माझे दैवी अनुभव भाग ९

 अनुग्रहपूर्वीची अनेक वर्ष घरात आणि बाहेर दोन्ही ठिकाणी मी लहान असूनही आणि मला एखाद्या विषयातलं काहीही कळत नसून सुद्धा अनेकजण माझा ज्योतिषी म्हणून सल्ला घेत. त्यामुळे मला जे प्रश्न पडतात ते कोणाला विचारायचे हा एक मोठा प्रश्न माझ्यासमोर होता. दुसरं म्हणजे एवढ्या लहान वयात आपल्याला सगळं कळतं असं वाटणं ही फार चांगली गोष्ट नाही, कारण हे शिकायचं वय असतं आणि आपण स्वतःहुन शिकलेलं बरं असतं.  नियतीने जर आपल्याला शिकवायचं ठरवलं तर ते शिक्षण फारच अवघड होऊन बसतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला नतमस्तक व्हायला एक जागा आवश्यक असते. अनुग्रहाने ती जागा मला सापडली आणि पुढची सगळी वर्षं आनंदात गेली.

२००७ साली उपासनेचा महत्वाचा टप्पा पार पडल्यानंतर आमचं लग्न झालं. या काळात मी ज्योतिष एवढं सोडून दिलं होतं की कल्याणीला म्हणजे माझ्या बायकोला मी ज्योतिष पाहत होतो असं लग्न झाल्यावर अनेक महिन्यांनी कळलं. त्याहूनही विशेष गोष्ट म्हणजे आमची दोघांची पत्रिका जुळते का नाही हे सुद्धा मी पहिले नाही. गंमत म्हणजे मी लग्न करेन असे घरच्यांना त्यावेळी शक्य वाटत नव्हतं त्यामुळे मी लग्न करतोय याबद्दलच ते खुश होते. त्यापुढे त्यांनी सुद्धा काहीही विचारलं नाही. अजूनही काही वेळा पालक contact करून सांगतात की मुलांनी लग्न ठरवलंय तर पत्रिका पाहून जरा सांगा की त्यांचं जमेल ना. मी त्यांना हेच सांगतो की मुलांनी ठरवलंय ना मग पत्रिका पाहून शंका निर्माण करू नका. महत्वाची गोष्ट म्हणजे ज्याची पत्रिका आहे त्याच्याशी बोलल्याशिवाय मी पत्रिका पाहतच नाही. Privacy First.

२००६ साली हैद्राबादला Microsoft चं office सुरु झालं आणि मला वाटायला लागलं की इतकी वर्षं ज्या Technology वर मी काम करत आहे ती Technology निर्माण करण्यामध्ये जर आपला काही सहभाग झाला तर ती आनंदाची बाब असेल. हा विचार हळूहळू पक्का होत गेला आणि मी याबद्दल माझ्या मित्रांशी चर्चा करू लागलो. ते मला म्हणाले अरे तुला Microsoft मध्ये जायचं तर Apply कर ना. मी त्यांना म्हणायचो नाही रे,  ते स्वतः होऊन मला बोलावतील. सगळे मित्र हा मुद्दा मात्र हसण्यावारी नेत, मला म्हणत हा काय माज आहे? माझा हा विचार खरंच हास्यास्पद होता. मला अजूनही माहीत नाही की मला असं का वाटायचं. त्यावेळी आपला swag च भारी होता भाऊ! पण शेवटी तो दिवस आला, एक दिवस मला खरंच Microsoft मधून फोन आला आणि माझी Collar ताठ झाली! त्यांनी मला सांगितलं की आम्ही येत्या शनिवारी पुण्यात येतोय, अगदी एकच दिवस आहोत, तुमचा Resume Shortlist केलाय, तुम्हाला Interest आहे का? मी लगेच हो म्हटलं. Director बरोबर Interview असेल तो clear झाला तर पुढचे २ Interviews तुमचा Manager आणि Program Manager घेतील पण Director नी जर तुम्हाला select केलं तर Mostly offer मिळतेच. शनिवारी सकाळी १०ला या, Director बरोबर त्यादिवशीचा पहिला Interview तुमचाच ठेवतो.

शनिवारी Interview झाला आणि त्याच दिवशी ऑफर letter पण हातात पडलं. हे सगळंच Magical होतं. Confidence पहा किती आहे! ज्या दिवशी Interview घेतला त्याच दिवशी Offer Letter दिलं. Successful Organizations अशाच असतात.

मागे Graduate झाल्यानंतर माझ्यासमोर २ पर्याय होते, एक म्हणजे Compus Recruitment मध्ये मिळालेली ६००० रुपयांची Offer घ्यायची किंवा मला आवडणाऱ्या गोष्टी करायच्या. या सगळ्या प्रकारात मी ६००० रुपयांची नोकरी सोडून २५०० रुपयांची नोकरी पकडली. त्यावेळी आईने नाक मुरडलेलं आणि आता मी हैद्राबादला जाणार म्हणून पुन्हा एकदा नाक मुरडलं. मुलाचं चांगलं व्हावं असं तर आईला वाटतच पण मुलगा आपल्याजवळ असावा असं सुद्धा वाटतं. स्वामींनाही माझं हैद्राबादला जाणं फार पसंत नव्हतं, त्यांनी ते मला स्पष्ट बोलूनही दाखवलं, पण गेल्या ८ वर्षांत समजलेल्या अनेक गोष्टींचा पडताळा मला घ्यायचा होता आणि त्याकरिता लागणारं  Intense Atmosphere कदाचित Microsoft मधेच असावं की काय कोण जाणे.

मला अनेकदा Metaphysical experiences येतात हे स्वामींना माहिती होतं. ते अनुभव Handle करण्याच्या माझी एक  पद्धत होती. मी जाण्यापूर्वी स्वामींना याबद्दल विचारलं कारण तिथे ते इतक्या सहज Available असणार नव्हते. त्यांनी सांगितलं या सगळ्याला केवळ मंत्र पुरेसा आहे. आजपर्यंत केवळ ध्यानात घेतलेल्या मंत्राचा या गोष्टीत सुद्धा उपयोग होईल असं मला कधी वाटलं नव्हतं; ना कधी मी प्रयोग केला होता. जाण्यापूर्वी मला बाकी फार काही प्रश्न नव्हते.

शेवटी जायची तारीख पक्की झाली. मी आणि कल्याणी  एका वेगळ्याच परिस्थितीत हैद्राबादला रवाना झालो कारण त्यावेळी तिचं शिक्षण पूर्ण झालं नव्हतं. माझी परिस्थिती फार वेगळी नव्हती, माझं Vertical नवीन होतं आणि Domainही बदललेला. इतकी वर्ष मी एक Solid IC म्हणून काम केलेलं असताना Microsoft नी मला असा एक अख्खा Project दिलेला ज्याबद्दल भारतात कोणालाही काहीही माहिती नव्हतं. त्यापुढे तिकडे अनेक Metaphysical Experiences आले त्याबद्दल येत्या भागांत सांगतो.

(c) Gaurish Borkar #daivianubhav #gaurishborkar

Comments

Popular posts from this blog

पुनर्जन्माच्या सत्यकथा: सनातन धर्म आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीतून पूर्वजन्म आठवणाऱ्या व्यक्तींचा अभ्यास

यथा पिंडे तथा ब्रहमांडे चा पुरावा