माझे दैवी अनुभव भाग १७
त्या दिवशी ताईवर झालेला रेकीचा Impact पाहून मी रेकी ची पुढची Level Complete करायचं ठरवलं. माझ्या मित्राच्या ओळखीचे एक सर होते आणि मी त्यांच्याबद्दल बरंच चांगलं ऐकलं होतं. त्यामुळे त्यांच्याकडेच पुढची Level करायची असं माझं आधीच ठरलं होतं. तरी ऑफिस आणि बाकी कामं यात ६ महिने गेले. शेवटी एक दिवस मी त्यांना Phone केला. ते म्हणाले मी महिन्याला एकच Course घेतो तुम्ही पुढच्या महिन्यात या. पुढचा महिना म्हणजे जून.
तारीख वगैरे सगळी ठरली. गम्मत म्हणजे आम्ही जिकडे सोहळ्याला गेलो होतो तिथून अगदी जवळच हा Course होता. तो एक रविवार होता. सकाळी प्रचंड पाऊस सुरु होता पण तरीही माझं जायचं पक्कं होतं. Car घेऊन मी साधारण पाच-साडेपाच वाजता पुण्याहून निघालो. जवळपास पावणे नऊ वाजता मी त्या शहरात पोहोचलो. त्या सरांना Phone केला.
सर, मी इथे इथे आहे तर तिथे कसं यायचं? मी विचारलं.
ते म्हणाले अरे तू अगदी तिथेच आहेस. सर म्हणाले. माझ्याकडे त्या जागेचं Google Location होतं. Google ने मला सांगितलं की
Your destination has arrived.
Google दृष्टीने आलेलं हे destination मला काही दिसेना. Traffic आणि पाऊस दोघेही धो धो पडत होते. मागून अनेक जण जोरात Horn वाजवत होते. मी पुढे जाऊन पुन्हा यायचं ठरवलं. थोडा पुढे गेलो आणि लक्षात आलं कि तो One Way आहे. मग पुन्हा एक Circle पूर्ण केलं यावेळी Car रस्त्याच्या डाव्या बाजूलाच ठेवली आणि हळू हळू पुढे जाऊ लागलो. तेवढ्यात Google ने ठणकावलं.
Your destination has arrived.
मी इकडे तिकडे पाहतोय तर मला मात्र ती Building कुठेही दिसत नव्हती. पुन्हा जोर जोरात Horn वाजू लागले, मी थोडा पुढे गेलो आणि माझं डेस्टिनेशन पुन्हा हुकलं. आता काय करणार पुन्हा एकदा Circle पूर्ण करावं लागणार होतं. हे माझं तिसरं Circle होतं. एवढं सगळं होईपर्यंत साधारण १० वाजले. सर वेळेचे पक्के होते, मी सुद्धा अगदी आधीच पोहोचलो होतो पण मला जागाच सापडत नव्हती. तेवढ्यात सरांचा Phone आला.
बोरकर, एक माणूस बाहेर उभा आहे. मला तुमच्या Car चा Number मला सांगा तो तुमची Car अडवेल नाहीतर तुम्हाला ही जागा आज सापडेल असं मला दिसत नाही.
मी त्यांना Car चा Number सांगितला आणि Phone ठेवला. तेवढ्यात एक माणूस पटकन पुढे आला आणि त्याने मला ती Building दाखवली. इकडे या म्हणाला. मी त्या Building मध्ये Car नेली आणि ही Building मला आत्तापर्यंत का दिसली नाही याचा विचार करत सरांकडे गेलो. तो माणूस पण आमच्या Batch मधला एक Participant होता. सरानी आमची ओळख करुन दिली आणि मला हसत हसत म्हणाले.
आज काही तुम्ही इथे पोहोचाल असं वाटलं नाही म्हणून यांना पाठवलं. त्यांच्याकडे पाहून मी सुद्धा हसलो. काय चाललेलं ते त्यांच्या लक्षात आलेलं असं मला वाटलं. तरीही मी त्यांची परीक्षा घ्यायचं ठरवलं.
Course सुरु झाला आणि ते म्हणाले की तुमच्या उपास्य देवतेचं किंवा गुरुचं स्मरण करा. तर मी एकदम कालीमातेच्या एका प्रचंड उग्र रूपाचं स्मरण केलं. ते झटकन म्हणाले आपण काही इथे मंत्र तंत्र करणार नाही. गुरुचं स्मरण केलं तर पुरेसं आहे आपल्याला एवढ्या उग्र देवतांची गरज नाही.
माझ्या लक्षात आलं की त्यांना बऱ्यापैकी कळतंय. दुपारी जेवणानंतर मी त्यांना विचारलं कि सकाळी काय झालेलं. तर ते म्हणाले.
अनेक वर्षांपूर्वी इथे एका व्यक्तीचा अनैसर्गिक मृत्यू झालेला ती व्यक्ती अधून मधून लोकांना अडवते.
मग मी त्यांना विचारलं कि
Exactly कुठे मृत्यू झालेला?
ते म्हणाले, अमक्या अमक्या Building च्या Compound बाहेर. आश्चर्य म्हणजे आम्ही मागे त्याच बिल्डिंग मध्ये आम्ही राहीलो होतो. मला साधारण सगळा प्रकार लक्षात आला.
संध्याकाळी Course पूर्ण झाल्यावर मी पुण्याला आलो. त्या Course चा मला फारच उपयोग झाला. याला आता साधारण ६ ते ७ वर्षं झाली असावीत. आता ताईला तो प्रसंग अजिबात आठवत नाही पण काळोख्या कोपऱ्यांची थोडी भीती अजून तिच्या मनात तशीच आहे.
विशेष म्हणजे मागचा भाग वाचून आमच्या एका नातेवाईकांचा मला Phone आला. त्यांनी मला विचारलं कि
अरे तू जे लिहिलं आहेस ते अमक्या अमक्या बिल्डिंगबद्दल आहे का?
मी त्यांना मुद्दामच नाही म्हटलं. ‘तुम्ही असं का विचारात आहात?’ असं पुढे विचारलं. तर ते म्हणाले.
त्या खोलीत पूर्वी एक गृहस्थ राहायचे पण ते एकटे झोपायचे नाहीत. ते कायम कोणातरी घरात काम करणाऱ्या व्यक्तीला घेऊन झोपत.
मी म्हटलं का बरं? तर म्हणाले,
त्यांना तिथे जवळ जवळ रोज असाच अनुभव यायचा. ते झोपेत ओरडत उठायचे. की माझा कोणीतरी गळा धरतोय. मग दुसरा झोपलेला माणूस त्यांना झोपेतून जागं करे आणि मग ते पुन्हा झोपी जात.
मी त्यांना विचारलं हे तुम्हाला कोणी सांगितलं तर ते म्हणाले त्यांच्या बरोबर झोपणाऱ्या माणसाने सांगितलं पण ते स्वतः सुद्धा अजून हयात असतील. मी त्यांना सांगितलंय कि मला त्यांच्याशी बोलायला आवडेल. पाहूया काय होतंय.
ते पुढे म्हणाले की मी सुद्धा तिथे अनेकदा झोपलोय पण मला काही असा अनुभव नाही.
मला पूर्वी वाटायचं कि अशा Energies गावांमध्ये जास्त Active असतात पण या घटनेने तो माझा भ्रम आहे असं लक्षात आलं. यावेळी पुन्हा एकदा हे माझ्या लक्षात आलं कि हे खूपच Selective आहे इतरांना दाखवता तर येणार नाहीच पण सिद्ध करता येईल की नाही हे सुद्धा माहिती नाही. ज्यांना अनुभव नाही त्यांनी यावर विश्वास ठेवायची काहीच गरज नाही पण त्यांनी हे Reject करु नये, एवढं पुरेसं आहे.
(c) Gaurish Borkar #daivianubhav #gaurishborkar
Comments
Post a Comment