माझे दैवी अनुभव भाग १६
आजचा अनुभव थोडा दमानं घ्या. जिथे वाटेल तिथे थांबा. चला तर मग. आम्ही एका metro city मध्ये एका सोहळ्याला गेलो होतो. जायला यायला सोपं पडावं म्हणून Car घेऊन गेलो होतो. संध्याकाळचा सोहळा होता तो आटोपला आणि मस्त जेवण झाल्यावर पान वगैरे खाऊन आमची रात्री राहायची व्यवस्था केली तिथे गेलो. आमचे Host त्याच Building मध्ये वरच्या मजल्यावर राहत होते आणि खालच्याच मजल्यावर त्यांची आणखी काही जागा होती. त्यामध्ये एक मोठा लांब लचक हॉल आणि mostly २ extra bedrooms होत्या. आमची व्यवस्था त्यातल्याच एका Bedroom मध्ये होती. Hall मध्ये सगळेजण छान गप्पा मारत होते म्हणून मुलांना आतल्या खोलीत झोपवलं. आम्हीही थोड्यावेळाने झोपायला गेलो. त्यावेळी साधारण बारा, सव्वा बारा वाजले असतील. साधारण दीड पावणेदोनची वेळ असेल तिथे झोपलेल्या एका ताईला जोरात खोकला येऊ लागला. तिच्या आईने तिला पाणी आणून दिलं आणि मांडीवर घेतलं. फार फार तर ४-५ वर्षाची असेल ती मुलगी. तिचा खोकला काही केल्या थांबेना. तिच्या खोकल्याने आम्हाला पण जाग आली. कल्याणी मला म्हणाली कि ताईला जरा रेकी दे म्हणजे थोडी शांत झोप लागेल. मी तिला मांडीवर घेतलं आणि रेकी दिली. थोडा वेळ तिचा खोकला थांबला म्हणून तिला गादीवर ठेवलं आणि मी झोपणार इतक्यात ताई पुन्हा खोकायला लागली. मी पुन्हा मांडीवर घेऊन रेकी दिली आणि पुन्हा तिचा खोकला बंद झाला. पुन्हा तिला मी जमिनीवर ठेवली आणि झोपणार इतक्यात पुन्हा खोकला सुरु झाला. ताई मला म्हणाली कि काका तू रेकी देतोय तेवढाच वेळ मला बरं वाटतंय. मला आश्चर्य वाटलं, मी तिला विचारलं
तुला काय होतंय?
तर मला म्हणाली माझ्या घशावर जोर येतोय. एवढ्यात त्या ताईच्या आईच्या लक्षात आलं कि रेकीने फार काहीच होत नाहीये म्हणून ती काही औषधं आणायला हॉल मध्ये गेली.
आमच्या खोलीत एक आजी झोपल्या होत्या त्यांची झोप सुद्धा या सगळ्याने मोडली. खोलीत काय चाललंय याकडे त्या झोपूनच लक्ष देत होत्या. आतापर्यंत त्या ताईच्या आईच्या २-४ तरी आत-बाहेर फेऱ्या झाल्या होत्या. आणि त्या येता जाता ते दार सारखं लोटलं जायचं आणि त्यातून कर कर आवाज यायचा. तो Flat काही वापरातला नव्हता. त्यामुळे त्याला एवढी डागडूजी नव्हती पण तरीही तो छान होता.
“काय हे दार सारखं बंद होतंय?” वैतागून आजींनी त्यांचं Observation मांडलं.
तेवढ्यात ताईला एकदा जोरदार ठसका लागला. आता मी या ठसक्याकडे थोडं वेगळ्या पद्धतीने पाहत होतो कारण Prima Facie जरी तो खोकला वाटला तरी तो जास्त ठसक्यासारखा होता असं माझ्या लक्षात आलं. आतापर्यंत माझी झोप पण पूर्ण गेली होती आणि मी थोडा लक्षपूर्वक याकडे पाहू लागलो होतो.
घशावर जोर येतोय या ताईच्या वाक्यामुळे मी ताईच्या बाजूला रेकी ने एक Protection Box तयार केलं आणि ताईला लगेच झोप लागली. त्यानंतर सगळी खोली Scan केली आणि मी सुद्धा झोपून गेलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर चहा वगैरे झाला आणि ते दार रात्रीसारखं Automatically लोटलं जातंय का हे check करुया म्हटलं. पण तसं काहीही होत नव्हतं. ते दार उघडं ठेवलं तर उघडं राहत होतं बंद ठेवलं तर बंद होत होतं. कल्याणीने मी काय चेक करतोय ते बघितलं आणि म्हणाली हे रात्रीच Automatically बंद होत होतं वाटतं. मी नुसता हसलो आणि आम्ही पुन्हा पुण्याला यायच्या तयारीला लागलो. त्या ताईची फॅमिली पण पुण्यात येणार होती म्हणून त्यांना म्हटलं चला आमच्याच बरोबर मी सोडतो. पुण्याला पोचल्यावर आम्ही त्यांना घरी सोडलं आणि विषय तिथेच संपला.
काही दिवसांनी त्यांच्याकडे जायचा पुन्हा योग आला. ताईची आई म्हणाली कि हल्ली ही फारच घाबरते. काय झालं ते मला माहितीच होतं.
मी ताईला म्हटलं काय गं ताई त्या दिवशी रात्री काय झालं. तर ताई म्हणाली
त्या दारामागे काहीतरी विचित्रच होतं.
एवढ्या छोट्या मुलीचं मला कौतुक वाटलं म्हणून मी तिला खोदून विचारलं,
म्हणजे काय होतं?
त्याचे हात असे लुळे पडलेले होते. चेहरा दिसत नव्हता असा Hood घातलेला black colour चा माणूस वरती लटकला होता. तो सारखं दार बंद करत होता. इति ताई.
एवढ्या छोट्या मुलीच्या एवढ्या detailed description चं मला फारच आश्चर्य वाटलं म्हणून मी पुढे विचारलं
पण तुला खोकला का येत होता?
अरे काका, तो माझ्या गळ्यावर हात ठेवत होता ना, तेव्हा मला खोकला यायचा.
मग?
तू रेकी दिलीस ना कि तो पळून जायचा आणि मग पुन्हा येऊन गळ्यावर हात ठेवायचा. शेवटी मग मला झोप आली. ताईने खोलीतल्या सगळ्यांनाच मोठ्ठा Shock दिला. विशेष म्हणजे माझा experience एवढ्या clearly ती शब्दात आणेल याची मला अजिबात अपेक्षा नव्हती. सगळी खोली भीती आणि आश्चर्य याने शांत होती.
पण मग तू आत्ता का घाबरतेस? मी ताईला विचारलं.
अरे काका इथल्या पण कोपऱ्यात कोणी असलं तर? म्हणून मला भीती वाटते. ताईने तिच्या भीतीचं कारण सांगितलं.
अगं असं कसं इथे कोणी असेल? तिकडंच तिकडे. आणि तुला कोणी दिसलं तर मला phone कर ना? मी तुला लगेच रेकी देईन. मी तिला आश्वस्त केलं.
अरे हो, पण आता Dark Corners ची खूप भीती वाटते मला. ताईने सांगितलं.
तू काही घाबरु नकोस, मला कधीही Phone कर असं म्हणून मी तिला Protection दिलं आणि आम्ही त्यांच्या घरुन निघालो.
काही काही Energies फार Strong असतात आणि काहीही झालं तरी त्या आपला पिच्छा सोडत नाहीत असा अनुभव कधी कधी येतो.
याचं पुढे काय झालं ते पुढच्या भागात सांगतो. Stay Tuned. 🙂
(c) Gaurish Borkar #daivianubhav #gaurishborkar
Comments
Post a Comment