माझे दैवी अनुभव भाग ११

जन्मपत्रिका म्हणजे आपल्या जन्माच्या वेळची ग्रहस्थिती. यात आपल्या पूर्वजन्मातील कर्माचा लेखाजोखा असतो. त्यामुळे याजन्मातील कर्माचा हिशोब जन्मपत्रिकेत दिसत नाही. अगदी याचमुळे या जन्मातील कर्माला विशेष महत्व प्राप्त होते. आपले भविष्य हे मागच्या जन्मातील कर्माचा आणि या जन्मातील या आधीच्या कर्माचा मेळ आहे आणि अगदी इथेच ज्योतिषाचा उत्तम उपयोग होतो. आपले पूर्वकर्म काय निर्देशित करते आणि आपल्याला जे हवे आहे ते मिळवण्याकरिता अडचणी काय आहेत हे समजून घेऊन त्यावर योग्य उपाय केले तर आयुष्यात मोठा बदल सहज घडवता येतो. पण माझ्या भविष्यात काय वाढून ठेवले आहे असा प्रश्न विचारून केवळ दैवावर अवलंबून राहिलो तर ज्योतिषाचा विशेष उपयोग होत नाही.

उपाय म्हटले कि आपल्या मनात पूजा, शांती, वगैरे असल्या गोष्टी येतात पण आजारी पडल्यावर डॉक्टरकडे जाणे, चांगल्या आरोग्याकरीता व्यायाम करणे, जोखीम आहे तिथे Insurance घेणे  हे सगळे उपायच आहेत. हे ज्यावेळी माझ्या लक्षात आलं तेव्हा मी विविध प्रकारच्या उपायांचा अभ्यास करायचं ठरवलं. वर दिलेले उपाय आपण सगळेजण करतोच म्हणून मी थोडे Unconventional उपाय शिकायचं ठरवलं. माझे सासरे रेकी शिकले होते आणि त्याची काही applications मी पहिली होती म्हणून मी पहिल्यांदा रेकी शिकायचं ठरवलं.

रेकी एका Doctor चं Specifically रोगनिवारण करण्याकरीता केलेलं Invention आहे म्हणून म्हटलं ते आधी Try करू. रेकी एक Universal Energy असल्याने कोणाकडूनही आपल्यापर्यंत येऊ शकते यामुळे विशिष्ट व्यक्तीकडून शिकायला पाहिजे असं नसावं असं मला वाटलं आणि मी Online Search करून जवळच असलेल्या एक Reiki Teacher ला Phone केला. त्यांनीही लगेच हो म्हटलं आणि येत्या Weekend लाच भेटायचं असं ठरलं. म्हणजे हे काही Seminar वगैरे नव्हे त्यांनी मला त्यांच्या घरी बोलावलेलं आणि २ दिवसात माझं Reiki Level 1 चं Training पूर्ण झालं.

हैद्राबादला मला यापूर्वी एकदा Accident झालेला आणि त्यामुळे माझ्या मनगटात एक हाड पुढे आलेलं. मनगट वाकवलं की ते हाड विशेष पुढे आलेलं दिसायचं. गंमत म्हणजे Reiki चं Training पूर्ण झाल्यावर १५ दिवसात ते पुढे आलेलं हाड दिसेनासं झालं. आता हा रेकीचाच परिणाम आहे का हे काही कळत नव्हतं आणि मी एवढं काही Expect पण केलं नव्हतं. यानंतर Reiki वर काही experiments करायचे असं ठरवलं. माझ्या मुलीवर याचा काही परीणाम होतो का हे पाहूया म्हणून एक दिवस तिला Physical म्हणजे स्पर्श करून Reiki देण्याचा प्रयन्त केला तर तिने माझे हात जोरात झटकले. त्यावेळी ती अवघ्या काही महिन्यांची होती त्यामुळे यात काहीतरी अर्थ असावा असं मला वाटायला लागलं. मी अनेकदा प्रयन्त करूनही माझे हात ती झटकते म्हणून तिला मी Distant म्हणजे स्पर्श न करता Reiki द्यायला लागलो. अगदी त्याने सुद्धा ती Restless व्हायची पण आजारी असताना Reiki चा तीच्यावर काही प्रमाणात चांगला परिणाम होऊ लागला. उदा. ताप आला असता ती Reiki दिल्यावर लगेच शांतपणे झोपू लागली आणि हे आपल्याला जमतंय असं मला वाटायला लागलं आणि मी अधून मधून जमेल तशी Reiki घरातल्या घरात वापरायचो. विशेष म्हणजे त्या Reiki Teacher ची आणि माझी आयुष्यातील ती एकमेव भेट. ना पुन्हा कधी मी त्यांच्याकडे गेलो ना त्यांनी मला कधी Contact केला.

पुढे एकदा आम्ही गोव्याला आमच्या घरी काही कार्यक्रमानिमित्त गेलो होतो. एका संध्याकाळी काय करायचं असा विचार करत असताना सगळे म्हणाले चला Old Goa फिरून येऊ. घरची Car घेतली आणि Old गोव्याला गेलो. Car Paid Parkig मध्ये Park केली आणि Francis Xavier यांच्या Church मध्ये गेलो. अशी वदंता आहे की Francis Xavier यांचा हाताचा अंगठा अजूनही हलतो आणि ते पाहायला त्यांच्या थडग्याला एक विशेष खिडकी आहे. ते मी पाहिलं पण मला काही असं दिसलं नाही आणि मला ते शक्य सुद्धा वाटलं नाही म्हणून त्याची आम्ही भरपूर टिंगल केली.

इकडे काळोख पडला म्हणून थोडंसं फिरून घरी जायला Car जवळ आलो तर लक्षात आलं की Car तर Unlocked आहे. काय झालं असावं ते माझ्या लक्षात आलं म्हणून जाऊन Car ची Trunk उघडली तर Car मधली माझी Sack गायब होती. अजूनही ज्योतिष फार पहायला सुरवात केलेली नसल्यामुळे रेकीच्या आधाराने Area Scan केला. माझ्या लक्षात आलं की Francis Xavier यांची टिंगल आपल्याला भोवलेली असू शकते. त्यामुळे सर्वप्रथम त्यांची क्षमायाचना केली, मग वस्तू कोणत्या बाजूला गेली ते पाहिलं आणि त्या Parking Owner कडे गेलो. त्याला म्हटलं की माझ्या Car मधून माझी Sack चोरीला गेली आहे. ती कोणी चोरली ते तुम्हाला माहिती असणारच आहे. मला माहिती आहे की तो माणूस Sack घेऊन Church च्या मागच्या बाजूला गेला आहे पण त्यांना ती Sack मला द्यावीच लागेल. त्याने साहजिकच त्याला यातली काहीही कल्पना नाही असं दाखवलं. त्या Sack ला मी Protection दिलं आणि Boundry आखून दिली. हे सगळं झाल्यावर जवळच्या पोलीस चौकीत गेलो आणि रीतसर तक्रार नोंदवली. शेवटी रात्री उशिरा  Car घेऊन घरी गेलो. दैवावर विश्वास ठेवायचा म्हणजे काहीच करायचं नाही असं नव्हे तर दैव काय आहे ते समजून घेऊन ते बदलण्याकरीता सर्व प्रकारे कष्ट घ्यायचे.

दुसरा दिवस तसाच गेला. तिसऱ्या दिवशी घराचा कार्यक्रम होता त्याकरिता आम्ही गोवा आणि महाराष्ट्र Border वर असलेल्या एका गावात आलेलो जिथे Mobile Network अजिबात नव्हता. संध्याकाळी कार्यक्रम संपवून घरी जाता जाता एक Phone आला. तो माणूस म्हणाला मी Cab Driver आहे, Old Goa Church जवळ एका झाडाखाली आज सकाळी मला एक बॅग सापडली त्यात तुमचं Business Card होतं म्हणुन मी तुम्हाला सकाळपासून Phone करतोय. ती Bag माझ्याकडे घरी ठेवली आहे तुम्ही माझ्या घरी या आणि घेऊन जा. त्या माणसाची ओळख विचारली, Sack मध्ये असलेल्या वस्तूंची माहिती विचारली. ती त्या माणसाने अगदी तंतोतंत सांगितली. Phone ठेवल्यावर Car मधल्या सगळ्यांना ही घडामोड सांगितली. आम्ही Car मधले सगळेच अवाक होतो.

घरी पोहोचल्यावर पुन्हा एकदा त्या Cab Driver ला Phone केला आणि सगळी माहिती पुन्हा घेऊन एकदा Confirm केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी Cab Driver ला भेटायला जायचं ठरलं. आमच्या घरातल्या आणखी एका मोठ्या व्यक्तीला घेऊन मी त्या Cab Driver ला भेटायला गेलो आणि ती Bag घेऊन आलो. त्यात केवळ एक वस्तू नव्हती ती म्हणजे माझ्या Car च्या Keys आणि Remote. त्यामुळे मला माझ्या कार चे Locks तिथेच बदलून घ्यावे लागले.

मी तुम्हाला मागे म्हटलं होतं ना कीं देवता सगळ्याच धर्मात असाव्यात आणि Christian धर्माबद्दल तुम्हाला पुढे सांगेन, ते याच प्रसंगाबद्दल. झाडाला माळा घालणारे लोक तर मी अमेरिकेत सुद्धा पहिले आहेत.

रेकीबद्दल आणखी काही प्रसंग येत्या भागांत सांगेन आणि Personality च्या बाकी Layers बद्दल पुढच्या भागात बोलू.

(c) Gaurish Borkar #daivianubhav #gaurishborkar


Comments

Popular posts from this blog

पुनर्जन्माच्या सत्यकथा: सनातन धर्म आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीतून पूर्वजन्म आठवणाऱ्या व्यक्तींचा अभ्यास

यथा पिंडे तथा ब्रहमांडे चा पुरावा