मानवी जीवनाचा अर्थशोध
खरं म्हणजे याबद्दल मी आधीच लिहिणार होतो पण म्हटलं जरा थांबून लिहावं कदाचित जास्त नीट समजावता येईल.
2-3 वर्षापूर्वीची गोष्ट असावी म्हणजे Lockdown च्या आधीची. एक दिवस आमच्या office च्या इथले watchman काका म्हणाले जरा गावाला जाऊन येतो.
मी म्हटलं काय विशेष?
तर म्हणाले Elections आहेत, आम्हाला सगळ्यांना न्यायाला गाडी येणार आहे.
मी विचारलं किती जण आहात तुम्ही?
तर म्हणाले एक अख्खी बस भरून जाणार आहोत.
मी म्हटलं अरे वा मज्जा आहे तुमची
तर म्हणाले हो, जाताना सगळी तीर्थ क्षेत्रे दाखवणार आहेत.
मी म्हटलं मग पार्टी मतदानानंतर का?
तर लाजत हो म्हणाले.
मी म्हटलं आणि वरती किती?
तर म्हणाले मताला 2 हजार तरी मिळतील यावेळी, Budget किती आहॆ माहिती नाही.
मी म्हटलं मग मोदींना का?
तर म्हणाले नाही, Congress ला.
मी म्हटलं असं कसं? मोदींनी तर तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेत अडीच लाख रुपये दिले ना?
तर म्हणाले हो आणि कर्नाटक सरकारने साडेतीन लाख रुपये दिलेत बीनव्याजी ते काय आम्ही परत थोडीच करायचेत?
मी विचारलं मग तरी मत Congress ला?
तर म्हणाले हो कारण हॆ सगळं सरपंच Sanction करतो तो Congress चा आहे. त्याला 5000 रुपये आणि पार्टी द्यावी लागते.
मी म्हटलं म्हणजे एकूण 6 लाख मिळाले तुम्हाला?
तर म्हणाले हो आणि त्यातले दीड लाख उरले, मोठा फायदा झाला माझा.
आता तुम्ही म्हणाल की oh म्हणून भाजपा हरलं का? याबद्दल मला माहिती नाही. मला थोडा वेगळा Point मांडायचा आहे.
वर्षभरापूर्वी watchman काकांचं पोट एका बाजूने मोठं झालेलं दिसलं.
मी विचारलं काय झालं?
तर दुखतंय म्हणाले. गावी जाऊन तिथल्या हॉस्पिटल मध्ये उपचार घेतो. 2 आठवड्यात गावाकडून बातमी आली की त्यांना Cancer झालाय आणि पुढच्या 3 आठवड्यात बातमी आली की watchman काका गेले. एक बायको विधवा झाली आणि दोन मुलं पोरकी झाली. मला वाईट तर वाटलंच पण कुतूहल होतं की असं का झालं असेल.
मी office जवळच्या एका मित्राला विचारलं तर तो म्हणाला Lockdown मध्ये तो फुकट गेला. म्हटलं म्हणजे काय बाबा, तर म्हणाला भरपूर प्यायला लागला होता. मी हॆ observe केलं होतं की watchman काका हल्ली मधे मधे पैसे मागायचे, एक दिवस संध्याकाळी तर ते कल्याणीशी तंद्रित जोरदार गप्पा मारू लागले. आमचं जरा मनोरंजन झालं पण भरपूर दारू प्यायचे हॆ माहिती नव्हतं. माणूस खूप चांगला होता. विडी काडी काही नाही. सराईत पिणारे सुध्दा नव्हते.
माझं कुतूहल वाढलं. Lockdown मध्ये एखादा माणूस एकदम दारू प्यायला कसा लागेल? थोडी चौकशी केल्यावर कळलं की Lockdown च्या थोडं आधीपासून ते प्यायला लागले होते आणि ते हळू हळू वाढत गेलं. असं का झालं याचं उत्तर शोधणे आता क्रमप्राप्त होतं.
तुम्ही Man's Search for Meaning वाचलंय का? नसेल तर नक्की वाचा. Victor Frankl ने जीवनाचं महत्वाचं तत्वज्ञान त्यात सांगितलं आहे. त्यात Victor चं असं Observation आहे की Concentration camp मधले कैदी ज्यावेळी जगण्याची आशा सोडतात तेव्हा ते एक पाव एका Cigarette बरोबर exchange करतात आणि ती Cigarette आकाशाकडे पाहत निवांत ओढत बसतात. त्यांना कसलीही भीती नसते, काळजी नसते. मी IT Companies मध्ये असताना हॆ पहिलं आहे. अगदी कमी वयामध्ये अनेक गोष्टी Achieve केल्यानंतर माणसं निवांत होतात मग आयुष्यात excitement नाही म्हणून Parties करतात. Cigarette ओढतात, दारू पितात काही तर drugs सुध्दा घेतात. गंमत म्हणजे ही सगळी माणसं पूर्वी अशी नसतात तर 30 35 व्या वर्षी हॆ सगळं सुरु करतात. Watchman काकांच अगदी असंच झालं. आपल्या मुलांकरता आपण घर बांधाव अशी त्यांची महत्वाकांक्षा होती. त्यासाठी ते झटत होतं पैसे साठवत होते. हेच त्यांच्या आयुष्याचं मुख्य ध्येय होतं. हॆ ध्येय त्यांच्या आयुष्यात अपेक्षेपेक्षा फारच आधी पूर्ण झालं आणि मग पुढे काही उरलंच नाही. आता आहे त्या पैशाचं काय करायचं ते त्यांनी ठरवलं. आता पैसे साठवायचीही गरज उरली नाही. आता आपल्या आजूबाजूचे लोक ज्या मजा करतात त्या आपणही कराव्या म्हणून ते सुसाट सुटले आणि शेवटी त्यांची मुलं बाळं पोरकी झाली, बायको विधवा झाली.
आपल्या आयुष्यात आपल्या समजूती आणि कुवातीप्रमाणे आपण काही उद्दिष्ट ठरवत असतो. एवढं आपल्या आयुष्यात झालं तर आपण धन्य झालो असं आपल्याला वाटतं. मागच्या पिढीच्या मध्यम वर्गीय कुटुंबात मुलं चांगली शिकली, त्यांना नोकरी लागली, त्यांची लग्नं झाली, नातवंड झाली की आपण धन्य झालो असं मानलं जायचं, ज्यावेळी अनपेक्षितपणे आपली महत्वाकांक्षा अनपेक्षितपणे पूर्ण होते तेव्हा एक hypnotic state तयार होते आणि पुढे काय करायचं हॆ कळत नाही त्यातूनच असले छंद सुशिक्षित समाजामध्ये सुद्धा लागतात तर अशिक्षित माणसांच काय? कदाचित या पुढे काय होतं ते काही राजकीय पक्षांना माहीत असावं त्यामुळेच की काय त्यांनी दारू सुद्धा स्वस्त केलीये. पण ज्यांना हॆ कळत नाही त्यांनी हॆ लक्षात घेतलं पाहिजे की ज्यावेळी आमदार, खासदार, नगरसेवक जेव्हा असे कोणत्यातरी लाटेवर निवडून येतात त्यांची सुद्धा अशी श्रीमंताच्या पोरासारखी अवस्था होऊ शकते. म्हणून या फुकटच्या schemes बंद करा आणि सामान्य लोकांना त्यांच्या कुवतीप्रमाणे त्यांची ध्येयं साध्य करू द्या. नाहीतर कर्माच्या सिद्धांताप्रमाणे हेच आणि असंच वागणं त्यांच्याच पक्षात पाहण्याची वेळ त्यांच्यावर येण्याचीच शक्यता फार आहे.
जय हिंद
गौरीश बोरकर #gaurishborkar #thinkingaloud
Comments
Post a Comment