चिंगीचा बाप्पा
गणपतीच्या आदल्या दिवशी office मधून घरी येता येता पाहिलं तर आमच्या Watch women ची मुलगी मातीचा गणपती तयार करत होती. मला खाली यायला थोडा उशीर झाल्याने कल्याणीचं आणि तिचं आधीच थोडं conversation झालं होतं याची मला काहीच कल्पना नव्हती. एका gas cylinder वर एक फळी ठेऊन ती मातीचा गणपती तयार करत होती.
अरे वा गणपती का? माती गाळून घेतली का?
असा प्रश्न मी विचारल्यावर तिने माझ्याकडे जो कटाक्ष टाकला त्यात अनेक shades होत्या.
हा स्वतः ला समजतो कोण? मी काय वेडी आहे का? मी काय पहिल्यांदाच मातीच्या वस्तू करतेय का? वगैरे वगैरे…
असे बरेच अर्थ मला त्या कटाक्षात जाणवले आणि मी जरा सावध झालो. अगदी तेवढ्यातच कल्याणी म्हणाली की
तिने गणपती करुन शाळेत नेला होता. आता फक्त ती सोंड आणि हात पुन्हा लावतेय.
हो तर, मला माहिती आहे. अशा आवेशात चिंगीने मान हलवली आणि ती पुन्हा गणपतीचे हात जोडू लागली.
एवढं सगळं झाल्यावर वर मी माझा experts advice देणं टाळलं.
काळी माती कोराडी झाल्यावर त्याला तडे जातात. नंतर चिकटवलेले भाग सुटतात. म्हणून तर शाडू माती वापरतात. असलं काहीही न सांगता, मी 'छान! चालूदेत' असं म्हटलं आणि बाहेर पडलो.
गणपती बसतो त्या दिवशी अर्थातच office ला जाणं झालं नाही.
पुढच्या दिवशी गेलो तर एका कोनाड्यात काचेच्या frame मधला बाजारात मिळतो तो गणपती आणि त्याला साधी आणि छान फुलांची आणि छोट्या झाडांची आरास असं एक pleasant surprise मला मिळालं.
मी पटकन खिशातून Mobile काढला आणि picture घेऊ लागलो. तेवढ्यात आमच्या watch women ने ते पाहिलं आणि चिंगीला उत्साहाने हाक कन्नड मधून काहीतरी सांगितलं. चिंगी धावत आली.
मी म्हटलं, अरे वा छान आहे तुमचा गणपती. Photo घेऊ का?
चिंगी लाजत म्हणाली हो घ्या ना.
तिच्या चेहऱ्यावर पुन्हा, अहो त्यात विचारायचं काय? माझा गणपती जरा फसलाच हं. त्या दिवशी जरा तुमच्याशी वागायला चुकलं. असे अनेक भाव मी पाहिले. आणि चिंगीला विचारलं,
मग गणपतीकडे काय मागितलं की नाही?
ती हळूच, हो म्हणाली आणि पुढे त्यात होतं की पण मी सांगणार नाहीये.
विषय बदलायचा म्हणून चिंगी म्हणाली,
आमच्याकडे आरती सुद्धा असते संध्याकाळी.
मी म्हटलं, मग आज प्रसाद काय?
ते ठरलेलं नसल्याने तिने सांगितलं की
काल खीर होती.
मी म्हटलं
हो का, उद्याचा प्रसाद आम्ही आणतो. तिने मान डोलावली आणि आम्ही एकमेकांची रजा घेतली.
चिंगीचे बाबा 2 वर्षांपूर्वी अचानक गेले त्यामुळे
आमच्या पप्पानी गणपती आणलाऽऽ
असं म्हणायला तिला काहीच scope नाही. गेल्यावर्षी ते सगळेच थोडे थोडे सावरत होते. या वर्षी जरा स्थिरस्थावर झाल्यावर चिंगीने स्वतः गणपती बसवायचं ठरवलं.
मग तिचा मातीचा गणपती करायचा plan गडबडल्यावर कोणी तरी gift दिलेली गणपतीची काचेच्या पेटीतली मूर्ती एका कोनाड्यात विराजमान झाली. आजूबाजूच्या झाडांची फुलं आणि पाने यांनी बाप्पा सजले. जमेल तशा रांगोळीने आरास झाली. एवढं सगळं केल्यावर मग काय आरती प्रसाद आलाच.
ना कुठलं कर्कश्य music, ना वर्गणी, ना महागडं decoration.
बाप्पा इथे अगदी छान सुखावले असतील नाही?
आमचे स्वामी म्हणायचे की मूर्तीत ईश्वरतत्व असतंच कारण मूर्तीकडे पाहिल्यानंतर आमच्या मनामध्ये ईश्वर तत्वाची जाणीव जागृत होते.
सणांचा मुख्य उद्देश ईश्वरतत्वशी जवळीक साधणं हाच असावा. चिंगीचा गणेशोत्सव तर छान साजरा झाला.
आपल्याला सुद्धा खूप opportunities आहेत. आपण सुद्धा या संधीचा फायदा करुन घेतला पाहिजे. नाही का?
#gaurishborkar #thinkingaloud
Comments
Post a Comment