माझे दैवी अनुभव भाग १२

दरवर्षी प्रमाणे असाच एकदा देवीच्या दर्शनाला गेलो होतो. पूजा झाल्यावर देवीच्या देवळातून निघण्यापूर्वी नमस्कार करताना देवीला म्हटलं “आई, कर्म आणि त्याचं फळ याबद्दल अजून नीट समजलं नाहीये तर जरा नीट समजलं तर छान होईल.” अगदी सहजच म्हटलेलं त्यामुळे विषय तिथेच संपला.

त्यादिवशी योगायोगाने आमचे काही नातेवाईक सुद्धा तिथे आले होते. तिथून पुढे हरिहरेश्वरला जायचा आमचा Plan होता. बोलता बोलता ते म्हणाले की हरिहरेश्वर आमचा कुलपुरुष आहे तर या निमित्ताने आम्ही सुद्धा येतो. आमचंही जाणं होईल. आम्ही म्हटलं चला, सोने पे सुहागा. त्यानुसार हरिहरेश्वर मध्ये एका Homestay ला Phone करुन Booking केलं.

त्यावेळी आम्ही नवीनच Ertiga घेतली होती आणि ती Key Less होती. आमच्या नातेवाईकांचा Driver म्हणाला “काय? Car आणि चावीशिवाय? आजकाल काय काय येईल सांगता येत नाही”. आणि थोडा कुत्सित हसला. विषय तिथेच संपला.

संध्याकाळ पर्यंत आम्ही हरिहरेश्वरला पोहोचलो, Homestay वर Lagguage ठेवलं, Fresh झालो आणि जेवायला जवळच्या एका खानावळीत गेलो. छान जेवण करून आल्यावर अगदी झोपायच्या तयारीत होतो. Driver करीता झोपायची वेगळी व्यवस्था होती त्यामुळे काही काळजी नव्हती. जरा गप्पा मारत बसलो होतो तेवढ्यात खालून भांडणाचा आवाज आला. खिडकीतून खाली पाहिलं तर आमच्या नातेवाईकांचा Driver ओरडत होता आणि त्याचं आणि कोणाचं तरी जोरदार भांडण सुरु होतं. मी धावत खाली आलो आणि पाहिलं तर त्याचा शर्ट तिथे पडला होता आणि  बनियन फाटलेलं होतं आणि दुसरा माणूस त्याच्या अंगावर जोरात  ओरडत होता.

आमच्या नातेवाईकांचा Driver तसा भला माणूस, त्यांच्याकडे गेली २०-२५ वर्षं कामाला आहे. आम्ही त्याला कधी फार कोणाशी हुज्जत घालताना सुद्धा पाहिलेलं नाही. अगदी आमच्यापेक्षा थोडाच वयाने ज्येष्ठ असल्याने आम्ही एकमेकांशी सहजच गप्पा मारायचो. मी तिथे गेल्यानंतर मला फक्त एवढंच कळलं की तो अंगावर ओरडणारा माणूस Homestay च्या मालकांपैकी असावा आणि त्याचं म्हणणं आमच्या ड्रायव्हरने ऐकलेलं नसावं. मी खाली आल्यानंतर तो माणूस तावातावाने निघून गेला आणि मला वाटलं की चला विषय संपला, आता काय झालं ते समजून घेऊया. पण तेवढ्यात एक मधल्या वयाची व्यक्ती चांगला जाड बांबू घेऊन तावातावाने आली  आणि त्या Driver ला शोधू लागली. त्याचे पायच तोडून टाकतो आणि तो ड्राइव्हरचं काम कसं करु शकतो तेच पाहतो असं मोठ्याने ती व्यक्ती ओरडत होती. त्यांच्या मध्ये मी पडलो आणि त्यांना थांबायची विनंती केली. ही सगळी परिस्थिती पाहून कल्याणी आणि आमचे नातेवाईक वरून खाली आले. तेवढ्यात एक आजी compound wall वरून बांबू बाहेर घालून आमच्या एका Car च्या काचा फोडण्याचा प्रयत्न करू लागल्या आणि आणखी एक आजोबा त्या घरातून बाहेर आले. ते ७३व्या वर्षी सुद्धा कसे सक्षम आहेत आणि आमच्याशी सहज दोन हात करू शकतात याबद्दल एक छोटंस प्रास्ताविक झालं. इकडे आमच्या त्या Driver ला बांबूने मारण्याचा सतत प्रयन्त सुरु होता आणि मधे पडून त्याला वाचवण्याचा प्रयन्त मी करत होतो. या सगळ्यांत एकच हलकल्लोळ माजला. आता हे कसं थांबवायचं असा विचार करत असतानाच आमचे जे नातेवाईक होते त्यांनी त्या बांबूने मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसाचे पाय धरले आणि तिथे एकदम शांतता पसरली. एवढ्या वयस्कर माणसाने आपल्या पाय पडावं ही गोष्ट त्यांना फार  सहन झाली नाही आणि त्यांनी तुम्ही मधे पडू नका हे मी आणि हा तुमचा Driver पाहून घेऊ असा हेका लावला. आमच्या नातेवाइकांनी मी माझ्या Driver च्या वतीनेच तुमची माफी मागतो आहे असं म्हटल्यावर प्रकरण हळू हळू निवळायला लागलं. हे सगळं होईपर्यंत साधारण रात्रीचे साडेअकरा वाजलेले. शेवटी प्रकरण निवळलं आणि आम्ही सगळे पहिल्या मजल्यावर खोलीत गेलो.

वर खोलीत गेल्यावर मी आणि कल्याणीने जर शक्य असेल तर आत्ताच हा Homestay सोडून एखाद्या Hotel मध्ये लगेचच shift व्हायचं असं ठरवलं. कारण त्या Driver ला या लोकांनी रात्रीत खाली काही केलं तर? अशी आम्हाला शंका होती. एक दोन ठिकाणी Phone केल्यावर आम्हाला जवळच्याच एका Resort मध्ये जागा मिळाली. आम्ही आमचा निर्णय Homestay च्या मालकांना कळवला आणि ते खजील झाले. त्यांनी आमचे केवळ ५०% च पैसे घेतले आणि आम्ही Bags घेऊन Cars जवळ आलो. Driver म्हणाला की Car ची Key या सगळ्या भांडणात तुटली आहे. मग मी त्यांना जाऊन सांगितलं की आम्ही आमची एक Car रात्री इथेच ठेऊन जात आहोत कारण Car ची Key भांडणात तुटली आहे. तेवढ्यात त्यांचा मुलगा तावातावाने पुढे आला आणि म्हणाला की तुमचा Driver खोटारडा आहे. मी तुम्हाला Car सुरू करून दाखवतो. त्याने येऊन Car ची तुटकी Key फिरवली आणि आश्चर्य म्हणजे Car सुरू झाली. आता ही काय नवीन भानगड आहे असं म्हणून मी सगळा Area Reiki ने Scan केला तर मला काहीच Abnormal वाटलं नाही. तेवढ्यात त्या Driver ने Car बंद करून पुन्हा सुरू करायचा प्रयत्न केला आणि ती काही सुरू होईना. पुन्हा जाऊन त्या मुलाला Car सुरू करून द्यायची मी विनंती केली तर तो म्हणाला की मी एकदा सुरू करून दिली आता माझी जबाबदारी संपली, आता मी सुरू करून देणार नाही. आमच्याकडे मात्र ती Car तुटलेल्या Key ने काही केल्या सुरू होईना. शेवटी आम्ही त्यांना आमची Car रात्रभर तिथेच ठेऊन घेण्याची विनंती केली आणि दुसऱ्या Car ने सगळेजण Resort वर गेलो. हे सगळं होईपर्यंत पहाटेचे २ वाजलेले. आता पुढचं काय ते उद्या सकाळी पाहू म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला आणि सगळे तसेच झोपी गेलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर म्हटलं पहिल्यांदा हरिहरेश्वराचं दर्शन घेऊया मग पुढचं काय ते पाहूया. अंघोळ करून देवळात गेलो आणि हरिहरेश्वराला म्हटलं; महाराज, हे काही चाललंय ते समजुतीच्या बाहेरचं आहे. तेव्हा आता तुम्हीच काय ते पहा.

आमच्या ओळखीचं एक कुटुंब हरिहरेश्वरला राहत होतं. त्यांचा Phonenumber मिळवला आणि त्यांना Phone करून सगळी हकिगत सांगितली. ते म्हणाले हरिहरेश्वरात कोणी Mechanic नाही पण माझा जो नेहमीच  Mechanic आहे त्याला Phone करुन बोलावून घेतो, तो Car तात्पुरती Fix करुन देईल. आम्ही त्यांना होकार दिला आणि बाहेर येऊन छान नाश्ता केला. नंतर Homestay च्या मालकांच्या मुलाला Phone केला तर तो म्हणाला काय कुठे आहात? मी म्हटलं इथेच देवळाजवळ आहोत तर उलट म्हणाला, मला वाटलं रात्री गेला असाल २०-२५ Kilometers दूर. त्याचा उद्धटपणा सहन करून मी त्याला सहज म्हटलं आता पुढे काय करुया? तर म्हणाला सकाळीच आम्ही आमच्या Mechanic ला Phone केलेला आहे पण आज ईद आहे त्यामुळे तो त्याच्या सवडीने येतो म्हणालाय. मी त्याला सांगितलं की आम्ही पण Mechanic बोलावतोय तर म्हणाला इकडे इतके सहज Mechanics येत नाहीत परत आज ईद आहे त्यामुळे जो पहिला येईल त्याला Car Fix करु देत, दुसऱ्याला उलटं पाठवून देऊ.

मी त्याला बरं म्हटलं आणि काल जशी त्याच्याकडे तुटक्या Keys ने Car सुरु झाली होती तशी आपल्याकडे होईल का हे पाहायला जायचं ठरवलं. कल्याणी म्हणाली मी पण येते म्हणून आम्ही दोघे Homestay च्या बाहेर  पोहोचले. आश्चर्य म्हणजे त्यांचा मुलगा आणि घरातल्या आजी लगबगीने बाहेर निघाल्या होत्या. मी त्याला म्हटलं की तुम्ही कुठे चाललात? आम्हाला कदाचित तुमची मदत लागेल. तर तो म्हणाला की आत्ताच माझी आत्या पाय घसरून पडली आणि तिचा हात Fracture झालाय तेव्हा आम्ही दोघे तिकडे निघालो आहोत, घरात बाकी माणसं आहेत ती तुम्हाला आवश्यक ती मदत करतील. काय चाललंय त्याचा थोडासा अंदाज मला यायला लागला होता आणि त्यामुळे मी थोडा निर्धास्त झालो. मी अनेक प्रयत्न करून ती Car काही सुरु होईना. मधे मधे आम्ही बाहेर काय करतोय हे पाहायला त्यांची गुरं हाकणाऱ्या मुलाला ते पाठवत होते. तेवढ्यात मला आमच्या ओळखीच्या आजोबांचा Phone आला की त्यांचा Mechanic तासाभरात पोहोचतोय. आम्हाला जरा आणखी बरं वाटलं. थोड्या वेळाने ते आजोबा स्वतः Scooty वरून आमच्याकरीता थंड पाण्याच्या बाटल्या घेऊन आले. गावातील माणसं आता आपल्या घरासमोर यायला लागली आहेत आणि आम्हाला मदत करत आहेत यामुळे ते कुटुंब अस्वस्थ व्हायला लागलं. या आधी ते अधून मधून त्यांच्या घराच्या Balcony त येत होते पण आता त्यांचं येणंही बंद झालं. ते आजोबा म्हणाले की मी ८३ वर्षांचा आहे अजूनही रोज २५ सूर्यनमस्कार घालतो. अगदी हल्ली हल्ली पर्यंत मी Car सुद्धा चालवायचो. आता घरचे मला कार चालवायला देत नाहीत. त्यांचा Fitness दाखवण्याकरिता त्यांनी त्यांचा शर्ट वर केला आणि त्यांचे ४ पॅक Abs दाखवले. पुढे म्हणाले की तुम्हाला काहीही मदत लागली तर मला Phone करा. इथले सगळे लोक माझ्या ओळखीचे आहेत. तुमच्या अंगाला कोणीही हात लावू शकणार नाही. या प्रसंगामुळे त्या Homestay मध्ये बरीच चलबिचल सुरु झाली आणि आम्हाला काही हवं आहे का असं विचारायला त्यांची मुलगी १-२ दा येऊन गेली. शेवटी दुपारी १२-१२:३० ला आमच्या ओळखीच्या आजोबांनी बोलावलेला Mechanic आला आणि १:३० वाजेपर्यंत त्याने ती कार तात्पुरती Keyless म्हणजे एका पत्र्याच्या तुकड्याने सुरु होईल अशी करुन दिली.

गेल्या २४ तासात बरंच काही घडलं जे फारच मजेशीर होतं. जो Driver Keyless Car ला हसत होता त्याला काहीशी तशाच प्रकारची Car चालवायची पाळी आली. जो माणुस आमच्या Driver चे पाय तोडायला निघाला होता आणि ज्या  बाई आमच्या Car च्या काचा फोडायचा प्रयत्न करत होत्या, त्यांच्या बहीणीचा किंवा मुलीचा हात Fracture झाला. ज्या वयस्कर व्यक्तीबद्दल ते जोराने सांगत होते त्यांच्याच गावातील त्याहून वयस्कर एक व्यक्ती त्यांच्याच घरासमोर येऊन स्वतःचा शर्ट वर करून Fitness दाखवून गेली. आणि आम्हाला २०-२५ किलोमीटर दूर गेला असाल असं म्हणणारा माणूस Car घेऊन घरातून बाहेर पडला.

कर्माचं फळ एवढ्या सूक्ष्म Level वर सुद्धा असतं की काय? केवळ मानसिक कर्माचं सुद्धा एवढं फळ मिळू शकतं की काय? केवळ संकल्प करून एखादी घटना घडू शकते का? देवीने एवढ्या लवकर आणि अशा पद्धतीने माझी इच्छा पूर्ण केली की काय? अशा अनेक Possibilities मनात घेऊन आम्ही हरिहरेश्वर सोडलं आणि पुण्याला आलो.

(c) Gaurish Borkar #daivianubhav #gaurishborkar

Comments

Popular posts from this blog

पुनर्जन्माच्या सत्यकथा: सनातन धर्म आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीतून पूर्वजन्म आठवणाऱ्या व्यक्तींचा अभ्यास

यथा पिंडे तथा ब्रहमांडे चा पुरावा