माझे दैवी अनुभव भाग १३
आज पासून पुन्हा दैवी अनुभव लिहायला सुरवात करतोय पण Tone थोडा वेगळा असणार आहे. पाहूया तुम्हाला कसं वाटतंय.
कावळा आणि मी हे नातं तसं आजोबा गेल्यापासूनच आहे. त्याचं काय झालं कि आजोबा गेल्यानंतर काही दिवसांनी सलग ३ दिवस कावळ्याने माझ्या डोक्यावर टोच मारली. पण मी ते कधी कोणाला फार सांगितलं नाही कारण ना मला काही त्रास झाला कि दुखापत झाली. माझ्या डोक्यात मात्र हा विषय सतत घोळत होता. हळू हळू जसा मी ज्योतिषाचा अभ्यास करू लागलो मला लक्षात आलं कि अनेक धार्मिक कार्यक्रमात पांढऱ्या रंगाला महत्व आहे. उदा. तांदूळ आणि अनेक पैतृक कार्यक्रमात मात्र काळ्या रंगाला महत्व आहे. उदा. काळे तीळ, उडीद वगैरे. त्याच बरोबर लहान बाळाला काळी तीट लावतात किंवा हल्ली एका पायात काळा दोरा बांधतात. तसंच कावळ्याला दुपारच्या जेवणाआधी भात घालायची पद्धत आपल्याकडे होती. कावळा ओरडतो म्हणजे कोणीतरी येणार असा message देतो असं म्हणतात. त्यानंतर मग काळी मांजर वगैरे याबद्दल ऐकलं आणि कावळ्याबद्दलचं माझं कुतूहल आणखीनच वाढलं. मग डोमकावळा ओरडला तर तो वाईट असं पण ऐकलं आणि मी कावळ्याचं ओरडणं observe करायला लागलो. त्यात माझ्या लक्षात आलं कि कावळ्याचं काही ओरडणं खरंच कर्कश्य असतं तर काही तसं नसतं. पावसाळ्यात तर मी कावळ्याला अगदी soft ओरडताना ऐकलं. त्यामुळे यात काही तरी अर्थ असू शकतो असं मला वाटलं. त्यानंतर मी कावळा दिसला कि त्याला प्रश्न विचारू लागलो कि कोणी येणार आहे का? किंवा कुठे जाताना दिसला तर विचारू लागलो कि काही Problem आहे का? त्याच्या ओरडण्याचं माझं असं एक interpretation तयार केलं आणि ते वेळोवेळी validate करू लागलो. हळू हळू माझ्या लक्षात आलं कि हे mostly बरोबर येत. कधीतरी एखादी वेगळीच situation असेल तरच ते चुकतं. मी कावळ्याला विचारलं कि काही problem आहे का? कि घरचे मला अजूनही हसतात पण मी त्यांना सुद्धा याचे अनेक पुरावे दिलेले आहेत.
हल्ली हल्ली आमच्याकडे अगदी रोज एक कावळा येत असे आणि आम्ही त्याला जवळ जवळ रोज पोळी घालायचो. या कावळ्याची गंमत अशी कि तो शिळी पोळी अजिबात खायचा नाही त्याला ताजी पोळी घातली तरच खायचा नाहीतर दिवसभर पोळी तशीच उरायची. गंमत म्हणजे तो कावळा, कल्याणीचं (माझ्या बायकोचं) पोळ्या करणं सुरु झालं कि काव काव करायला सुरवात करायचा आणि असं जवळ जवळ रोजच व्हायचं. ते Timing इतकं perfect match व्हायला लागलं कि कल्याणीला सुद्धा त्याचं आश्चर्य वाटायचं. एक दिवस सकाळी कल्याणीने पोळ्या केल्याच नाही आणि उशिराने का होईना कावळा आला आणि त्याने काव काव केलं. मी कल्याणीला म्हटलं आला गं तर ती म्हणाली त्याला सांग अर्ध्या पाऊण तासाने ये. मी त्याला म्हटलं आज पोळ्या उशिरा आहेत तू थोड्या वेळाने ये. आत्ता काही हवंय का? असं विचारण्याच्या आतच तो उडून गेला सुद्धा. ही गोष्ट आम्ही दोघेही विसरून गेलो. त्यानंतर बऱ्याच उशिरा कल्याणी Balcony त गेली तर हा तिथे गपचूप बसलेला होता. तिलाच कससंच झालं आणि तिने त्यांना नेऊन पटकन पोळी दिली. मग तो पोळी खाऊन निघून गेला. हळू हळू माझ्या बोलण्यात काही तथ्य आहे असं तिला वाटायला लागलं. पण माझ्या मुलीला मात्र यात काही अर्थ आहे असं वाटत नव्हतं.
आज काल मुलं शाळेत विज्ञान शिकतात त्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्टीचं Proof लागतं. मला सुद्धा वाटतं कि जर एखादी गोष्ट खरी असेल तर ती सिद्ध करता आली पाहिजे. कदाचित त्याची Proofs mathematical नसतीलही पण statistical proofs तरी असली पाहिजेत. म्हणून मग आम्ही एक simple experiment करायचा ठरवला. कावळ्याला एक प्रश्न विचारायचा आणि त्याने त्याचं उत्तर द्यायचं. मी कावळ्याला सांगितलं कि हो असेल तर दोनदा काव काव करायचं आणि नाही असेल तर तीनदा करायचं. आणि एक प्रश्न कितीही वेळा विचारला तरीही त्याच उत्तर जर तेच राहिलं तर कावळ्याला आपण बोललेलं कळतं असं म्हणायचं. असे ५ प्रश्न विचारायचे ठरले. पहिल्यांदा मी प्रश्न विचारले आणि कावळ्याची उत्तर consistent होती. मग माझी मुलगी म्हणाली कि मी विचारणार. मी म्हटलं बरं तू विचार, मग तिने अनेकदा आलटून पालटून प्रश्न विचारले. एवढ्या वेळा कि शेवटी तो कावळा उडून गेला पण एकदाही त्याने inconsistent उत्तर दिलं नाही. तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही पण हा experiment करून पहा. तुमच्याकडे कावळा येत असेल तर तुमच्याशी कावळ्याचा संवाद सुरु झाला कि हे try करा. माझ्या मुलीला अजून सुद्धा हे पूर्ण पटलेलं नाहीये पण ती आता ‘यात काही अर्थ नाही’ असं म्हणू शकत नाही.
कावळ्यांचा आपल्या पूर्वजांशी खरंच संबंध आहे का? हा आणखी एक interesting प्रश्न आहे. मला कावळ्याचा विशेष अनुभव ती व्यक्ती गेली त्यावेळेपेक्षा वर्षपूर्तीच्या दिवशी जास्त आला आहे. आमच्या घरातील एक दूरची व्यक्ती देवाघरी गेली. त्यांच्या माझ्याकडून काही अपेक्षा होत्या. तशा त्यांनी त्या बोलूनही दाखवल्या होत्या पण ते Practical नसल्यामुळे मी त्याला नकार दिला होता. या मुद्द्यावर काहीतरी केलं पाहिजे असं मी त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना कळवलं होतं पण वर्षभरात त्यावर काहीही झालं नाही. या सगळ्यात त्यांच्या जाण्याला एक वर्ष पूर्ण झालं.
एक दिवस आमच्या इथे एक कावळा आला आणि कर्कश्य ओरडू लागला. मी जाऊन काय झालं असं विचारलं तर काही केल्या थांबेना. असाच ओरडत ओरडत निघून गेला. कावळा गेला तोच मला उचकी लागली. माझी उचकीही काही केल्या थांबेना. वेगवेगळे घरघुती उपाय केले, पाणी प्यालो, साखर खाल्ली, गुळ खाल्ला, मध खाल्ला, श्वास रोखून धरला तरीही काही उचकी थांबेना. Generally उचकी लागली तर मी कोरडे पदार्थ म्हणजे नुसता ब्रेड किंवा सोनपापडी खातो आणि माझी उचकी लगेच थांबते. यावेळी मात्र ब्रेडचा काहीच उपयोग झाला नाही म्हणून बाजारात जाऊन सोनपापडी घेऊन आलो पण सोनपापडीनेही काही फरक पडला नाही. आता माझ्या लक्षात आलं कि हे प्रकरण काहीतरी वेगळंच आहे म्हणून environment ची Reiki केली तेव्हा exactly काय झालंय ते लक्षात आलं. त्याच वेळी हेही लक्षात आलं की आज त्यांची वर्षपूर्ती आहे. मी बराच वेळ गप्प होतो आणि प्रार्थना करत होतो कि तुम्ही जा, पण काही केल्या ते ऐकत नव्हते. असे जवळ जवळ २ दिवस गेले माझी उचकी काही थांबेना. शेवटी कल्याणी म्हणाली कि आता आपण Doctor कडे जाऊया कारण तिला हे काहीच माहिती नव्हतं. शेवटचा उपाय म्हणून मी Reiki ने ती energy block केली आणि माझी उचकी लगेच थांबली.
या कावळोबांबद्दल आणखी काही अनुभव सांगायचेच आहेत पण ते पुढच्या Post मध्ये सांगतो.
(c) Gaurish Borkar #daivianubhav #gaurishborkar
Comments
Post a Comment