माझे दैवी अनुभव भाग ७
मी लहान असल्यामुळे आणि मोफत भविष्य पहात असल्याने अनेक जण भविष्य विचारायला येत असत. अगदी माझे मित्र सुद्धा गंमत म्हणून प्रश्न विचारत असत.
१२ वी झाल्यानंतर मी जरी BSc ला गेलो तरी माझे अनेक मित्र Obviously Engineering ला गेले. त्यातला एक मित्र बाहेर गावाचा होता पण त्याला चांगले गुण मिळाल्याने तो पुण्यातल्या Top College मध्ये Computer Engineering करू लागला.
सधन कुटुंबातून आल्याने Hostel ची सवय नव्हती त्यामुळे तो आमच्या घरी Weekend ला अनेकदा यायचा. माझी आई माझ्या सगळ्याच मित्रांना प्रेमाने खायला घालायची तशीच त्यालाही घालायची. High IQ असणाऱ्यांच्या एका संस्थेचा तो सदस्य होता. त्यामुळे ज्योतिष वगैरे सब झूठ है आणि आम्ही लोक उगीचच वेळ फुकट घालवत आहोत असं त्याचं पक्कं मत होतं.
एक दिवस तो मला म्हणाला की ज्योतिष जर खरं असेल तर आज मी दिवसभरात काय केलं असेल ते सांग बरं. (असले प्रश्न लोक अनेकदा विचारतात.) मी पट्कन मनात प्रश्न कुंडली मंडळी आणि म्हटलं की आज उशिरा जेवलास वाटतं आणि कडधान्याची उसळ खाल्लीस. बिचाऱ्याची हवा Tight झाली. गंमत म्हणजे भाजी आवडत नाही म्हणून त्या दिवशी Mess मधे केवळ पोळी आणि उसळ खाल्ली होती पठ्ठयाने. एवढं बरोबर येऊन सुद्धा मला म्हणाला जेवणात तर रोज भाजी किंवा उसळच असते. मी मनात म्हटलं अजून याची हौस फिटलेली दिसत नाही.
पुढच्या रविवारी तो दुपारी चहाच्या वेळी घरी आला आणि मला म्हणाला चल आज काय खाल्लंय ते सांगितलंस तर मानेन तुला. मी म्हटलं काही तरी पांढरं आणि खारट आहे. तर मला म्हणाला पदार्थ सांग. पण असा पदार्थ काही माझ्या लक्षात येईना. मी म्हटलं नाही बाबा लक्षात येत असा पदार्थ. तर हसत हसत म्हणाला मी मुद्दाम ब्रेड वर नुसतं मीठ घालून खाऊन आलोय. मला वाटलेलं की तू Bread Butter सांगून टाकशील! मी त्याला म्हटलं अरे Butter प्रश्न कुंडलीत दिसलं तर पाहिजे ना. मी उगीच असं कसं सांगेन त्यानंतर मात्र त्याने मला फार कधी डिवचलं नाही.
असाच आणखी एक प्रसंग सांगतो. एक ओळखीचे गृहस्थ होते, ते सतत येऊन काही ना काही प्रश्न विचारत. एकदा त्यांनी विचारलं की माझा Visa कधी Process होईल. मी त्यांना उलटं उत्तर सांगितलं की या तारखेपर्यंत Process होणार नाही, त्यानंतर Process सुरु होईल. काही दिवसांनी ते एक newspaper घेऊन आले. मला म्हणाले की या तारखेपर्यंत Visa processing बंद आहे असं लिहिलंय, ही बातमी वाच. मी म्हटलं बर मग काय? तर म्हणतात कसे, मला वाटलं की हॆ तू आधीच कुठेतरी वाचलं होतं कि काय? मी त्यांना चिडून म्हटलं की हॆ वाचायची मला गरजच काय? अहो मीच तर ठरवतो की Visa Processing कधी बंद ठेवायचं आणि कधी सुरु करायचं! मग मात्र ते म्हणाले की ज्योतिष एवढं Accurate असू शकतं याची मला कल्पना नव्हती.
तसे सांगण्यासारखे प्रसंग जवळ जवळ रोजच घडत होते पण Privacy महत्वाची आहे म्हणून इथे अनेक प्रसंग सांगणार नाही. त्याचबरोबर ही सगळी भाकिते बरोबर येत होती म्हणजे भाकिते चुकत नव्हती असं मुळीच नाही पण चुकांमधून शिकत आम्ही पुढे जात होतो.
असेच दिवस जात होते, ज्योतिष तर सुरूच होतं. Computer Course आणि BSc दोन्ही संपत आलं. माझा भविष्य सांगण्यातला Interest हळू हळू कमी होत चालला होता. मी ज्यावेळी मागे वळून पाहिलं त्यावेळी माझ्या लक्षात आलं की आपल्या आयुष्यात काही घटना का घडतात याचं उत्तर शोधण्याकरता मी ज्योतिषाचा अभ्यास सुरू केला होता आणि मूळ विषय सोडून मी दणादण भविष्य सांगायला लागलो होतो.
आता आणखीन एक प्रश्न त्यात Add झाला त्यामुळे २ प्रश्न माझ्यासमोर आ वासून उभे होते. पहिला प्रश्न हा की आयुष्यात काही घटना का घडतात? आणि दुसरा प्रश्न असा की अशा घडणाऱ्या घटना बदलता येतात का?
याचा विचार करत असताना त्यावेळी ग्रहांचा आपल्यावर परीणाम का व कसा होतो यावर मी वेगवेगळ्या Theories मांडत होतो. उदाहरणार्थ ग्रहांना Gravity आहे आणि आपल्याला सुद्धा Gravity आहे म्हणून आपल्यावर ग्रहांचा परीणाम होतो. याचा अर्थ आपल्या जवळ असलेल्या आणि Gravity असलेल्या सगळ्या Living आणि Non-living गोष्टींचा आपल्यावर परीणाम होत असावा. तसंच आपला सुद्धा आपल्या surroundings वर परीणाम होत असावा. या Theory मध्ये एक Issue आला. परीणाम जर केवळ वजनावर ठरत असेल तर ज्याचं वजन जास्त त्याचा परीणाम जास्त व्हायला पाहीजे पण असं दिसत नाही त्यामुळे ही Theory Fail झाली. त्यामुळे परीणाम कोणत्यातरी वेगळ्या माध्यमातून होतो असं मला वाटू लागलं.
आता परिणामाचं माध्यम अदृश्य असल्यामुळे मी आणखीन एक Theory तयार केली. आपल्या सर्वांवर कोणत्यातरी आत्म्याचा सतत प्रभाव असतो. ज्याच्या Influence मुळेच आपण एका ठराविक प्रकारे वागत असू आणि हे आत्मे या ग्रहांवरून येतात! थोडक्यात म्हणजे काय होतंय ते कळत होतं पण Exactly लक्षात येत नव्हतं. त्यामुळे Concept Formation थोड्या वेगळ्याच भाषेत होत होतं.
पुढे हळू हळू माझ्या लक्षात आलं की आत्मे वगैरे काहीही नसून हे केवळ आपल्यावर असलेले पूर्वजन्मीचे संस्कार असतात. दुसरं म्हणजे ग्रह आपल्यावर परिणाम करत नसून ते केवळ आपलं पूर्वकर्म निर्देशित करत असतात.
आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मी शोधू लागलो. त्यातून एक विचार पुढे आला की जर आपण जर का स्थूलाच्या पलीकडे गेलो किंवा मुक्त झालो तर आपल्याला हे स्थूलाचे कोणतेही नियम लागू होणार नाहीत म्हणजेच आपण पूर्वजन्माच्या कर्माने बांधलेले राहणार नाही म्हणजेच आपल्यावर ग्रहांचा परीणाम होणार नाही. हा विचार माझ्या आयुष्यातला एक मोठा Turning Point ठरला. आणि मग पुढे काय झालं ते पुढच्या Posts मध्ये पाहूया.
क्रमशः
(c) Gaurish Borkar #DaiviAnubhav #GaurishBorkar
Comments
Post a Comment