माझे दैवी अनुभव भाग ६
इकडे माझे Graduation सुरु असताना माझ्या मित्राचं सुद्धा Graduation सुरु होतं. जशी माझ्या आईला माझ्या पोटापाण्याची काळजी वाटायची तशीच त्याच्या घरच्यांना सुद्धा त्याच्या पोटापाण्याची काळजी वाटायची. त्यामुळे त्याचा ज्योतिषाचा अभ्यास त्यांना फारसा पसंत नव्हता. मग त्याला घरच्यांनी काही काम सांगितले की आम्ही एकत्र जायचो आणि त्यावेळी ज्योतिषावर चर्चा करायचो. असेच एकदा जुन्या स्कूटरवरून जात असताना हुतात्मा चौकात पोलिसांनी आम्हाला पकडले. (हुतात्मा चौक म्हणजे दगडूशेठ गणपती आणि लाल महाल यांच्या मधला चौक.) काय तर म्हणे Scooter ची Number Plate नीट दिसत नाही. त्या पोलिसाने बाजूला उभा असलेल्या ३ star officer कडे म्हणजे साहेबाकडे नेले. बाकी सगळे कागद आहेत पण Number Plate नीट दिसत नाही तेव्हा पावती फाडावी लागेल असे साहेबांनी आम्हाला सुनावले. आधीच कडकी असताना फुकटचे दंड कोण भरणार? अब कुछ तो करना पडेगा! असा विचार मनात घोळत असतानाच साहेबांच्या बोटातील मणिकाची अंगठी माझ्या नजरेने हेरली आणि मी तत्क्षणी उचल खाल्ली. डोक्यात पंचांग असायचंच. पटकन मनात प्रश्न कुंडली मांडली आणि साहेबांना म्हटलं की तुम्हाला ...