माझे दैवी अनुभव भाग १४
आंज कावळ्याचे आणखी काही Interesting प्रसंग सांगतो. दुपारी जेवणानंतरची वेळ होती. मला वाटतं पावसाळ्याचे दिवस असावेत. आम्ही आमच्या एका नातेवाईकांकडे गेलो होतो तिथे आम्ही त्यांच्या दूरच्या एका नातेवाइकांबद्दल सहजच बोलत होतो. त्यांचा अपघाती मृत्यु झाला होता. आमच्याबरोबर घरातील एक ज्येष्ठ व्यक्ती (आपण त्यांना काका म्हणूया) सुद्धा होती, त्यांची नित्य उपासना दांडगी होती. त्यावेळी खिडकीत एक कावळा येऊन बसला, त्याने खिडकीतून आत मान घातली आणि अतिशय कर्कश्य ओरडला. माझ्या अंगावर एकदम शहारे आले म्हणून मी पाहिलं तर एक energy काकांच्या अंगात गेली असं मला experience झालं. या आधी मी अशी energy एका body मधून दुसऱ्या बॉडी मध्ये जाताना कधीच पहिली नव्हती.
गावी लहान असताना कावळा शिवणे याबद्दल मला नेहमीच कुतूहल वाटायचं. आईला कावळा शिवतो मग आम्हाला का शिवत नाही असं नेहमी वाटायचं कारण ते ४ दिवस आईच्या कुशीत झोपता येत नसे आणि जर का झोपलंच तर सकाळी सकाळीच अंघोळ करावी लागे. पुण्यात आल्यावर आईला कावळा का शिवत नाही या प्रश्नाचं उत्तर पुण्यात कावळे कमी आहेत असं आईने मला दिलेलं. एकदा तर माझ्या एका छोट्या बहिणीला खरंच कावळा शिवला आणि ती स्वत:हुन एका कोपऱ्यात जाऊन बसली. तिने जोरात Declare केलं कि तिला कावळा शिवला आहे त्यामुळे तिला कोणी शिवू नये. आमची आजी हुशार होती ती धावत आली आणि पुरुषांना, लहान मुलींना आणि म्हाताऱ्या बायकांना कावळा शिवल्याचा दोष नसतो असं शास्त्रात लिहिलं आहे असं समजावलं आणि सगळा विषय तिथेच निवळला. माझ्या सुद्धा अनेक प्रश्नांची उत्तरं त्या दिवशी मिळाली आणि मला हायसं वाटलं.
असा हा कावळा अशा पद्धतीने energy transfer झाल्यामुळे कोणाला शिवेल असं मला कधीही वाटलं नव्हतं पण हे मी त्या दिवशी अनुभवलं. सुरवातीला मला थोडी भीती वाटली पण आता याने काय होणार याबद्दल मला कुतूहल जास्त वाटलं. काकांना तासाभरातच Urine Infection चा त्रास सुरु झाला. त्यांचं वय साधारण ६५ ते ७० च्या मध्ये असावं, पण यापूर्वी त्यांना कधीही Urine Infection झालं नव्हतं जे आयुष्य पहिल्यांदाच झालं. त्यांना दर १५ मिनिटांनी Urine होत होतं आणि अतिशय जळजळ होत होती. आम्ही लगेचच डॉक्टरांना बोलावलं, त्यांनी औषधं दिली पण त्याने फार काही आराम पडला नाही. संध्याकाळी आमचं पुण्याला यायचं Bus चं तिकीट होतं. परिस्थितीशी नेहमी २ हात करणारे काका म्हणाले मला काय आज Bus ने येणं जमेल असं वाटत नाही. मला फार थांबता येणार नव्हतं म्हणून मग आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी Cab करून पुण्याला यायचं ठरवलं. उद्देश हा कि लागेल तिथे थांबता येईल. रात्री मी त्यांना Reiki दिली आणि औषधाचा परिणाम व्हायला लागला. त्यांचा त्रास हळू हळू कमी होऊ लागला. सकाळी ते म्हणाले कि मला आता साधारण २ तासांनी जावं लागतंय तर आपण निघू शकतो. मग आम्ही Cab ने मधे एक ५-६ वेळा थांबून पुण्यात पोहोचलो आणि पुढे त्यांचा त्रास आठवड्याभरात कमी झाला. तो त्यांना गेल्या १० वर्षात पुन्हा कधीही आला नाही. एवढी उपासना असणाऱ्या माणसाची ही परिस्थिती झाली तर बाकी माणसांना याहून जास्त त्रास होईल कि काय अशी शंका मला आली पण मी त्याचं अजून Confirmation घेऊ शकलो नाहीये. थोडक्यात कावळोबा म्हणजे कोणीतरी भारी आहे असं मला वाटायला लागलं. विशेष म्हणजे हे सगळं selective आहे असं मला वाटायला लागलं कारण ती energy तिथे असलेल्या ५-६ माणसांपैकी एकाच माणसात गेली आणि फक्त मलाच जाणवली. त्यामुळे हे सगळ्यांना अनुभवता किंवा दाखवता येणार नाही असं मला पक्कं वाटायला लागलं.
अगदी हल्लीच जवळच्या एका नातेवाईकांच्या वर्षापूर्तीला एक कार्यक्रम ठेवला होता. तो कार्यक्रम आम्ही Live आमच्याच घरून ऐकला. विशेष म्हणजे त्यावेळी आमच्या खिडकीत येऊन एक कावळोबा बसले. पूर्ण ४५ मिनिटं त्यांनी काव कीं कुव केलं नाही. शांतपणे सगळा कार्यक्रम ऐकला आणि जाताना अगदी हळू आवाजात काव असं एकदाच म्हणून निघून गेले.
मागच्या भागात सांगितल्याप्रमाणे गेल्या काही महिन्यात आमच्याकडे कावळोबांचं येणं जाणं अगदी रोजचं झालं होतं. त्यामुळे त्यांचं काही तरी केलं पाहिजे ही इच्छा दिवसेंदिवस बळावली. शेवटी मी हरिहरेश्वरला जाऊन विधिवत त्रिपिंडी करायचं ठरवलं. कारण मला तशी ग्रह दशा सुरु होणार होती. आजार व्हायच्या Just आधी किंवा झाल्या झाल्या उपाय केला तर तो विशेष फलदायी होतो असं माझं मत आहे त्यामुळे Timing ला माझ्या मते फार महत्त्व आहे. वडील असताना खरं म्हणजे त्रिपिंडी करत नाहीत पण ज्याला आजार आहे त्याने औषध घेतलं पाहिजे असं माझं मत असल्याने तो विधी मीच केला पाहिजे यावर मी ठाम होतो. गुरुजींना Phone करून हे सगळं सांगितलं आणि त्यांना ते पटलं. ते म्हणाले तू ये आपण योग्य ते करू. या आधी मी अनेकांना त्रिपिंडी करायला सांगून त्याचा उपयोग झालेला आहे पण मी त्रिपिंडी काही फायदा व्हावा म्हणून करणार नव्हतो तर घरातील काही गेलेल्या व्यक्तींना पुढची गती मिळावी या उद्देशाने तो करणार होतो.
हरिहरेश्वरला गेल्यावर गुरुजींकडे जाऊन चांगली तास भर चर्चा केली. ते म्हणाले तुला जर कोणाकरिता श्राद्ध करायचं ते माहीत असेल तर आपण विष्णू श्राद्ध सुद्धा करू शकतोस. पण सगळ्या पर्यायांचा विचार करून आम्ही दुसऱ्या दिवशी त्रिपिंडी श्राद्धच करायचं ठरवलं. गुरुजींना मी विचारलं सगळ्यांच्या पिंडाला कावळा शिवतो का? ते म्हणाले साधारण ९०% लोकांच्या पिंडाला कावळा शिवतो. १०% लोकांच्या पिंडाला कावळा शिवत नाही. मग मी म्हटलं की कोणाला शिवतो आणि कोणाला शिवत नाही याबद्दल तुमचा काय अनुभव आहे. ते म्हणाले की Heart Attack वगैरे आलेल्यांना म्हणजे जे पटकन गेले त्यांना लगेच शिवतो आणि जे अंथरुणावर खितपत पडलेले असतात त्यांना सहसा वेळ लागतो. माझ्या दृष्टीने हे observation interesting होतं. दुसऱ्या दिवशी आम्ही त्रिपिंडी श्राद्ध केलं पण माझे वडील हयात असल्याने तर्पण केलं नाही. त्यानंतर पिंड ठेवले तेव्हा तिन्ही पिंडांना कावळा शिवला.
खरं म्हणजे माझा Interest घरी आल्यावर कावळ्याचं वागणं कसं असेल यात होता. पण गंमत म्हणजे तेव्हापासून आजपर्यंत आमच्या Balcony मध्ये किंवा खिडकीत येऊन कावळ्याने दर्शन दिलेलं नाही. ना त्याने कधी काव काव केलं. त्रिपिंडी करून आता जवळ जवळ साडेतीन महिने पूर्ण झाले पण कावळ्याला आता ताज्या पोळीची आवश्यकता उरली आहे असं वाटत नाही.
मित्रांनो तुम्ही तुमच्या पूर्वजांचे श्राद्ध करत नसाल तर कमीत कमी सर्वपित्री अमावास्येला सगळ्यांकरिता एक श्राद्ध तरी करा आणि तुमच्या घराण्यात जे कोणी लहान वयात गेलेत, ज्यांची लग्नं झाली नाहीत, ज्यांना अनपेक्षित मृत्यू आला, त्यांच्याकरिता जर तुमच्या पत्रिकेत इंडिकेशन्स असतील तर योग्यवेळी त्रिपिंडी श्राद्ध नक्की करा. एवढं तर आपण आपल्या पूर्वजांचं नक्कीच देणं लागतो. नाही का?
(c) Gaurish Borkar #daivianubhav #gaurishborkar
Comments
Post a Comment