट

चला आता थोडा वेळ मिळतोय तर थोडं बोलूया. मागे सांगितल्याप्रमाणे आता माझे दैवी अनुभव पुन्हा सुरु करायचीच आहे पण आज थोडी वेगळी गोष्ट. गेल्यावर्षी मी एका व्यक्तीला अगदी जुजबी भेटलो होतो कारण त्यांनी माझं पुस्तक अगदी जाता जाता विकत घेतलं होतं. परवा पुन्हा भेट झाली पण आम्ही एकमेकांना ओळखलंच नाही. मी माझं नाव सांगितल्यावर ते म्हणाले, तुमचं पुस्तक मी वाचलं, मला फार उपयोगी पडलं. मागच्यावर्षी 350 रुपयाचं पुस्तक घ्यावं की न घ्यावं असा विचार करणारा हा माणूस मला आठवला. त्याने मला थोडा discount द्या अशी विनंती केली होती आणि मी ती नाकारली होती कारण मी आधीच सवालतीच्या किंमतीत पुस्तकं विकत होतो. तो सगळा प्रसंग आता माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. तुमची आणखी पुस्तकं मराठीत असतील तर मला हवी आहेत असं त्याने मला सांगितलं. पण माझं तेवढं एकच पुस्तक मराठीत असल्याने आमच्या बोलण्याचा ओघ थोडा बदलला. मी त्यांना विचारलं कि तुम्ही काय करता? ते म्हणाले मी आज खाण्याचे पदार्थ विकायला आलोय. माझा गोडा मसाला 400 रुपये किलो आहे. बाजारात 600 रुपये किलो मिळतो. या किंमतीला कोणीही देणार नाही हवा असेल तर जा घेऊन थोडा. लगेच माझ्य...

निवडणुकीचं मानसशास्त्र

  हा विषय फार मजेशीर आहे कारण सगळं राजकारण इथे येऊन थांबातं किंबहुना राजकारण याच करता करतात. साहेबांच्या अनेक गोष्टी मला आवडतात त्यातली एक गोष्ट म्हणजे ही की ते स्पष्टपणे असं सांगतात. सत्तेत नसू तर जनतेची सेवा करता येत नाही. बाकी त्यांचे काही राजकीय शिष्य असं स्पष्टपणे न सांगता सत्तेत राहण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न करतात. आपण मानवी मेंदूचं structure पहिलं तर तो समजून घेण्याच्या अनेक पद्धती आहेत त्यातली सगळ्यात सोपी पण ढोबळ पद्धत म्हणजे Triune Brain Theory. यामध्ये असं मानलं जातं की मेंदूचे उत्क्रांती नुसार 3 भाग होतात. पहिला भाग सामान्यपणे आपल्या Basic Needs बद्दल काळजी करत असतो. दुसरा भाग आपल्या भावनांचा आहे आणि तिसरा तर्काचा. गंमत म्हणजे तर्काच्या भागापर्यंत पोहोचणारा प्रत्येक message हा पहिल्या 2 भागांतून जातो असं म्हणतात. म्हणजे तर्काच्या भागापर्यंत जाणारा प्रत्येक message हा basic needs आणि emotions च्या भागातून जातो. याची गंमत अशी आहे की तो message वाटेत अडवला जाऊ शकतो. याने काय होतं ते पुढे पाहू. मुख्य म्हणजे यातला कोणताही एक भाग प्रधान असतो आणि बाकीचे 2 supporting असतात. हॆ...

मानवी जीवनाचा अर्थशोध

  खरं म्हणजे याबद्दल मी आधीच लिहिणार होतो पण म्हटलं जरा थांबून लिहावं कदाचित जास्त नीट समजावता येईल. 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट असावी म्हणजे Lockdown च्या आधीची. एक दिवस आमच्या office च्या इथले watchman काका म्हणाले जरा गावाला जाऊन येतो. मी म्हटलं काय विशेष?  तर म्हणाले Elections आहेत, आम्हाला सगळ्यांना न्यायाला गाडी येणार आहे. मी विचारलं किती जण आहात तुम्ही? तर म्हणाले एक अख्खी बस भरून जाणार आहोत. मी म्हटलं अरे वा मज्जा आहे तुमची तर म्हणाले हो, जाताना सगळी तीर्थ क्षेत्रे दाखवणार आहेत. मी म्हटलं मग पार्टी मतदानानंतर का?  तर लाजत हो म्हणाले. मी म्हटलं आणि वरती किती? तर म्हणाले मताला 2 हजार तरी मिळतील यावेळी, Budget किती आहॆ माहिती नाही. मी म्हटलं मग मोदींना का?  तर म्हणाले नाही, Congress ला. मी म्हटलं असं कसं? मोदींनी तर तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेत अडीच लाख रुपये दिले ना? तर म्हणाले हो आणि कर्नाटक सरकारने साडेतीन लाख रुपये दिलेत बीनव्याजी ते काय आम्ही परत थोडीच करायचेत? मी विचारलं मग तरी मत Congress ला? तर म्हणाले हो कारण हॆ सगळं सरपंच Sanction करतो तो Congress चा ...

माझे दैवी अनुभव भाग १२

दरवर्षी प्रमाणे असाच एकदा देवीच्या दर्शनाला गेलो होतो. पूजा झाल्यावर देवीच्या देवळातून निघण्यापूर्वी नमस्कार करताना देवीला म्हटलं “आई, कर्म आणि त्याचं फळ याबद्दल अजून नीट समजलं नाहीये तर जरा नीट समजलं तर छान होईल.” अगदी सहजच म्हटलेलं त्यामुळे विषय तिथेच संपला. त्यादिवशी योगायोगाने आमचे काही नातेवाईक सुद्धा तिथे आले होते. तिथून पुढे हरिहरेश्वरला जायचा आमचा Plan होता. बोलता बोलता ते म्हणाले की हरिहरेश्वर आमचा कुलपुरुष आहे तर या निमित्ताने आम्ही सुद्धा येतो. आमचंही जाणं होईल. आम्ही म्हटलं चला, सोने पे सुहागा. त्यानुसार हरिहरेश्वर मध्ये एका Homestay ला Phone करुन Booking केलं. त्यावेळी आम्ही नवीनच Ertiga घेतली होती आणि ती Key Less होती. आमच्या नातेवाईकांचा Driver म्हणाला “काय? Car आणि चावीशिवाय? आजकाल काय काय येईल सांगता येत नाही”. आणि थोडा कुत्सित हसला. विषय तिथेच संपला. संध्याकाळ पर्यंत आम्ही हरिहरेश्वरला पोहोचलो, Homestay वर Lagguage ठेवलं, Fresh झालो आणि जेवायला जवळच्या एका खानावळीत गेलो. छान जेवण करून आल्यावर अगदी झोपायच्या तयारीत होतो. Driver करीता झोपायची वेगळी व्यवस्था होती त्यामुळ...

माझे दैवी अनुभव भाग ११

जन्मपत्रिका म्हणजे आपल्या जन्माच्या वेळची ग्रहस्थिती. यात आपल्या पूर्वजन्मातील कर्माचा लेखाजोखा असतो. त्यामुळे याजन्मातील कर्माचा हिशोब जन्मपत्रिकेत दिसत नाही. अगदी याचमुळे या जन्मातील कर्माला विशेष महत्व प्राप्त होते. आपले भविष्य हे मागच्या जन्मातील कर्माचा आणि या जन्मातील या आधीच्या कर्माचा मेळ आहे आणि अगदी इथेच ज्योतिषाचा उत्तम उपयोग होतो. आपले पूर्वकर्म काय निर्देशित करते आणि आपल्याला जे हवे आहे ते मिळवण्याकरिता अडचणी काय आहेत हे समजून घेऊन त्यावर योग्य उपाय केले तर आयुष्यात मोठा बदल सहज घडवता येतो. पण माझ्या भविष्यात काय वाढून ठेवले आहे असा प्रश्न विचारून केवळ दैवावर अवलंबून राहिलो तर ज्योतिषाचा विशेष उपयोग होत नाही. उपाय म्हटले कि आपल्या मनात पूजा, शांती, वगैरे असल्या गोष्टी येतात पण आजारी पडल्यावर डॉक्टरकडे जाणे, चांगल्या आरोग्याकरीता व्यायाम करणे, जोखीम आहे तिथे Insurance घेणे  हे सगळे उपायच आहेत. हे ज्यावेळी माझ्या लक्षात आलं तेव्हा मी विविध प्रकारच्या उपायांचा अभ्यास करायचं ठरवलं. वर दिलेले उपाय आपण सगळेजण करतोच म्हणून मी थोडे Unconventional उपाय शिकायचं ठरवलं. माझे सास...

माझे दैवी अनुभव भाग १०

हैद्राबादला गेल्यावर नवीन शहर, नवीन भाषा, नवीन कामाचा ताण या सगळ्यांबरोबर Adjust होण्याबरोबरच आम्ही सुद्धा एकमेकांना Adjust होत होतो. एवढं सोपं नसतं ते, नाही का? या काळात पुण्याला अनेकदा येणं जाणं होत असे. पुणे हैद्राबाद या रस्त्यावर मधले काही Patches Sensitive आहेत. Mostly मी Bus Prefer करायचो कारण Ticket सहज मिळायचं आणि घराजवळ Pick Up / Drop  होता. असंच एकदा पुण्याहून हैद्राबादला जात असताना मला एक वरात दिसली. त्या वरातीत सगळे Skeletons होते आणि ज्यांना खांदा दिलेला ती मात्र माणसं होती. हा काय प्रकार आहे हे कळायच्या आताच माझ्या अंगावर शहारे आले. मंत्राची मला सवय असल्याने मी चट्कन मंत्र धरला आणि काही समजण्याच्या आताच बस पुढे निघून गेली. हा काय प्रकार आहे हे मला कळलं नाही. ते खरं आहे की माझी कल्पना आहे हे मी ठरवू शकलो नाही. हॆ सगळ्यांना दिसतं की नाही याबद्दल मला कुतूहल होत. मी अनेक दिवस त्याच्यावर विचार करत होतो पण पुढे बरीच वर्षं हा प्रकार कोणालाच सांगितला नाही. आपल्याला जे समजलंच नाही ते दुसऱ्यांना सांगणार तरी कसं? त्याचे काही परिणाम नव्हते त्यामुळे काही दिवसांनी ते मी विसरून गेलो...