श्री कृष्णाच्या १६१०० बायकांची गोष्ट

भगवान कृष्ण आणि त्यांच्या लीला याबद्दल अनेक प्रश्न विचारले जातात त्यातला एक महत्वाचा प्रश्न म्हणजे भगवान कृष्ण यांच्या १६१०० पत्नी. याबद्दल मला बरेच दिवस लिहायचं होतं पण केरला स्टोरीच्या निमित्ताने हा प्रश्न पुन्हा Radar वर आला म्हणून म्हटलं आता यावर थोडं लिहूया. मधे व्यस्त होतो म्हणून लिहायला थोडा उशीर झाला.


ही कथा भागवत पुराणातल्या दहाव्या स्कंधातील ५९ व्या अध्यायात येते. त्या असुराच खरं नाव आहे भौमासुर. त्याला नरकासुर सुद्धा म्हणतात.


कथेचा सारांश असा आहे की भौमासुराने बंदी केलेल्या 16100 राजकन्या भगवान कृष्णांनी भौमासुराचा वध करून सोडवल्या पण अशा राजकन्यांना कोण स्विकारणार असा प्रश्न निर्माण झाल्याने त्या राजकन्यांनी भगवान कृष्णांचा आश्रय घेतला.


आधी थोडं असुर या शब्दाबद्दल सांगतो. आपल्याकडे ३ वेगवेगळे शब्द वापरले जातात. पहिला दैत्य, दुसरा राक्षस आणि तिसरा असुर. आपल्याला वाटतं तिन्हींचा अर्थ एकच आहे पण भाषाशास्त्राप्रमाणे असं नसतं. 


दैत्य हा वेदांतील शब्ध आहे. आदिती आणि दिती अशा २ बहिणी होत्या. आदितीचे पुत्र ते आदित्य आणि दितीचे पुत्र ते दैत्य. राक्षस हा शब्द mostly आपल्याकडे त्रास देणाऱ्या microorganisms (अदृश्य) करता वापरला आहे. तिसरे म्हणजे असुर.


असुरिय नावाचा एक प्रदेश आहे. ही civilization इसवीसनापूर्वी २१०० शतकं ते इसवीसनापूर्वी १४०० शतकं एवढी जुनी आहे असं म्हणतात. या प्रदेशाच्या राजधानीला असुर असं म्हणतात. १८९८ मध्ये German लोकांनी हे शोधायला सुरवात केली आणि १९०० पासून याच उत्खनन सुरु झालं. असुर म्हणजे देवाचं शहर! सध्याच्या नकाशावर हा भाग सीरिया आणि इराकचा काही भाग मिळून येतो. याहून जास्त सांगण्यापेक्षा याबद्दल तुम्ही स्वतःच वाचा म्हणजे तुमच्या नीट लक्षात येईल (https://www.britannica.com/place/Assyria). हे असुर लोक  इथलेच असावेत असा माझा कयास आहे.


आता आपण पुन्हा श्रीमद भागवत आणि या कथेकडे वळूया.


भागवताच्या दहाव्या स्कंधातील ५९ व्या अध्यायात, ३३ वा श्लोक असा आहे.


तत्र राजन्यकन्यानां षट्‍सहस्राधिकायुतम् ।

भौमाहृतानां विक्रम्य राजभ्यो दद‍ृशे हरि: ॥ ३३ ॥


याचा अर्थ असा की "तिथे भौमासुराने हरण करून (बळजबरीने) आणलेल्या इतर राजांच्या 16000 कन्या हरीने (भगवान कृष्णांनी) पहिल्या.


पुढचा श्लोक असा आहे.


तं प्रविष्टं स्‍त्रियो वीक्ष्य नरवर्यं विमोहिता: ।

मनसा वव्रिरेऽभीष्टं पतिं दैवोपसादितम् ॥ ३४ ॥


अर्थ: नरश्रेष्ठ (नरवर्य) त्यांना (भगवान कृष्णांना) पाहून त्या स्त्रिया विशेष मोहीत झाल्या. मनामध्येच त्यांनी त्याला नशिबानेच आपल्याला असा पती मिळाला म्हणून मान्य केलं.


आता विचार करा या राजकन्या बंदिवान आहेत आणि त्यांना ज्याने बळजबरीने बंदी बनवलं आहे त्याचा वध झाला आहे. याचा अर्थ त्यांची मालकी सहजच ज्याने वध केला त्याच्याकडे जातो. पूर्वी अशीच पद्धत होती. (काही ठिकाणी अजूनही असेल कदाचित!) पती या शब्दाचा एक अर्थ master किंवा अधिपती असा आहे. सूर निरागस हो.. या गाण्यामध्ये इतक्या वर्षांनी सुद्धा पती हा शब्द त्या अर्थाने म्हणजे सुखपती किंवा छंदपती असा येतो. ते शब्द असे आहेत.  


ॐकार गणपती.. ॐकार गणपती..

अधिपती.. सुखपती.. छंदपती.. गंधपती..

लीन निरंतर हो.. लीन निरंतर हो……

सूर निरागस हो..


इथे काय पती म्हणजे नवरा असा अर्थ घ्यायचा? त्यामुळे पती म्हणजे ज्याचा अधिकार आहे तो असाच अर्थ होतो. 

 

आता पुढचा श्लोक पाहूया.


भूयात् पतिरयं मह्यं धाता तदनुमोदताम् ।

इति सर्वा: पृथक् कृष्णे भावेन हृदयं दधु: ॥ ३५ ॥


अर्थ: धारण करणाऱ्याच्या (म्हणजे कृष्णाच्या) परवानगीने हा जर माझा पती (master) झाला तर मी कृष्णाला मनापासून हृदयात ठेवेन.


इथे पहा की अजून कृष्णाचा संबंध सुध्दा आलेला नाही. हॆ श्लोक केवळ त्यांना काय वाटतंय ते सांगत आहेत. मुख्यत: आता आपले हाल थांबतील असा विश्वास त्या राजकन्यांना वाटू लागला आहे.


आता पुढचा श्लोक पाहा.


ता: प्राहिणोद्‍द्वारवतीं सुमृष्टविरजोऽम्बरा: ।

नरयानैर्महाकोशान् रथाश्वान् द्रविणं महत् ॥ ३६ ॥


अर्थ: त्यांना नीट स्वच्छ करून (अंघोळ घालून), स्वच्छ कपडे घालून, माणसं चालवतात अशा वाहनातून, रथ, घोडे, संपत्ती आणि पैसे यांच्यासकट द्वारकेला पाठवून देण्यात आलं.


विशेष पहा की या श्लोकात कृष्ण हा शब्द सुद्धा नाहीये कारण कृष्णांनी केवळ व्यवस्था केली या सगळ्यामध्ये ते कुठेही नव्हते. (Indirect Speech) त्यांना प्रवासाला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी पुरवल्या गेल्या. यात कुठेही बळजबरी नाही, केवळ व्यवस्था केली गेली.


उलट पूर्वी त्या राजकन्यांची अवस्था काय होती ते पहा. त्यांचे कपडे चांगले नव्हते आणि त्यांची साधी स्वच्छता सुद्धा राखली जात नव्हती. या राजकन्यांना कसं वागवलं जात होतं पहा. अशी व्यक्ती एकदम लग्नाचा विचार कसा करेल? आपण या असुराच्या कचाट्यातून म्हणजे भोमासुराच्या कैदेतून सुटलो एवढाच विचार करून त्या आनंदीत झाल्या असाव्यात.


यानंतर भगवान कृष्ण देवी अदितीकडे गेले आणि तिची कर्णफुले दिली. त्यामुळे भगवान आपली बाकीची कर्तव्यं करून मग आपल्या पत्नी म्हणजे सत्यभामेबरोबर परत द्वारकेला आले. म्हणजे या सगळ्या वेळी भौमसुराबरोबरच्या युद्धमध्ये आणि या राजकन्यांना सोडवताना त्यांच्या पत्नी सत्यभामा त्यांच्या बरोबर होत्या.


श्लोक ३६ ते ४१ मधे वरच्या परिच्छेदात दिलेले काही  details आहेत जे इथे relevat नाहीयेत म्हणून आता आपण ४२ वा  श्लोक पाहूया.


अथो मुहूर्त एकस्मिन् नानागारेषु ता: स्‍त्रिय: ।

यथोपयेमे भगवान् तावद् रूपधरोऽव्यय: ॥ ४२ ॥


अर्थ: मग एका क्षणी (मुहूर्त म्हणजे क्षण पण अनेकांनी याचा अर्थ लग्नाचा मुहूर्त असा केला आहे. इथे शुभ मुहूर्त वगैरे म्हटलेलं नाही.) वेगवेगळ्या घरांमध्ये त्या स्त्रिया राहत असताना त्यांच्या त्यांच्या आवश्यकतेनुसार त्यांना भगवानांनी support किंवा मदत केली.


उपयाम या शब्दाचा अर्थ लग्न असा आहे आणि उपयम म्हणजे stay किंवा support. उपयेमे हॆ उपयम या धातूचा लिट् लकार म्हणजे (Indirect Past Tense) आहे. हॆ प्रथम पुरुष एक वचन आहे. त्यामुळे इथे लग्न हे भाषांतर योग्य नाही असं वाटतं. याचं भाषांतर पूर्वी राहायला जागा दिली किंवा मदत केली असं करावं लागेल.


याच्या पुढचा श्लोक आणखीन interesting आहे.


गृहेषु तासामनपाय्यतर्ककृ-

न्निरस्तसाम्यातिशयेष्ववस्थित: ।

रेमे रमाभिर्निजकामसम्प्लुतो

यथेतरो गार्हकमेधिकांश्चरन् ॥ ४३ ॥


अर्थ: भगवान कृष्ण त्यांचं घर कधीही न सोडता अतर्क्य पद्धतीने सगळ्यांच्यात साम्य प्रस्थापित करून गृहस्थ म्हणून इतर पुरुषांप्रमाणे आपले अधिकार गाजवत आपली कर्तव्ये पूर्ण करण्यात रममाण झाले.


म्हणजे ते त्या राजकन्यांच्या घरी कधीही गेले नाहीत. कसं केलं ते अतर्क्य आहे असं इथे स्पष्ट म्हटलेलं आहे. थोडक्यात त्यांनी त्यांचं काम केलं आणि या राजकन्यांना त्या असुरापासून वाचवलं त्यांचा सांभाळ केला पण त्यांच्या घरी गेले नाहीत.

 

आता त्या राजकन्या काय करतायत ते पाहूया.


इत्थं रमापतिमवाप्य पतिं स्‍त्रियस्ता

ब्रह्मादयोऽपि न विदु: पदवीं यदीयाम् ।

भेजुर्मुदाविरतमेधितयानुराग-

हासावलोकनवसङ्गमजल्पलज्जा: ॥ ४४ ॥


अर्थ: तो रमा पती ज्याला कसं मिळावायचं हॆ खुद्द ब्रहदेव आणि इतर देवांना सुध्दा माहिती नाही असा त्यांना त्यांचा पती (master)  म्हणून मिळाल्याने  त्या कृष्णाबरोबर आनंद, स्मित, संवाद, बुजरेपणा, खेळकरपणा, या सर्व गोष्टी अनुभवत होत्या.


इथे कृष्णाला रमा पती असं म्हटलं आहे. त्यांचा पती असं म्हटलेलं नाहीये. जर कृष्णाचं आणि याचं लग्न लागलं असतं तर त्यांना कोणी ब्रहमदेव आणि इतर देवांशी compare केलं असतं का? याचा एक अर्थ असा होतो कि त्यांचा संवाद हा Social life मधे होता. खरं म्हणजे भगवान कृष्णांबद्दल मला हे लिहायला अतिशय जड जातंय पण याचा खुलासा करणं आवश्यक आहे म्हणून लिहितोय.


मग त्या काय काय करत होत्या ते पुढच्या श्लोकात आहे.


प्रत्युद्गमासनवरार्हणपादशौच-

ताम्बूलविश्रमणवीजनगन्धमाल्यै: ।

केशप्रसारशयनस्‍नपनोपहार्यै-

र्दासीशता अपि विभोर्विदधु: स्म दास्यम् ॥ ४५ ॥


अर्थ: श्री कृष्णाकडे अनेक दासी असून सुध्दा या राजकन्यानीं त्याचं आसन तयार करून, त्याची योग्य पूजा करून, त्याचे पाय धुवून, त्याला पान तयार करून, त्याची विश्रांतीची  व्यवस्था करून, त्याला वारा घालून, गंध लावून, फुलं घालून, वस्त्र तयार करून, त्याची झोपण्याची व्यवस्था करून, त्याची अंघोळीची व्यवस्था करून त्याचं दास्य केलं.


ही पुजेची आणि सेवा करण्याची पद्धत सांगितली आहे. इथे केवळ दास्य भक्ती आहे. दास्य ही भक्तीची एक पायरी आहे आणि सेवाभाव ही त्या राजकन्यांची वृत्ती आहे.  लग्न वगैरेचा कुठेही विषय नाही.


इथे हा अध्याय संपतो.



भाषांतर करताना मुहूर्त आणि उपयेमे या दोन शब्दांमुळे थोडा घोळ झाला असं दिसतंय. पण जर context लक्षात घेतलं तर कळेल की त्या दास्य भक्तीत वावरल्या आणि त्यांनी कृष्णाकडे भक्ताच्या भूमिकेतून पहिलं. दास्य भक्ती म्हणजे काय या विषयात मी आत्ता जात नाही. पण भगवान कृष्णांच्या 16100 बायका होत्या याला काहीही आधार नाही. भौमासुराने बंदी बनवलेल्या राजकन्याचं भगवान कृष्णांनी rehabilitation केलं असं आपल्याला आजच्या  भाषेत म्हणता येईल.


या कथा आपल्याला नीट माहिती असणं आवश्यक आहे. कारण यांची भाषांतर नीट झालेली नाहीत आणि त्यातून अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. पण आपण context ला धरून नीट अर्थ समजून घेतला तर गोंधळ होणार नाही म्हणून म्हटलं एकदा हा विषय सगळ्यांसमोर मांडावा. हा विषय जर पुन्हा कुठे निघाला तर हे references द्या आणि explain करा आपल्या देवतांबद्दल नसतं काहीतरी ऐकून घेऊ नका. गप्प तर अजिबात बसू नका.


© गौरीश बोरकर 

#gaurishborkar #thinkingaloud


Comments

Popular posts from this blog

पुनर्जन्माच्या सत्यकथा: सनातन धर्म आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीतून पूर्वजन्म आठवणाऱ्या व्यक्तींचा अभ्यास

यथा पिंडे तथा ब्रहमांडे चा पुरावा