माझे दैवी अनुभव भाग १८
अनेकदा आपल्या आयुष्यात नवे नवे अनुभव येतात आणि त्यातुनच आपण समृद्ध होतो. मला तर नेहमी असं वाटतं की नवीन कोडी सोडवण हा उत्क्रांत आणि उन्नत होण्याचा मार्ग आहे. कोणताही विषय आपल्याला पुरेसा माहिती झाला असं वाटलं की universal energy आपल्याला पुढचं Puzzle देते आणि त्यावेळी लक्षात येतं की चला ही level आपण Cross केली. तीच कोडी पुन्हा पुन्हा सोडवण्यात काही मजा नाही हो. नाही का?
माझ्या बाबतीत हल्लीच एकदा असंच झालं. मी एका कामाकरिता एका Semi-Government Office मध्ये गेलेलो. माझ्या ओळखीची व्यक्ती मध्यस्थ होतीच. काम होणार याची बऱ्यापैकी खात्री होती. खरं म्हणजे मी जायची आवश्यकताच नव्हती पण ते मध्यस्थ म्हणाले की साहेबांना तुम्हाला भेटायचं आहे.
मी त्यांना विचारलं की काय झालं? तर ते म्हणाले की सहसा न भेटता काम होतं पण तुम्हाला का बोलावलंय माहीत नाही.
मी त्यांना विचारलं की तुम्ही त्यांना माझ्याबद्दल काही सांगितलंत का तर म्हणाले, हो सगळं सांगितलंय. असं म्हटल्यावर विषय माझ्या लक्षात आला.
वेळ ठरवून आम्ही दोघे भेटायला गेलो. ते मध्यस्थांना म्हणाले तुम्ही जरा बाहेर बसा. पुढे साधारण काय असणार ते माझ्या लक्षात आलं. मध्यस्थ बाहेर गेल्यावर त्यांनी त्यांची Story सांगायला सुरवात केली.
म्हणाले की “मी पूर्वी रोज सकाळी ११ वाजता Position घ्यायचो (अर्थातच stock market मध्ये) आणि माझे अंदाज एवढे अचूक असत की मला जवळ जवळ रोज minimum १० हजार Profit होत असे.” पहिली गोष्ट म्हणजे माझा याच्यावर अजिबात विश्वास बसला नाही. मला साधारण अंदाज आला की यांना भरपूर loss झालेला असणार.
ते पुढे म्हणाले की “हे सगळं संपलं हो. माझ्या मागे एक वेगळीच पीडा लागली आहे. एक बाई माझा काही केल्या पिच्छा सोडत नाहीये.” आता मला वाटलं की यांची काहीतरी बाहेर भानगड आहे आणि सगळे पैसे या माणसानं संपवलेत.
तर ते म्हणाले या बाईची सावली सतत माझ्या बरोबर फिरते आणि माझ्या अंगाला त्यामुळे प्रचंड घाणेरडा वास येतो. Doctor झाले, वैद्य झाले, मांत्रिक झाले, तांत्रिक झाले, सगळे उपाय करुन झाले पण हा वास काही केल्या जात नाही. गेली ५ वर्षं हे असं चाललंय. पुढे त्यांनी मला अनेक Personal गोष्टी सांगितल्या पण माझा त्यातल्या कशावरही विश्वास बसला नाही. शेवटी ते म्हणाले की फक्त तुम्हीच मला यातून सोडवू शकाल. त्यांचं सांगणं टाळण्याच्या दृष्टीने मी त्यांना म्हटलं की याबद्दल आपण पुन्हा कधीतरी बोलू. पण तरीही ते मला गळ घालतच राहिले.
पुढे त्यांनी मध्यस्थांना आत बोलावलं, त्यांनी आमचा एकत्र Photo काढायला सांगितला, तिथे चहा मागवलेला तो घेतला आणि Office ला यायला निघालो.
आश्चर्य म्हणजे, मी Office मध्ये पोचेपर्यंत माझ्याही अंगाला अत्यंत घाणेरडा वास यायला लागला होता. मी Office मध्ये पोहोचल्या पोहोचल्या कल्याणीने मला विचारलं, कसला वास येतोय. मी पुन्हा पुन्हा Confirm केलं आणि सारी हकिगत तिला सांगितली. मला वाटलं कसलं तरी Infection असेल तर घरी जाऊन आंघोळ करुया म्हणजे वास जाईल. घरी जाऊन स्वच्छ अंघोळ केली. एक ५ मिनिटं वाटलं की वास गेला आणि ५-१० मिनिटात पुन्हा प्रचंड घाण वास येऊ लागला. तेवढ्यात स्वस्ति शाळेतून घरी आली, मी दार उघडलं आणि तिने पहिला प्रश्न हाच विचारला की कसला वास येतोय.
माझ्या लक्षात आलं की हे प्रकरण काही वेगळं आहे म्हणून मी रेकी घ्यायचं ठरवलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की रेकीची Energy माझ्यामध्ये येत नाहीये आणि पक्कं झालं की काहीतरी वेगळी गोष्ट आहे.
जसं एखाद्या Surgeon ला आपलीच Surgery करता येत नाही तशी कधी कधी रेकी आपल्यालाच घेता येत नाही. त्यामुळे मी आमच्या एका नातेवाईकांना फोन केला, त्यांना म्हटलं असं असं झालंय तर तुम्ही जरा Healing द्या. ते त्यावेळी कामात होते ते म्हणाले, आज रात्री घरी गेल्यावर तुला Healing देतो. त्यानुसार त्यांनी घरी गेल्यावर Healing दिलं. दुसऱ्या दिवशी सकाळी तो वास थोडा कमी झालेला. त्यांनी दुसऱ्या दिवशी पुन्हा Healing दिलं आणि तो वास almost गेला. तरीसुद्धा पुढचे काही दिवस थोडा थोडा येतच होता. शेवटी १५ दिवसांनी मात्र अगदी पूर्ण गेला.
यातून पुढे माझ्या मनात एक प्रश्न घुटमळत होता की असा प्रसंग पुन्हा आला तर काय करायचं आणि त्यातून स्वतःला Healing घ्यायची एक नवीन पद्धत Develop झाली.
पुढे मी त्या ग्राहस्थांना १-२ वेळा भेटलो, पण मागच्या वेळची चूक पुन्हा केली नाही. अगदी पूर्ण Protection घेऊन भेटलो आणि पुन्हा अशा प्रसंगाला सामोरं जावं लागलं नाही. पण exactly काय झालेलं ते मात्र मला अजून कळलेलं नाही.
आजचा हा १८वा भाग आहे. या १८ भागांमध्ये मी प्रत्येक प्रकारचा साधारण एक प्रसंग असे मला अनुभवाला आलेले सगळे प्रकार Cover करायचा प्रयत्न केला आहे. सांगायचं हेच होतं की जरी हे एक वेगळं जग असलं तरी त्यातल्या काही गोष्टी सहज साध्य आहेत तर काही गोष्टी कष्टसाध्य आहेत. तेव्हा उगीच घाबरुन कोणत्यातरी बाबाच्या मागे लागू नका. मुख्य म्हणजे बुद्धी कधीही गहाण ठेऊ नका, विवेक सोडू नका. प्रत्येक Problem हा Solvable असतोच. सनातन धर्मातल्या बऱ्याचशा परांपरांना अर्थ आहे त्यामुळे तुमचे कुलधर्म आणि कुळाचार सोडू नका आणि काही वाटलच तर योग्य व्यक्तीची मदत जरूर घ्या.
तर हे झालं दैवी अनुभवांबद्दल, आध्यात्मिक अनुभवांबद्दल असंच पुन्हा कधीतरी सांगेन. पुढच्या आठवड्यापासून तुमच्या सगळ्यांकरीता तुमच्या सगळ्यांच्या ऊपयोगाची एक नवी Series घेऊन येतोय. ते Surprise पुढच्या आठवड्यात सांगतो. 

(c) Gaurish Borkar #daivianubhav #gaurishborkar
Comments
Post a Comment