माझे दैवी अनुभव भाग १०
हैद्राबादला गेल्यावर नवीन शहर, नवीन भाषा, नवीन कामाचा ताण या सगळ्यांबरोबर Adjust होण्याबरोबरच आम्ही सुद्धा एकमेकांना Adjust होत होतो. एवढं सोपं नसतं ते, नाही का?
या काळात पुण्याला अनेकदा येणं जाणं होत असे. पुणे हैद्राबाद या रस्त्यावर मधले काही Patches Sensitive आहेत. Mostly मी Bus Prefer करायचो कारण Ticket सहज मिळायचं आणि घराजवळ Pick Up / Drop होता. असंच एकदा पुण्याहून हैद्राबादला जात असताना मला एक वरात दिसली. त्या वरातीत सगळे Skeletons होते आणि ज्यांना खांदा दिलेला ती मात्र माणसं होती. हा काय प्रकार आहे हे कळायच्या आताच माझ्या अंगावर शहारे आले. मंत्राची मला सवय असल्याने मी चट्कन मंत्र धरला आणि काही समजण्याच्या आताच बस पुढे निघून गेली. हा काय प्रकार आहे हे मला कळलं नाही. ते खरं आहे की माझी कल्पना आहे हे मी ठरवू शकलो नाही. हॆ सगळ्यांना दिसतं की नाही याबद्दल मला कुतूहल होत. मी अनेक दिवस त्याच्यावर विचार करत होतो पण पुढे बरीच वर्षं हा प्रकार कोणालाच सांगितला नाही. आपल्याला जे समजलंच नाही ते दुसऱ्यांना सांगणार तरी कसं? त्याचे काही परिणाम नव्हते त्यामुळे काही दिवसांनी ते मी विसरून गेलो. पुढे अनेक वर्षांनी याचा खुलासा झाला.
या काळात महापुरुष आणि संत यांची चरित्रे जमेल तशी वाचत होतो आणि त्यातून अनेक प्रश्न निर्माण होत होते. या सगळ्या प्रश्नांची डोक्यात खिचडी तयार झाली आणि एक दिवस स्वामींसमोर मी माझी Case मांडली. वेगवेगळ्या महापुरुषांच्या आयुष्यातील उदाहरणं दिली आणि त्यांना विचारले की महापुरुष असे कसे वागू शकतात? उदा. मी त्यांना म्हटलं १० नोव्हेंबर १८८६ या दिवशी London इथे स्वामी विवेकानंद म्हणाले की “When I eat meat I know it is wrong. Even if I am bound to eat it under certain circumstances, I know it is cruel. I must not drag my ideal down to the actual and apologise for my weak conduct in this way. The ideal is not to eat flesh, not to injure any being, for all animals are my brothers.” (https://estudantedavedanta.net/Complete%20Works%20of%20Swami%20Vivekananda.pdf) स्वामी विवेकानंद अगदी direct होते, स्वतःबद्दल एवढं स्पष्ट बोलण्याची पद्धत अध्यात्मिक क्षेत्रात फारच कमी आहे. यावर स्वामी फक्त एवढंच म्हणाले “महापुरुष अनेकदा त्यांच्या प्रकृतीनुसारच वागतात.”. त्यांनी माझी Case अगदी सहज Dismiss करून टाकली पण त्यांनी हॆ उत्तर फार seriously आणि काळजीपूर्वक दिलं. स्वामींची उत्तरं नेहमीच Realistic असायची आणि उगीचच Rosy Picture ते Create करायचे नाहीत पण ते सगळंच सांगायचे नाहीत आणि विचार करायला भाग पडायचे. या वेळीही त्यांनी अगदी तसंच केलं. आता हे असं कसं हे समजून घेण्याचा Ball माझ्या Court मधे होता. विचार करता करता माझ्या लक्षात आलं की Physique तर नेहमीच प्रकृतीचा भाग राहणार आणि त्यामुळे कोणतीही व्यक्ती Partly तरी प्रकृतीशी संबंधित राहणारच. महापुरुष प्रकृतीनुसार वागणं हा एक Choice म्हणून वापरत असावेत. उदाहरणार्थ स्वामी विवेकानंदांना आजारामुळे पाणी प्यायचं नव्हतं तेव्हा ते म्हणाले की मी राजहंस आहे त्यामुळे केवळ दूध पिणार आणि बरेच दिवस ते पाण्याशिवाय राहिले. ही त्यांची क्षमता होती.
पण या सगळ्यामुळे माझ्या Theory वर पुन्हा एकदा पाणी पडलं. मी असं समजून चाललो होतो की Spiritual Level वर ग्रहांचा परीणाम होणार नाही पण हे माझ्या लक्षातच आलं नाही की आपलं शरीर तर राहणारच आहे, अर्थात मन आणि बुद्धी सुद्धा Most of the Times शाबूत असणार आहे आणि त्यामुळे आपली Theory work होऊ शकत नाही. आता मी एक Circle पूर्ण केलं होतं पण त्यामुळेच मला काय होऊ शकतं याचा बऱ्यापैकी अंदाज आला होता. माझ्या हे लक्षात आलं होतं की आपल्याला Personality च्या सगळ्या Layers वर काम करावं लागेल आणि ग्रहांच्या प्रभावातून सुटण्याचा केवळ हाच मार्ग आता उरला आहे. पण या आधी मला ग्रहांच्या प्रभावातून नक्की सुटता येतं याची खात्री हवी होती आणि म्हणून मी Historical Data पाहायचं ठरवलं त्यातून मला बरेच शोध लागले.
पहिल्यांदा मी विज्ञानाचा मानवी जीवनावरचा परिणाम पाहायचं ठरवलं त्यात Life Expectancy पाहिली तेव्हा सहज लक्षात आलं की Medical Advancement बरोबर १९२० पासून पुढे भारतात Life Expectancy (https://www.statista.com/statistics/1041383/life-expectancy-india-all-time/) वाढलेली आहे. १९२० मध्ये ती साधारणपणे २१ होती ती २०१० मध्ये ६५ च्या वर गेली आहे. याचा अर्थ असा होऊ शकतो की आयुर्मान ठरलेलं नसतं. नाहीतर वैद्यकीय शास्त्रामुळे आयुर्मान एवढं वाढलं असतं का? असा प्रश्न मला पडला.
अगदी तसंच जर का आपण विवाहाचं वय पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की १९९८ पासून ते २०१६ पर्यंत यात लक्षणीय फरक पडलेला आहे. त्यामुळे आयुष्यातील घटनांचा काळ बदलू शकतो याचा दाखला आपल्याकडे आहे असं मला वाटू लागलं.
घटनेचा काळ बदलला की त्याचा इतर घटनांवर सरळ परिणाम असतो. उदाहरणार्थ पूर्वी विवाह लवकर होत आणि Life Expectancy कमी होती याचा परिणाम म्हणून १९०१ मध्ये विधवांचे प्रमाण भारतात १८ टक्के होतं. १९८१ मध्ये हे प्रमाण ८.५ टक्क्यांवर आलं.(https://ijsw.tiss.edu/greenstone/collect/ijsw/index/assoc/HASH01fa/b43b0dc3.dir/doc.pdf)
हे सगळं पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं की घटना आणि आणि घटनेचा काळ दोन्ही बदलता येऊ शकतं. मग ज्योतिषाचं Exact Application काय आहे असा प्रश्न मला पडला. त्याचं उत्तर पुढल्या भागात पाहूया.
(c) Gaurish Borkar #daivianubhav #gaurishborkar
Comments
Post a Comment