निवडणुकीचं मानसशास्त्र
हा विषय फार मजेशीर आहे कारण सगळं राजकारण इथे येऊन थांबातं किंबहुना राजकारण याच करता करतात.
साहेबांच्या अनेक गोष्टी मला आवडतात त्यातली एक गोष्ट म्हणजे ही की ते स्पष्टपणे असं सांगतात. सत्तेत नसू तर जनतेची सेवा करता येत नाही. बाकी त्यांचे काही राजकीय शिष्य असं स्पष्टपणे न सांगता सत्तेत राहण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न करतात.
आपण मानवी मेंदूचं structure पहिलं तर तो समजून घेण्याच्या अनेक पद्धती आहेत त्यातली सगळ्यात सोपी पण ढोबळ पद्धत म्हणजे Triune Brain Theory.
यामध्ये असं मानलं जातं की मेंदूचे उत्क्रांती नुसार 3 भाग होतात. पहिला भाग सामान्यपणे आपल्या Basic Needs बद्दल काळजी करत असतो. दुसरा भाग आपल्या भावनांचा आहे आणि तिसरा तर्काचा. गंमत म्हणजे तर्काच्या भागापर्यंत पोहोचणारा प्रत्येक message हा पहिल्या 2 भागांतून जातो असं म्हणतात. म्हणजे तर्काच्या भागापर्यंत जाणारा प्रत्येक message हा basic needs आणि emotions च्या भागातून जातो. याची गंमत अशी आहे की तो message वाटेत अडवला जाऊ शकतो. याने काय होतं ते पुढे पाहू.
मुख्य म्हणजे यातला कोणताही एक भाग प्रधान असतो आणि बाकीचे 2 supporting असतात. हॆ प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळं असतं. उदाहरणार्थ कोणाचा तरी emotional भाग प्रधान असेल तर कोणाचा तर्कचा! सोपं आहे ना? आत्ता याचा निवडणुकीशी काय संबंध?
राजकारण्याचं गणित अगदी यावरच चालतं. त्यांना हॆ सगळं Theoratically माहीत असेल असं नाही पण अनुभवाने बऱ्याच गोष्टी कळत असाव्यात. परदेशात तर experts योजून असे अभ्यास केले जातात त्यामुळे भारतात सुद्धा राजकारणी ते आता वापरत असावेत.
Basic Needs वाल्यांची मतं थोडी costly असतात. त्यांना तुम्ही जर काही दिलं तरच ते तुम्हाला मत देतात. याची सगळ्यात simple version म्हणजे मतदानाच्या वेळी दिले जाणारे पैसे आणि पार्ट्या. पुढे त्याची अनेक versions आली. अगदी टीव्ही, scooty, भांडी, laptop, computer वगैरे अनेक गोष्टी वाटून झालेल्या आहेत.
मला वाटतं इंदिराजींनी याचा पहिल्यांदा policy म्हणून उपयोग केला. रोटी, कपडा, मकान ही योजना अगदी basic needs चा भाग active असणाऱ्या लोकांकरता तयार केली. मोदीजींनी प्रधानमंत्री आवास योजना आणून इंदिराजींचा नारा पूर्ण केला.
याच्या एक पाऊल पुढे शिक्षण आणि आरोग्य येईल आणि येत्या काळात फुकट शिक्षण आणि आरोग्य हा निवडणुकीचा मुद्दा बनेल. याची सुरवात या आधीच आप पार्टीच्या सरकार ने केली आहे.
बऱ्याचदा हॆ मतदार पक्षाशी loyal नसतात. याने दिलं की याच्याकडे आणि त्याने दिलं तर त्याच्याकडे अशी थोडीशी त्यांची वृत्ती असते.
Reservation हा दुसरा मुद्दा या category मध्ये येतो पण यात थोडा पुढच्या category चा भाग पण येतो.
दुसरी category म्हणजे emotional मतदार. हॆ लोक values, तत्व, ideology वगैरे असल्या गोष्टी बोलत असतात. हॆ long term चे आणि फार खर्च न करता align करता येणारे मतदार असतात म्हणून प्रत्येक पक्षाचा यांच्यावर डोळा असतो. कोणतातरी अभिमान असणारे मतदार या category मध्ये येतात मग ती जात असो धर्म असो किंवा आणखी काही. या category च्या माणसांना भक्त हॆ नाव अगदी योग्य आहे पण हॆ भक्त एकाच पक्षात नसून सगळ्या पक्षात असतात. या लोकांना द्यायला काहीच लागत नाही कारण त्यांना भावनिक आवाहन पुरतं.
जातीचं राजकारण आता एवढं सोपं राहिलेलं नाही कारण एका पक्षाने एका ठराविक जातीचा उमेदवार रिंगणात आणला तर दुसरा पक्ष त्याच जातीचा सक्षम उमेदवार देण्याचा प्रयत्न करतो. पण तरी सुद्धा प्रत्येक जातीचे सक्षम नेते आहेतच आणि त्यांचं राजकारणात वजन सुध्दा आहे.
दुसरा भाग आहे धर्माचा आणि निधर्माचा. निधर्माच राजकारण खूप यशस्वी होऊ शकणार नाही पण धर्माचं नक्की होईल कारण निधर्मी लोक असा अभिमान बाळगत नाहीत.
यातून अशी एक strategy निर्माण झाली की हिंदूंना जातीत वाटायचं आणि इतर धार्मियांना आपल्याकडे वळवायचं.
भाजपाने याच strategy ला छेद देऊन हिंदू ही नवी category तयार केली आणि ती फारच यशस्वी झाली. विशेष म्हणजे भारतामध्ये दुसरा कुठलाही राष्ट्रीय पक्ष नाही जो हिंदुत्ववादी म्हणून मिरवू शकेल कारण त्यांनी आधीपासूनच बाकीचे धर्म book करून ठेवले आहेत.
शेवटची category बुद्धिवादी लोकांची आहे. हॆ लोक निवडणुकीत कमी interested असतात. यांना आपल्याकडे वळवायला effort खूप लागतो. त्यामुळे राजकारण्यांना या लोकांमध्ये कमी interest असतो तरीही राजकारणी या लोकांचा बुद्धिभेद कारण्याचा प्रयत्न करतात. या लोकांचे कळीचे मुद्दे म्हणजे विकास, निधर्मीपणा, प्रदूषण, global warming असे असतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर असे मुद्दे मांडले जातात त्यामुळे यावर केलेलं काम आंतरराष्ट्रीय पातळीवर दाखवता येतं पण याचा निवडणुकीत फार उपयोग नसतो कारण या लोकांची संख्या कमी असते.
विशेष म्हणजे बुद्धी पर्यंत येणारा प्रत्येक message हा पहिल्या 2 भागातून येतो त्यामुळे त्यापैकी जर का तो तिथे कुठेतरी अडकला तर मग logic काम करत नाही आणि केवळ गरजा आणि भावना यांच्या जीवावर भागतं आणि राजकारण्याचं फावतं.
हॆ सगळं फार सहज बदलता येण्यासारखं नाहीये पण जर सतर्क आणि सुजाण नागरिक व्हायचं असेल तर
गोष्टींकडे analytically पाहणं, numbers वर भर देणं, surroundings मध्ये reality पाहणं, बातम्यांकडे, विशेषतः social media कडे दुर्लक्ष करणं. आपल्या surroundings ला घडणाऱ्या गोष्टी बातम्यांशी compare करणं. चौकसपणे लोकांशी बोलून त्यांची बाजू समजून घेणं, अशा गोष्टी करणं आवश्यक आहॆ. असं केलं नाही तर जेव्हा जाग येईल तेव्हा फार उशीर झालेला असेल आणि आपण पुन्हा हाच प्रश्न विचारू की गेल्या 75 वर्षात काय केलं? फक्त पार्टी आणि मुद्दे वेगळे असतील.
- गौरीश बोरकर
#gaurishborkar #thinkingaloud
Comments
Post a Comment