माझे दैवी अनुभव भाग १५
ज्योतिष म्हटलं कि Intuition हा एक चर्चिला जाणारा नेहमी विषय. आज थोडंसं याकडे पाहूया. आम्ही स्वामींकडे जाऊ लागल्यानंतर त्यांनी काही दिवसांनी स्वामींनी युवकांकरीता म्हणजे युवा केंद्र सुरु केलं. युवा केंद्रात विविध विषयांवर गट चर्चा (Group Discussions) व्हायची यात त्यांनी Intuition किंवा असाच काहीसा एक विषय घेतला होता. त्यावेळी मी एका IT Company मध्ये Developer म्हणून काम करायचो आणि तिथे रोज Average पेक्षा बरेच जास्त Product Bugs fix करायचो. त्यामुळे Intuition म्हणजे काय असा विचार करताना Intuition म्हणजे Matured Experience अशा अंगाने मी तो विषय मांडला.
स्वामींना मात्र ते अजिबात रुचलं नाही. त्यांची नाराजी त्यांच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसली. नंतर त्यांनी तो विषय Intuition म्हणजे वृत्तीरहीत शुद्ध स्थितीमध्ये असलेल्या अंतःकरणावर उठणारा तरंग अशा प्रकारे Conclude केला असं मला साधारण आठवतंय. मला आता पक्कं आठवत नाही कारण या गोष्टीला आता १५ पेक्षा जास्त वर्षं झाली. पण यामुळे या विषयाबद्दलचं माझं कुतूहल वाढलं.
याबद्दल विचार करताना माझ्या मनात अनेक प्रश्न येऊ लागले. उदा. दुसऱ्याच्या मनातलं समजणं याला काय म्हणायचं? एखाद्या परिस्थिरीबद्दल आधीच अंदाज येणं याला काय म्हणायचं? वगैरे, वगैरे.
या आधी मी तुम्हाला सांगितलं तसं माझ्या आजोबांना जगात कुठेही भूकंप झाला तरी लगेच कळायचं आणि त्यामुळे मला याला सुद्धा Intuition म्हणता येईल असं वाटायचं पण ते तसं नसू शकतं असा एक वेगळा विचार मी पहिल्यांदाच ऐकला होता आणि त्यावर माझं Thinking सहजच सुरु झालं.
विचार करता करता माझ्या लक्षात आलं की एखादी आई ज्यावेळी आपल्या मुलाशी Concerned असते तेव्हा तिला आपल्या मुलाबद्दल जर काही Odd झालं तर uncomfortable वाटतं. याच कारण त्या मुलाचं आईशी असलेलं close association असावं पण याला जर Intuition म्हणायचं नाही तर काय म्हणायचं याचा विचार मी करत असताना NLP मधील Rapport हा विषय मी अभ्यासला आणि माझ्या लक्षात आलं की ज्यावेळी कोणत्याही २ गोष्टी Rapport मध्ये असतात तेव्हा असं होण्याची दाट शक्यता आहे. याची अनेक उदाहरणं आपल्याला व्यवहारात दिसतात म्हणजे २ माणसं एकमेकांना एकाच वेळी phone करायचा प्रयत्न करतात, एकाच वेळी एकच गोष्ट एकदम सांगतात, दुसऱ्या माणसाच्या मनातील गोष्ट आधीच ओळखून त्यानुसार वागतात वगैरे वगैरे. पण निर्जीव गोष्टीशी असा Rapport Develop होईल का? असा प्रश्न माझ्या मनामध्ये घोळत होता.
Microsoft मध्ये काम करताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली कि एखादी व्यक्ती जेवढी मोठ्या पदावर आहे तेवढी ती जास्त वेगाने Issues ओळखते आणि त्याला प्रतिबंध करते. या माणसांची योग्य प्रश्न विचारण्याची त्यांची क्षमता तर अफलातून असते. असंच एकदा आमच्या नव्या Project च्या बद्दल मला प्रश्न विचारला गेला की
“Are we ready to Ship the Product?”.
त्याला मी naturally उत्तर दिलं की
“All the criteria for shipping are met. So we are good to go.”
यावर मला आणखी एका Senior Executive व्यक्तीने उलटा प्रश्न विचारला की
“If there wouldn’t have been any criteria would you give it a go?”
या प्रश्नाने मात्र मी जाम बुचकळ्यात पडलो आणि हे पाहून माझ्या Direct Manager ने वेळ सावरुन नेली. ते पटकन म्हणाले,
“Yes, I would give it a go.”
यावर सुद्धा नाराजी दर्शवून ते Senior Executive म्हणाले कि,
“This is not expected. I would expect the team to answer such questions going forward.”
या घटनेने मात्र आपण एखाद्या वस्तूशी Rapport build करु शकतो का या विचाराने जोर धरला आणि तसे प्रयत्न मी सुरु केले. हळू हळू माझ्या लक्षात आलं की हे जमू शकतं. मग मी आमच्या Production System शी Rapport build करुन वेगवेगळ्या वेळी check केलं आणि माझ्या लक्षात आलं कि Production मध्ये काही Issue असेल तर मला तो Uneasiness feel होतो अगदी रात्री झोपेत सुद्धा होतो. एवढे Alerts लावलेले असताना सुद्धा त्या Alerts ने miss केलेली गोष्ट मला uneasy करु लागली आणि हे शक्य आहे असं मला वाटायला लागलं आणि Are we ready to Ship? या प्रश्नाचं मी हो किंवा नाही एवढंच पण बेधडक उत्तर द्यायला लागलो.
पुढे असंच एकदा शुक्रवारी संध्याकाळी मला एका Senior Program Manager ने थांबवलं.
मला म्हणाला
“Gaurish, there is a huge issue in Production. We shall look into it before going home.”
मी थोडा अंदाज घेतला आणि त्याला म्हटलं,
“I don’t think there is any issue, so I am going home. If you need me, feel free to call and I will be back in the office .”
चुकीच्या Alerts मुळे त्याने सगळी संध्याकाळ आणि रात्र Issue शोधण्यात घालवली आणि शनिवारी सकाळी मला त्याचा Phone केला. मला म्हणाला की “It was a false alarm.” पुढे त्याला नेहमीच मी अशी statements कशी करु शकतो याबद्दल कुतूहल होतं. हळू हळू माझ्या लक्षात आलं की हे माझ्या Personal Life च्या दृष्टीने अतिशय त्रासदायक आहे आणि म्हणून मग मी तो rapport break केला आणि सुटकेचा निःश्वास टाकला.
याचं आणखीन एक उदाहरण देतो. ही Ability develop करण्याकरीता हल्ली आम्ही घरी एक Game खेळायला लागलो. Game एकदम Simple होता. एका व्यक्तीने कोणतीही ३ अंकी किंवा ४ अंकी संख्या मनात धरायची आणि बाकीच्या व्यक्तींनी ती ओळखायची. अर्थातच मला याची जास्त Practice असल्याने मी जास्त बरोबर संख्या ओळखू लागलो. एकदा मात्र मला काही केल्या संख्या समजेना. मला उत्सुकता होती की हा काय प्रकार आहे. म्हणून मी माझी शस्त्रं खाली ठेवली आणि माझ्या मुलीला विचारलं काय झालं? तू Number ठरवलाच नाहीस का? तर ती म्हणाली की आधी ठरवला आणि मग राम नाम घेत बसले म्हटलं बघुया आता याला काय कळतंय ते. सारखं तूच का जिंकायला पाहिजेस? या वेळी माझ्या डोळ्यासमोर केवळ एक blank पाटी दिसत होती. हे Rapport break झाल्याचं उत्तम उदाहरण आहे म्हणून सांगितलं. पण मुख्य मुद्दा असा की हे आपल्या सगळ्यांना जमू शकतं आणि याला Intuition म्हणता येणार नाही.
Intuition म्हणजे एखाद्या संगीतकाराला सुचलेली अशी चाल की त्याला वाटतं की ही माझ्या क्षमतेने पुन्हा सुचू शकणार नाही. Intuition म्हणजे एखाद्या Scientific Principle चा नव्याने समजलेला अर्थ जो त्या व्यक्तीच्या क्षमतेने समजणे सहज शक्य नाही. Intuition म्हणजे नकळत समजेलेलं एखादं आध्यात्मिक तत्त्व जे आपल्या आकलनाच्या फार पलीकडचं आहे. या सगळ्यातून होणारा आनंद हा ते समजलं यापेक्षा फार फार मोठा आहे. पण ते विशेषतः “मला” समजलं या अभिमानाला फार महत्त्व त्यावेळी उरलं नाही. Intuition असं असतं की काय अशी मला शंका आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते जरुर सांगा.
Comments
Post a Comment