एका शेतकरी उद्योजकाची गोष्ट

चला आता थोडा वेळ मिळतोय तर थोडं बोलूया. मागे सांगितल्याप्रमाणे आता माझे दैवी अनुभव पुन्हा सुरु करायचीच आहे पण आज थोडी वेगळी गोष्ट. गेल्यावर्षी मी एका व्यक्तीला अगदी जुजबी भेटलो होतो कारण त्यांनी माझं पुस्तक अगदी जाता जाता विकत घेतलं होतं. परवा पुन्हा भेट झाली पण आम्ही एकमेकांना ओळखलंच नाही. मी माझं नाव सांगितल्यावर ते म्हणाले, तुमचं पुस्तक मी वाचलं, मला फार उपयोगी पडलं. मागच्यावर्षी 350 रुपयाचं पुस्तक घ्यावं की न घ्यावं असा विचार करणारा हा माणूस मला आठवला. त्याने मला थोडा discount द्या अशी विनंती केली होती आणि मी ती नाकारली होती कारण मी आधीच सवालतीच्या किंमतीत पुस्तकं विकत होतो.

तो सगळा प्रसंग आता माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. तुमची आणखी पुस्तकं मराठीत असतील तर मला हवी आहेत असं त्याने मला सांगितलं. पण माझं तेवढं एकच पुस्तक मराठीत असल्याने आमच्या बोलण्याचा ओघ थोडा बदलला. मी त्यांना विचारलं कि तुम्ही काय करता? ते म्हणाले मी आज खाण्याचे पदार्थ विकायला आलोय. माझा गोडा मसाला 400 रुपये किलो आहे. बाजारात 600 रुपये किलो मिळतो. या किंमतीला कोणीही देणार नाही हवा असेल तर जा घेऊन थोडा. लगेच माझ्या शंका आली की हा माणूस एवढं स्वस्त का विकतोय. माझा चेहरा वाचून तो म्हणाला, खराब माल नाही वापरत आपण, मी हाडाचा शेतकरी आहे, मसाल्याला लागणाऱ्या सगळ्या वस्तू माझ्या शेतात तयार होतात म्हणून स्वस्त विकतोय. मी पटकन त्यांचं कौतुक केलं पण मला थोडं awkward झालं आणि माझं कुतूहल जागृत झालं. मी पुढे विचारू लागलो की मग तुम्ही मसाल्यांचं distribution कसं करता? प्रश्न विचारताना मला असं वाटलं होतं की त्यांचा कोणीतरी distributor असेलच पण ते म्हणाले सगळं distribution मी स्वतः करतो, म्हणून तर एवढ्या स्वस्त देणं परवडतं.

माझं कुतूहल थोडं आणखी जागृत झालं. ते म्हणाले मी विकतो ते सगळे पदार्थ स्वतः तयार केलेले आहेत! त्या पदार्थांना लागणाऱ्या सगळ्या गोष्टी माझ्याच शेतात पिकावतो!! औरंगाबादजवळ म्हणजे मराठवाड्यात शेती आहे माझी!!! या त्यांच्या वाक्यात बरंच काही होतं. पदार्थ तयार करायला लागणारी सगळी यंत्र मी हळू हळू विकत घेतली आहेत असं म्हणत त्यांनी मला Soya sticks चाखवले आणि म्हणाले, तळलेले नाहीत हॆ, baked आहेत. गुजरातला गेलो होतो तिथून हॆ machine घेऊन आलो. 5 लाखाचं आहे पण 6 महिन्यात पैसे फिटले. या soya sticks baked आहेत ना तेल लागत नाही त्यामुळे healthy आहेत आणि उत्पादन खर्च कमी आहे. याला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्या शेतात तयार होतात. ज्या गोष्टी आपण तयार करतो त्यानुसारच मी पीक घेतो. हळू हळू मी त्यांच्या stall वरचे बरेच पदार्थ न्याहाळले. एक दोन पदार्थ त्यांनी दाखवले आणि म्हणाला हॆ चालत नाहीत एवढे पण धंदा म्हटलं की असं होतच असतं.

मागे मी एका मोठ्या American कपडे व्यावसायिकाची गोष्ट वाचलेली. त्याने त्याच्या team ला सांगितलं की profit वाढवा. Team ने ठरवलं की cost cutting केलं की profit वाढेल म्हणून त्यांनी बरंच cost cutting केलं आणि 20% profitability वाढवली. त्यांची छाती फुगली आणि ते boss कडे गेले पण boss म्हणाला की एवढाच profit वाढवलात? जा आणखी वाढवा. आता team पुन्हा विचार करू लागली की आता काय करावं, पण त्यांना काही मार्ग सापडेना तेव्हा तो व्यावसायिक म्हणाला कि Production Raw Material च्या Source जवळ घेऊन जा म्हणजे Profitability वाढेल. कारण Raw material अमेरिकेत आणायचं तिथे कपडे शिवायचे आणि मग पुन्हा जगभर Distribute करायचे यात प्रचंड वेळ आणि पैसे खर्च होत होते. म्हणून मग त्या Company ने त्यांचा अख्खा Setup Vietnam ला हालवला आणि ६०% profitability अगदी सहज वाढली.

या माणसाने अगदी हेच टिपलं होतं. आपल्याकडची माणसं काय कमी नाहीत. ते पुढे म्हणाले की मी distribution मी स्वतःच करतो कारण त्या शिवाय customer ला योग्य rate ला देता येत नाही आणि आम्हालाही 4 पैसे सुटतात.
त्यांनी मला हळू हळू त्यांनी त्यांचं सगळं model सांगितलं आणि मला ते भारी वाटलं. मला एक गोष्ट लक्षात आली की मराठवाडा काय किंवा कोकण काय, शेतकऱ्यांनी जर ठरवलं तर त्यांना त्यांच्या शेतात पिकवलेला माल योग्य पद्धतीने product म्हणून विकायला सुरवात केली तर शेतकरी सहज सधन होऊ शकेल. मी त्यांना विचारलं की तुमच्या या model मधे तुम्हाला त्रास काय होतो? तर ते म्हणाले एक म्हणजे घरी अजिबात वेळ मिळत नाही कारण मी नेहमी प्रदर्शनात माल विकत असतो पण माझा आता पुण्यात एक Flat आहे. आता मी मुलांना माझ्याबरोबर प्रदर्शनात घेऊन जातो. त्यांना जरा कळू देत की आपला बाप काय काय करतो.

हा आणखी एक महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडला. मी ज्यावेळी अनेकदा शेतकऱ्यांशी बोलतो तेव्हा ते सांगतात कि शेत सोडून जाता येत नाही. हा माणूस अगदी विरुद्ध सांगत होता. मी शेताची सगळी सोय अशी लावली आहे कि मी केवळ विक्रीवर लक्ष केंद्रित करू शकतो. शेतकऱ्यांच्याच काय पण प्रत्येक Manufacturer च्या दृष्टीने ही अत्यंत महत्वाची बाब आहे. जर सगळं लक्ष Production वर ठेवलं तर सगळी मलई कोणीतरी Distributor घेणार आणि असं नको असेल तर Production line set करून Sales आणि Marketing वर लक्ष केंद्रीत करणं अत्यावश्यक आहे.

मी प्रत्येक शेतकऱ्याला भेटल्यावर हेच सांगतो कि बाबा Raw Material विकू नका, Product तयार करून Direct Customer ला विका. जास्त किंमत मिळते आणि जास्त फायदा होतो आणि यानेच धान्याला पण चांगला दर मिळेल. पण शेतकऱ्यांना Sales आणि Marketing मध्ये बऱ्याच अडचणी आहेत, Resources ची मर्यादा आहे आणि त्यामुळे ते धाडस करायला तयार होत नाहीत. एखादाच असतो असा Daring करणारा.

पहा तुम्हाला यातुन काही Ideas येतायत का. यावर तुमचा अनुभव काय सांगतो?

#gaurishborkar #thinkingaloud

Comments

Popular posts from this blog

पुनर्जन्माच्या सत्यकथा: सनातन धर्म आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीतून पूर्वजन्म आठवणाऱ्या व्यक्तींचा अभ्यास

यथा पिंडे तथा ब्रहमांडे चा पुरावा