Posts

Showing posts from 2023

ज्ञानी पुरुषाच्या जीवाची गती

ज्योतिषावर विश्वास नसणाऱ्या आध्यात्मिक व्यक्तींकारिता गीतेमधील 3 श्लोक. नक्की वाचा. अग्निर्ज्योतिरहः शुक्लः षण्मासा उत्तरायणम्। तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः।।8.24।। The northern course [of the sun] consisting of six months, is fire, light, day and bright one. Departing in it, the Brahman-knowing men attain the Brahman . धूमो रात्रिस्तथा कृष्णः षण्मासा दक्षिणायनम्। तत्र चान्द्रमसं ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते।।8.25।। The southern course [of the sun], consisting of six months, is smoke, night, and also dark. [Departing] in it, the Yogin attains the moon's light and he returns. शुक्लकृष्णे गती ह्येते जगतः शाश्वते मते। एकया यात्यनावृत्तिमन्ययाऽऽवर्तते पुनः।।8.26।। For, these two bright and dark courses are considered to be perpetual for the world. One attains the non-return by the first of these, and one returns back by the other one. याचा भावार्थ असा आहे की दक्षिणायनामध्ये, कृष्ण पक्षात, किंवा रात्री देह ठेवणाऱ्या ज्ञानी पुरुषाला सुध्दा पुनर्जन्म घ्यावा लागतो. गीतेने ...

दैवम् चैवात्र पंचमं?

Image
ज्योतिषाच्या बाबतीत दैवम चैवात्र पंचमम् म्हणजे दैव हे भगवंतांनी शेवटचं सांगितलेलं आहे आणि सगळ्या गोष्टी या कर्मावर अवलंबून असून दैवाला अतिशय नगण्य महत्त्व आहे हे सांगण्याकरता भगवद्गीतेचा अभ्यास करणाऱ्या काही अध्यात्मिक व्यक्ती ही ओळ वापरतात. केवळ दैवावर अवलंबून राहून स्वतःचे नुकसान करून घेणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. पण त्याचबरोबर प्रामाणिक प्रयत्न करून अपयश आल्याने दैव समजून घेण्याचा  प्रयत्न करणारे सुद्धा बरेच आहेत. या सगळ्या विषयावर आपण चर्चा करण्याऐवजी गीता या विषयावर खरंच हे लोक म्हणतात तसं म्हणजे दैव पाचवं  आहे असं म्हणते का हे पाहूया. अगदी दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी अर्जुनाला सांगितले की नत्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनािधपाः।  न चैव न भविष्यामः सव वयमतः परम् ॥१२॥ भगवद्गीता अध्याय २ अर्थ: मी कोणत्याही काळे नव्हतो,  तू नव्हतास,  किंवा हे राजे लोक नव्हते असे नाही. आणि यापुढेही आपण सर्वजण असणार नाही असेही नाही. याचा अर्थ असा होतो की भगवद्गीतेला पुनर्जन्माची कल्पना मान्य असावी.  पुढे दुसऱ्याच अध्यायात  भगवान म्हणतात की हतो वा प्राप्स्यसि स्...

चिंगीचा बाप्पा

Image
 गणपतीच्या आदल्या दिवशी office मधून घरी येता येता पाहिलं तर आमच्या Watch women ची मुलगी मातीचा गणपती तयार करत होती. मला खाली यायला थोडा उशीर झाल्याने कल्याणीचं आणि तिचं आधीच थोडं conversation झालं होतं याची मला काहीच कल्पना नव्हती. एका gas cylinder वर एक फळी ठेऊन ती मातीचा गणपती तयार करत होती. अरे वा गणपती का? माती गाळून घेतली का? असा प्रश्न मी विचारल्यावर तिने माझ्याकडे जो कटाक्ष टाकला त्यात अनेक shades होत्या. हा स्वतः ला समजतो कोण? मी काय वेडी आहे का? मी काय पहिल्यांदाच मातीच्या वस्तू करतेय का? वगैरे वगैरे… असे बरेच अर्थ मला त्या कटाक्षात जाणवले आणि मी जरा सावध झालो. अगदी तेवढ्यातच कल्याणी म्हणाली की तिने गणपती करुन शाळेत नेला होता. आता फक्त ती सोंड आणि हात पुन्हा लावतेय. हो तर, मला माहिती आहे. अशा आवेशात चिंगीने मान हलवली आणि ती पुन्हा गणपतीचे हात जोडू लागली. एवढं सगळं झाल्यावर वर मी माझा experts advice देणं टाळलं. काळी माती कोराडी झाल्यावर त्याला तडे जातात. नंतर चिकटवलेले भाग सुटतात. म्हणून तर शाडू माती वापरतात. असलं काहीही न सांगता, मी 'छान! चालूदेत' असं म्हटलं आणि बाहेर ...

माझे दैवी अनुभव भाग १८

Image
अनेकदा आपल्या आयुष्यात नवे नवे अनुभव येतात आणि त्यातुनच आपण समृद्ध होतो. मला तर नेहमी असं वाटतं की नवीन कोडी सोडवण हा उत्क्रांत आणि उन्नत होण्याचा मार्ग आहे. कोणताही विषय आपल्याला पुरेसा माहिती झाला असं वाटलं की universal energy आपल्याला पुढचं Puzzle देते आणि त्यावेळी लक्षात येतं की चला ही level आपण Cross केली. तीच कोडी पुन्हा पुन्हा सोडवण्यात काही मजा नाही हो. नाही का? माझ्या बाबतीत हल्लीच एकदा असंच झालं. मी एका कामाकरिता एका Semi-Government Office मध्ये गेलेलो. माझ्या ओळखीची व्यक्ती मध्यस्थ होतीच. काम होणार याची बऱ्यापैकी खात्री होती. खरं म्हणजे मी जायची आवश्यकताच नव्हती पण ते मध्यस्थ म्हणाले की साहेबांना तुम्हाला भेटायचं आहे. मी त्यांना विचारलं की काय झालं? तर ते म्हणाले की सहसा न भेटता काम होतं पण तुम्हाला का बोलावलंय माहीत नाही. मी त्यांना विचारलं की तुम्ही त्यांना माझ्याबद्दल काही सांगितलंत का तर म्हणाले, हो सगळं सांगितलंय. असं म्हटल्यावर विषय माझ्या लक्षात आला. वेळ ठरवून आम्ही दोघे भेटायला गेलो. ते मध्यस्थांना म्हणाले तुम्ही जरा बाहेर बसा. पुढे साधारण काय असणार ते माझ्या लक्षात ...

माझे दैवी अनुभव भाग १७

त्या दिवशी ताईवर झालेला रेकीचा Impact पाहून मी रेकी ची पुढची Level Complete करायचं ठरवलं. माझ्या मित्राच्या ओळखीचे एक सर होते आणि मी त्यांच्याबद्दल बरंच चांगलं ऐकलं होतं. त्यामुळे त्यांच्याकडेच पुढची Level करायची असं माझं आधीच ठरलं होतं. तरी ऑफिस आणि बाकी कामं यात ६ महिने गेले. शेवटी एक दिवस मी त्यांना Phone केला. ते म्हणाले मी महिन्याला एकच Course घेतो तुम्ही पुढच्या महिन्यात या. पुढचा महिना म्हणजे जून. तारीख वगैरे सगळी ठरली. गम्मत म्हणजे आम्ही जिकडे सोहळ्याला गेलो होतो तिथून अगदी जवळच हा Course होता.  तो एक रविवार होता. सकाळी प्रचंड पाऊस सुरु होता पण तरीही  माझं  जायचं पक्कं होतं. Car घेऊन मी साधारण पाच-साडेपाच वाजता पुण्याहून निघालो. जवळपास पावणे नऊ वाजता मी त्या शहरात पोहोचलो. त्या सरांना Phone केला. सर, मी इथे इथे आहे तर तिथे कसं यायचं? मी विचारलं. ते म्हणाले अरे तू अगदी तिथेच आहेस. सर म्हणाले. माझ्याकडे त्या जागेचं Google Location होतं. Google ने मला सांगितलं की  Your destination has arrived. Google दृष्टीने आलेलं हे destination मला काही दिसेना. Traffic आणि पाऊ...

माझे दैवी अनुभव भाग १६

आजचा अनुभव थोडा दमानं घ्या. जिथे वाटेल तिथे थांबा. चला तर मग. आम्ही एका metro city मध्ये एका सोहळ्याला गेलो होतो. जायला यायला सोपं पडावं म्हणून Car घेऊन गेलो होतो. संध्याकाळचा सोहळा होता तो आटोपला आणि मस्त जेवण झाल्यावर पान वगैरे खाऊन आमची रात्री राहायची व्यवस्था केली तिथे गेलो. आमचे Host त्याच Building मध्ये वरच्या मजल्यावर राहत होते आणि खालच्याच मजल्यावर त्यांची आणखी काही जागा होती. त्यामध्ये एक मोठा लांब लचक हॉल आणि mostly २ extra bedrooms होत्या. आमची व्यवस्था त्यातल्याच एका Bedroom मध्ये होती. Hall मध्ये सगळेजण छान गप्पा मारत होते म्हणून मुलांना आतल्या खोलीत झोपवलं. आम्हीही थोड्यावेळाने झोपायला गेलो. त्यावेळी साधारण बारा, सव्वा बारा वाजले असतील. साधारण दीड पावणेदोनची वेळ असेल तिथे झोपलेल्या एका ताईला जोरात खोकला येऊ लागला. तिच्या आईने तिला पाणी आणून दिलं आणि मांडीवर घेतलं. फार फार तर ४-५ वर्षाची असेल ती मुलगी. तिचा खोकला काही केल्या थांबेना. तिच्या खोकल्याने आम्हाला पण जाग आली. कल्याणी मला म्हणाली कि ताईला जरा रेकी दे म्हणजे थोडी शांत झोप लागेल. मी तिला मांडीवर घेतलं आणि रेकी दिली...

माझे दैवी अनुभव भाग १५

ज्योतिष म्हटलं कि Intuition हा एक चर्चिला जाणारा नेहमी विषय. आज थोडंसं याकडे पाहूया. आम्ही स्वामींकडे जाऊ लागल्यानंतर त्यांनी काही दिवसांनी स्वामींनी युवकांकरीता म्हणजे युवा केंद्र सुरु केलं. युवा केंद्रात विविध विषयांवर गट चर्चा (Group Discussions) व्हायची यात त्यांनी Intuition किंवा असाच काहीसा एक विषय घेतला होता. त्यावेळी मी एका IT Company मध्ये Developer म्हणून काम करायचो आणि तिथे रोज Average पेक्षा बरेच जास्त Product Bugs fix करायचो. त्यामुळे Intuition म्हणजे काय असा विचार करताना Intuition म्हणजे Matured Experience अशा अंगाने मी तो विषय मांडला. स्वामींना मात्र ते अजिबात रुचलं नाही. त्यांची नाराजी  त्यांच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसली. नंतर त्यांनी तो विषय Intuition म्हणजे वृत्तीरहीत शुद्ध स्थितीमध्ये असलेल्या अंतःकरणावर उठणारा तरंग अशा प्रकारे Conclude केला असं मला साधारण आठवतंय. मला आता पक्कं आठवत नाही कारण या गोष्टीला आता १५ पेक्षा जास्त वर्षं झाली. पण यामुळे या विषयाबद्दलचं माझं कुतूहल वाढलं. याबद्दल विचार करताना माझ्या मनात अनेक प्रश्न येऊ लागले. उदा. दुसऱ्याच्या मन...

माझे दैवी अनुभव भाग १४

आंज कावळ्याचे आणखी काही Interesting प्रसंग सांगतो. दुपारी जेवणानंतरची वेळ होती. मला वाटतं पावसाळ्याचे दिवस असावेत. आम्ही आमच्या एका नातेवाईकांकडे गेलो होतो तिथे आम्ही त्यांच्या दूरच्या एका नातेवाइकांबद्दल सहजच बोलत होतो. त्यांचा अपघाती मृत्यु झाला होता. आमच्याबरोबर घरातील एक ज्येष्ठ व्यक्ती (आपण त्यांना काका म्हणूया) सुद्धा होती, त्यांची नित्य उपासना दांडगी होती. त्यावेळी खिडकीत एक कावळा येऊन बसला, त्याने खिडकीतून आत मान घातली आणि अतिशय कर्कश्य ओरडला. माझ्या अंगावर एकदम शहारे आले म्हणून मी पाहिलं तर एक energy काकांच्या अंगात गेली असं मला experience झालं. या आधी मी अशी energy एका body मधून दुसऱ्या बॉडी मध्ये जाताना कधीच पहिली नव्हती. गावी लहान असताना कावळा शिवणे याबद्दल मला नेहमीच कुतूहल वाटायचं. आईला कावळा शिवतो मग आम्हाला का शिवत नाही असं नेहमी वाटायचं कारण ते ४ दिवस आईच्या कुशीत झोपता येत नसे आणि जर का झोपलंच तर सकाळी सकाळीच अंघोळ करावी लागे. पुण्यात आल्यावर आईला कावळा का शिवत नाही या प्रश्नाचं उत्तर पुण्यात कावळे कमी आहेत असं आईने मला दिलेलं. एकदा तर माझ्या एका छोट्या बहिणीला खरंच क...

माझे दैवी अनुभव भाग १३

आज पासून पुन्हा दैवी अनुभव लिहायला सुरवात करतोय पण Tone थोडा वेगळा असणार आहे. पाहूया तुम्हाला कसं  वाटतंय. कावळा आणि मी हे नातं तसं आजोबा गेल्यापासूनच आहे. त्याचं काय झालं कि आजोबा गेल्यानंतर काही दिवसांनी सलग ३ दिवस कावळ्याने माझ्या डोक्यावर टोच मारली. पण मी ते कधी कोणाला फार सांगितलं नाही कारण ना मला काही त्रास झाला कि दुखापत झाली. माझ्या डोक्यात मात्र हा विषय सतत घोळत होता. हळू हळू जसा मी ज्योतिषाचा अभ्यास करू लागलो मला लक्षात आलं कि अनेक धार्मिक कार्यक्रमात पांढऱ्या रंगाला महत्व आहे. उदा. तांदूळ आणि अनेक पैतृक कार्यक्रमात मात्र काळ्या रंगाला महत्व आहे. उदा. काळे तीळ, उडीद वगैरे. त्याच बरोबर लहान बाळाला काळी तीट लावतात किंवा हल्ली एका पायात काळा दोरा बांधतात. तसंच कावळ्याला दुपारच्या जेवणाआधी भात घालायची पद्धत आपल्याकडे होती. कावळा ओरडतो म्हणजे कोणीतरी येणार असा message देतो असं म्हणतात. त्यानंतर मग काळी मांजर वगैरे याबद्दल ऐकलं आणि कावळ्याबद्दलचं माझं कुतूहल आणखीनच वाढलं. मग डोमकावळा ओरडला तर तो वाईट असं पण ऐकलं आणि मी कावळ्याचं ओरडणं observe करायला लागलो. त्यात माझ्या लक्ष...

Life Summary Report किंवा आयुष्याची रूपरेषा

Image
मित्रानो, आपल्या भविष्याबद्दल जाणून घ्यायला कोणाला आवडणार नाही? आणि जर यामुळे आपल्याला आयुष्यात आणखी प्रगती साधता आली तर सोन्याहून पिवळं नाही का? अशाच एक Tool बद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. मी गौरीश बोरकर, Professional Astrologer आहे. माझी ज्योतिषावर एकूण ७ पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. आज मी तुमच्याशी Life Summary Report बद्दल बोलणार आहे. अनेकदा आपल्याला हा प्रश्न पडतात कि आपण नोकरी करावी की व्यवसाय? आपला आयुष्यातला जोडीदार कश्या Type चा  असावा? आपण आयुष्यात किती प्रगती करू? कशा प्रकारचे Jobs आपल्याला suit होतील? आयुष्यात फार अडचणी तर येणार नाहीत ना? आपले नातेवाईकांशी संबंध कसे राहतील? आपल्याला एखादी अधिकाराची जागा मिळेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी आपल्याला या Life Summary Report मध्ये मिळतील. ती सुद्धा अगदी शास्त्रीय पद्धतीने आणि objectively. हा report म्हणजे भारतीय संस्कृती आणि Modern Science यांचं combination आहे. पती आणि पत्नी दोघांनीही जर हा report वाचला तर understanding खूप वाढतं, Relations improve होतात. लहान मुलाचा report त्यांना guide करायला उपयोगी पडतो. तुम्ही कर...